स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा दहिगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

 

नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के):-

नगर तालुक्यातील दहिगाव येथे ७७ वा स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजिन  मेरी मिट्टी मेरा देश, भारत मातेचे शुर वीरांना देशाची रक्षा करतांना शहिद विर जवानांच्या स्मरणार्थ राहण्यासाठी शिला अनावरण माजी सैनिक महादेव म्हस्के यांच्या हस्ते अकरण्यात आले, त्यानंतर वसुधा वंदन अंतर्गत गावातील विविध ठिकाणांची एक मुठ माती गोळा करुन कलश दिल्ली येथे दि.२७,२८ ऑगस्टच्या होणार्या समारंभास पाठविण्यात आली आहे.तसेच दहिगावची शाळा  जिल्हास्तरीय शाळेच्या टाॅप दहा मध्ये गणली जाणारी शाळा ठरली आहे. या शाळेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या शाळेने मोहित केले यात तत्कालीन सीईओ शैलेश नवल, माने,भोर, अशा अनेक वेळोवेळी रुजू झाले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी दहिगाव शाळेला भेटी देऊन विद्यार्थीचे शैक्षणिक गुणवत्ता, शाळेच्या प्रांगणातील उभारलेली निसर्ग सौंदर्य गोष्टीचे भरभरून कौतुक केले. १५ ऑगस्ट  ग्रामपंचायत कार्यालयाचे  ध्वजारोहण उपसरपंच मनिषा म्हस्के, श्री राम विद्यालयाचे ध्वजारोहण माजी सैनिक महादेव म्हस्के, सहकारी बँकेचे ध्वजारोहण गावातील जेष्ठ नागरिक तात्याभाऊ म्हस्के  यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषद शाळांचे ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पुंड यांच्या हस्ते करण्यात आले.दहिगाव मधील रामवाडी तरुण मंडळने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाणी बाॅटल, जेवणं ढबा, पिशवी असे साहित्य वाटप करण्यात आले.तसेचे सेवा सोसायटी वतीने गुणवत्ता विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला.बाळासाहेब आन्हाड यांनी वैयक्तिक इयत्ता दहावी प्रथम क्रमांक दुत्तीय तृतीय क्रमांक असे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम पारितोषिक दिले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बबन कावरे यांनी शाळेला पन्नास हजार रुपये देणगी दिली.तसेच मुलांना भविष्य वाटचालीसाठी शालेय करिअर मार्गदर्शन देखील करण्यात आले.लहान चिमुकल्यांना दहिगाव ग्रामपंचायत वतीने गोड जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला‌.आधुनिक युगात बरोबर चालण्यास जिल्हा परिषद शाळेतील सर्व कार्यक्रमाचे प्रेक्षपण युथ २४ न्युज  या युट्यूबवर चाईनलवर लाईव्ह दाखवण्यात आले.

या वेळी दहिगावचे सरपंच सुरेखा म्हस्के, उपसरपंच मनिषा म्हस्के,माजी सरपंच मधुकर म्हस्के, माजी उपसरपंच महेश म्हस्के, ट्रस्ट अध्यक्ष अनशाबापु म्हस्के, सेवा सोसायटी चेरमन सर्जेराव म्हस्के, व्हाईसचेरमन  दत्तात्रय बनकर, ग्रामसेवक स्वाती घोडके,गौतम हंबडेॅ,नागेश वाघ, संतोष आन्हाड, ह.भ.प.भाऊसाहेब आन्हाड, कृष्णा म्हस्के, रज्जाक शेख,ग्रा.सदस्य गणेश हिंगे, अनिल शिंदे,राहुल पोटरे,आयशा शेख, ग्रामपंचायत कर्मचारी रवी पोटरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !