बिंगो जुगार चालविणा-यावर भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई*


 अहमदनगर ( प्रतिनिधी):- पोलीस निरीक्षक श्री. दिनकर एस. मुंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, बु-हाणनगर रोडवरील व्हीडीओकॉन कंपनी शेजारी रोड लगत एका पत्र्याचे शेडमध्ये एक इसम स्क्रीन वर बिंगो नावाचा हार जीतीचा जुगार लोकांकडून पैसे घेऊन खेळतो व खेळवितो आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने श्री. दिनकर एस. मुंडे सो यांनी पोहेकाँ/760 अजय नारायण नगरे, पोना/2178 राहुल राजेंद्र द्वारके, पोना/1407 भानूदास गौतम खेडकर, पोना/308 गणेश शिवाजी साठे, पोकाँ/810 अमोल नवनाथ आव्हाड अशांना सदर ठिकाणी जावून कारवाई करणे कामी आदेश दिल्याने वरील पोलीस स्टाफ व पंच अशांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी गणेश गोरख गाडेकर वय 39 वर्षे रा. नागेश्वर चौक, नागरदेवळे ता.जि. अहमदनगर हा लोकांकडून पैसे घेऊन बिंगो नावाचा हारजितीचा जुगार चालविताना मिळून आल्याने त्याचे ताब्यातून 11,760 /- रू किं बिंगो नावाचा जुगार चालविण्याच्या साहीत्यासह तसेच रोख रकमेसह ताब्यात घेऊन त्यांचे विरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो, अपर पोलीस अधिक्षक श्री प्रशात खैरे सो, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील सो यांचे मार्गदर्शना खाली सपोनी/दिनकर मुंडे, पोहेकाँ/760 अजय नारायण नगरे, पोना/ 2178 राहुल राजेंद्र द्वारके, पोना / 1407 भानूदास गौतम खेडकर, पोना/308 गणेश शिवाजी साठे पोकाँ/810 अमोल नवनाथ आव्हाड यांनी सदरची कारवाई केली आहे सदर गुन्हाचा तपास पोना/ 2178 राहुल द्वारके हे करीत आहे. 

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !