नगर तालुक्यातील या गावातील तलाठी लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात !


नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील शेंडी येथील महिला तलाठी निकिता शिरसाठ यांना 50 हजार रुपयाची लाच घेताना रंग हात पकडले अँटीकरप्शन विभागा ने सोमवारी ही कारवाई केली आहे.

       अँटी करप्शन विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण लोखंडे यांची माहिती

*यशस्वी सापळा:- 

▶️ *युनिट -* अहमदनगर

▶️ *तक्रारदार-* पुरुष  वय- 35 वर्षे, 

रा. शेंडी, ता.नगर, जि.अहमदनगर

▶️ **आरोपी* =

१) निकिता जितेंद्र शिरसाठ, वय-46 वर्ष, पद- तलाठी सजा शेंडी,(वर्ग-3), ता.नगर, 

जि.अहमदनगर

2) संकेत रणजीत ससाणे वय-26 वर्ष, तलाठी शिरसाठ यांचे खाजगी मदतनीस, रा. निर्मल नगर, तपोवन रोड, अहमदनगर

▶️ *लाचेची मागणी-* 50,000/-₹ 

▶️ *लाच स्विकारली* 

50,000/ ₹

▶️ *हस्तगत रक्कम-* 50,000/-₹

▶️ *लाचेची मागणी -* ता.11/12/2023

▶️ *लाच स्विकारली* -ता.11/12/2023

▶️   *लाचेचे कारण* 

यातील तक्रारदार यांचे मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी श्रीमती शिरसाठ, तलाठी सजा शेंडी यांनी तक्रारदार यांचे कडे 50,000/- रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबतची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे आज दिनांक 11/12/2023 रोजी प्राप्त झाली होती, त्यानुसार आज रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता यातील आलोसे  शिरसाठ यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांचेकडे जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी 50,000/₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम त्यांचे खाजगी मदतनीस संकेत रणजीत ससाणे याच्याकडे देण्यास सांगितली. त्यानुसार आज दिनांक 11/12/2023 रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान भोसले अमृततुल्य नाष्टा सेंटर, नगर=छत्रपती संभाजी नगर रोड, अहमदनगर येथे आरोपी संकेत रणजीत ससाणे याने तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष 50,000/₹ लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर बाबत दोन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

▶️ *सापळा अधिकारी* : 

राजू आल्हाट,

पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर.

▶️  *सहाय्यक सापळा अधिकारी** शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर 

▶ *सापळा पथक:-  पोलीस अंमलदार 

PN राधा खेमनर, PC बाबासाहेब कराड, PC रवींद्र निमसे, चालक HC हारून शेख, HC दशरथ लाड.

 **पर्यवेक्षण अधिकारी* श्री.प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि.

अहमदनगर

▶ **मार्गदर्शक* -*मा.श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

▶मा. श्री.माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

▶️ श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

▶ **आरोपीचे सक्षम अधिकारी:* 

*मा.जिल्हाधिकारी,

अहमदनगर

-------•••••••••••••••••••••••-----

 *सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर





टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !