एनपीएस खाजगीकरण भारत छोडो यात्रेचे शनिवारी अहमदनगरमधे आगमन


 नगर प्रतिनिधी:- शासकिय कर्मच्याऱ्यांना 2005 नंतर सेवेमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने शेअर मार्केट वर आधारित एनपीएस योजना लागू करण्यात आलेली आहे व त्याचप्रमाणे शासनाने अनेक ठिकाणी खाजगीकरणाचे धोरण स्वीकारलेली आहे. शासनाच्या या पेन्शन विषयी धोरणा विरोधात NMOPSचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व महासचिव गोविंद उगले यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतभर भारत छोडो यात्रेचे नियोजन करण्यात आलेले आहे.

        अहमदनगर मधे शनिवार दि. 24 रोजी  दुपारी 12 वाजता एनपीएस खाजगीकरण भारत छोडो  यात्रा येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू व राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये पेन्शन निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.जिल्हाभरातून तमाम कर्मचारी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अभूतपूर्व झालेल्या संपामध्ये दिलेल्या आश्वासनाची शासनाने पूर्तता केलेली नाही. त्यामुळे शासनाच्या  विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जिल्हाभरातील तमाम कर्मचाऱ्यांनी निर्धार सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व संघटनांचे समन्वय समितीचे निमंत्रक व पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र ठोकळ यांनी केले आहे.

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !