स्वराज्य शिक्षक संघटनेचे जिल्हा परिषद पुणे समोर धरणे आंदोलन सुरू उत्स्फूर्त प्रतिसाद.


 पुणे ( प्रतिनिधी):- प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पार पडली आहे, राज्य शासनाने कार्यमुक्ती करण्याचे आदेश देऊनही पुणे जिल्हा  परिषदेने काही शिक्षक /शिक्षिकेंना कार्यमुक्त करू नये असे आदेश दिलेले आहेत.

        उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 4 मे 2023  रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश  काढले,या आदेशानुसार  न्यायालयाने स्थगिती दिलेल्या याचिका कर्त्यांना वगळून इतर  सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे आदेश असताना आणि जिल्हा परिषद पुणे यांनी कमी शिक्षक संख्या असलेल्या शाळेवर पर्यायी व्यवस्था केली असताना सुद्धा कार्यमुक्ती होत नसल्यामुळे स्वराज्य शिक्षक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.आणि  कार्यमुक्ती संपेपर्यंत आंदोलन सुरूच राहील या ठाम निर्धाराणे  आंदोलन करते महिला शिक्षिका आणि शिक्षक मोठ्या संख्येने बसलेले दिसले.

      संघटनेचे राज्याध्यक्ष गजानन पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे,  या आंदोलनास संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमाजी चव्हाण, विजय कारखेले  दत्तात्रय गोरे, श्रीकांत सर,शिवाजी शिरसाट, राजेंद्र परहार, सुनील निचीत, अशोक कुटे, सातव सर, सुरेखा भानुदास बटवाल जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, संगीता नवले संपदा गाडवे जयश्री गाडगे सरस्वती माने लता नलावडे, जयश्री गडदे, कुराडे मॅडम

शिल्पा वाघचौरे, वंदना पाचरणे इत्यादी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या.

{कार्यमुक्ती आदेश घेतल्याशिवाय धरले आंदोलन संपणार नाही

राज्य अध्यक्ष 

जानन पांचाळ}

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !