लाच घेताना सरपंचासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत मधेच अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले !.


नगर(प्रतिनिधी):- नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातल्या कोकणगावच्या महिला सरपंचाला ४० हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. ४ लाख ६१ हजार ५६८ रुपयांच्या खर्चातून करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामात दहा टक्के ४६ हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ४० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारण्यात आली. या कारवाईत सरपंच आणि आणखी एका इसमाला अटक करण्यात आली.

उज्वला सतिष रजपूत (वय 32 वर्ष, सरपंच, कोकणगाव, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर रा- कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर)

आणि सतिष बबन रजपूत (वय 42 वर्ष, धंदा – शेती रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावं आहेत.

तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असुन, त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती,संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचा 4,61568/-₹ चा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता,तक्रारदार यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केले,

तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंटला जमा करण्याबाबत सरपंच व त्यांचे पती यांना विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46,000/-₹ ची लाच मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे दिनांक 10/07/2023 रोजी दिली.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 10/07/2023 रोजी कोकणगाव ग्रामपंचायत येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील लोकसेवक सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांचे कडे 46000/-₹ लाच मागणी करुन सदर लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले,बिल जमा झाल्यानंतर आज रोजी आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेऊन बोलविले असता कोकणगाव ग्रामपंचायत येथे आज रोजी सापळा लावण्यात आला,सदर सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक क्रमांक 1 यांनी आज रोजी ग्राम पंचायत कोकणगाव येथे सदर लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक (मो.न.9371957391), माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक (मो. नं. 9404333049) आणि नरेंद्र पवार (वाचक पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक (मो. नं. 9822627288) यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर

(मो.नं.7719044322), पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. अहमदनगर (मो. नं.7972547202) सापळा पथक – पोलीस अंमलदार, पोना/ रमेश चौधरी, पोकॉ/ बाबासाहेब कराड, सचिन सुदृक, रवी निमसे, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, राधा खेमनर चालक दशरथ लाड यांच्या पथकानं ही कारवाई केली

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !