नगरच्या खासदारांचा मुंबईत "दे धक्का"..! खा.सुजय विखेंचा साधेपणा व माणुसकीचे दर्शन.
नगर:- खासदार म्हणजे सुटाबुटात राहणारा, कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात वावरणारा व्यक्ती असच काहीस, साधारण चित्र सर्व सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर येते. परंतु काल, परवा एका खासदारांचा सामान्य माणसाच्या बंद पडलेल्या गाडीला रस्त्यावर धक्का मारताना चा फोटो व्हायरल झाला. आणि त्यानंतर त्या फोटोच निरीक्षण केले असता. अस लक्षात आल कि, बंद पडलेल्या गाडीला ज्या तीन व्यक्ती धक्का मारत आहेत. त्यातील एक नगर दक्षिण चे लोकसभा सदस्य डॉ. सुजय विखे पाटील आहेत. या प्रसंगातून नगरच्या खासदारांचा साधेपणा पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रान अनुभवला.
या बाबत समजलेली माहिती अशी कि, खा. सुजय विखे हे मुंबई मधे अंधेरी येथे रस्त्याने प्रवासात असताना एका ज्येष्ठ नागरीक दाम्पत्याची गाडी बंद पडलेली दिसली. रात्रीची वेळ असल्याने मदतीला कोणी नव्हते. हे पाहून खा. सुजय विखेंनी स्वतः आपल्या सोबत असणाऱ्या मोजक्या सहकाऱ्यांसोबत कारला धक्का मारला. व त्या दाम्पत्याला मदत केली.
आज ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात असताना अंधेरी येथे ३ लोकं एका गाडीला धक्का देताना दिसले. मुंबईत असे प्रसंग फार कमी वेळा दिसतात त्यामुळे कुतूहलाने बघत होतो.
तेवढ्यात लक्षात आलं की अरे यात मध्यभागी तर आपले नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. पटकन फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट फोटो घेता आला नाही.
कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे आमच्या नगरचे खासदार आहेत हे बघून अभिमान वाटला.
...See moreखा.सुजय विखेंचा कारला धक्का मारतानाचा फोटो व्हायरल झाला. कारण कल्याण मधे राहणारे अभियंता केतन भोई हे त्या वेळी कॅब ने तेथून जात होते. तीन व्यक्ती कारला धक्का मारत आहेत. हे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आल कि यातील मध्यभागी असणारी व्यक्ती म्हणजे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. त्यावेळी केतन यांनी फोटो काढून सोशल मिडीया वर पोस्ट केली. अनेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघात लोकांना मदत करतानाचे प्रसंग पाहायला मिळतात. परंतु मतदार संघ नसताना स्वतः खासदार ज्येष्ठ नागरीक दाम्पत्याच्या गाडी धक्का मारून मदत करतात. हे पाहिल्यावर खा.सुजय विखेंच्या साधेपणा व माणूसकी सर्वत्र चर्चेचा विषय बनला.
नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे हे उच्चशिक्षित व मोठया राजकिय घराण्याशी संबंधित असले तरी त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. मतदारसंघात असो किंवा इतर ठिकाणी साधा ब्लॅक पॅन्ट व व्हाईट शर्ट असा पेहराव असलेला व सामान्यां सारखा दिसणारा खासदार म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील अशी नगरच्या जनतेमधे त्यांची प्रतिमा आहे. त्यांनी आपल्या मतदार संघातील ज्येष्ठ नागरीकांना वयश्री योजनेतून आवश्यक साहित्याचे वाटप केले आहे. ज्येष्ठ नागरीकाच्या गाडीला धक्का मारताना चा फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला सुजय विखेंच्या साधेपणा व माणुसकीचा प्रत्यय आला असल्याचे सोशल मिडीया वरील प्रतिक्रिया मधून व सामान्य माणसांच्या चर्चेतून दिसून येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा