सुप्यातील खुनाचा झाला उलगडा ! ; पोलीस निरीक्षक ज्योती गडकरींच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी !
अहमदनगर(प्रतिनिधी):- पारनेर तालुक्यातील सुपा येथील नगर पुणे महामार्गालगत असणाऱ्या शासकीय विश्रामगृहा जवळील ओढ्यात 23 जून रोजी पुरुष जातीचा एक बेवारस मृतदेह सापडल्याने सुपा पो.स्टे.आकस्मात मृत्यु गुन्हा रजी नं 31/2023 सी.आर.पी.सी.174 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीसांनी तात्काळ सुरू केला.
समजलेल्या माहितीनुसार, सदर मयताचे डोक्यावर चेहऱ्यावर जखमा असल्याने त्याचा खुन झाला असावा असा पोलीसांचा अंदाज होता. मयताचे अंगावर तसेच खिश्यामध्ये कोणताही ओळखीचा पुरावा आरोपीने ठेवला नसल्याने त्याची ओळख पटविणे पोलीसां समोर आव्हान होते.खुनाच्या दृश्टीकोनातुन तपास करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिले होते.सदर तपास करत . असताना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सदर अनोळखी मयत हा सुपा परिसरातील हॉटेल मध्ये वेटर म्हणुन काम करत होता.अशी बातमी मिळाल्यानंतर पोलीसांनी सुपा परिसरातील सर्व हॉटेल मधे कसून शोध घेतला असता सुपा येथील एका हॉटेल मध्ये मयत हा वेटर म्हणुन कामास होता. अशी प्राथमिक माहिती समोर आली. सदर वेटरची अधिक माहिती सुपा पोलीसांंनी घेतली असता तो त्याचे नाव खंडु रघुनाथ औटी वय-24 रा. पाडळी आळे ता.पारनेर येथील असल्याचे समजल्याने सदर मयताचे फोटो त्याचे नातेवाईकांना दाखवुन त्याची ओळख पटवुन सदर मयत हा दि.18/06/2023 पासुन संपर्कात नसल्याचे नातेवाईकांनी पोलीसांना कळविले. दरम्यान त्याच हॉटेल मधील आणखी एक वेटर घटना घडल्यापासुन कामावर आला नाही.असे हॉटेल मालकाने सांगितले.त्यामुळे त्याच्यावर संशय आल्याने पोलीसांनी हॉटेल मालकास त्याचे नाव गाव विचारले असता हॉटेल मालकाने त्याचे नाव सचिन जाधव असे असून तो कोठे राहतो याबाबत काही एक माहीत नाही असे सांगितले.त्याचा मोबाईल क्रमांक दुसऱ्या वेटर कडुन प्राप्त करुन त्याचे लोकेशन घेवून त्यास ताब्यात घेतले असुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रविण पुंडलिक गोलाईत वय-34 रा.म्हशीकोठा ता. सोयगाव जि.छञपती संभाजी नगर असे असल्याचे सांगितले.त्यामुळे सदर आरोपी हा खोटे नाव सांगुन हॉटेल मध्ये काम करत होता. हे निष्पन्न झाले आहे.सदर आरोपी याने दारु पिऊन दारुच्या नशेत मयताचे डोक्यात लोखंडी पाईप मारुन खुन केल्याची कबुली दिली आहे.सदर मयताचे पी.एम नोट्स प्राप्त करुन सुपा पो.स्टे गु.र.नं.298/2023 भा.द.वि.कलम 302,177 प्रमाणे गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधिक्षक,श्री. संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी न.ग्रा.वि.अ.नगर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. ज्योती गडकरी,पोसई/तुकाराम पवार,पोसई/अख्तर पठाण,पोहेकॉ/खंडेराव शिंदे , पोहेकॉ/संदीप चौधरी,पोना/ यशवंत ठोंबरे,पोना/संदीप पवार यांनी केली आहे.
*बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा