विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेमधे कु.वीरा नितेश कातोरेचा प्रथम क्रमांक !


श्रीगोंदा(प्रतिनिधी) :- शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय  विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा 2023-24 मधे  वैयक्तिक गीत गायन किलबिल गटामधे तालुकास्तरावर कु. वीरा नितेश कातोरे हीला प्रथम क्रमांक मिळाला असून जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

          याबाबत अधिक माहिती अशी की,  श्रीगोंदा येथे पार पडलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धेमधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोस वस्ती तालुका श्रीगोंदा येथील विद्यार्थिनी कु. विरा नितेश कातोरे (इयत्ता दुसरी) हिचा किलबिल गटातून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला. यासाठी संगीत शिक्षक मार्गदर्शक अविनाश बावडकर (मिरजगाव) यांनी मार्गदर्शन केले.

तसेच वर्ग  शिक्षिका.वैशाली गुंजाळ  आणि मुख्याध्यापक प्रफुल्लसिंग परदेशी यांनी विशेष श्रम घेतले.

             यावेळी कु.वीरा नितेश कातोरे हीने मिळवलेल्या यशाबद्दल घोगरगाव व मांडवगण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. दत्तात्रय कडूस यांनी तीचे कौतुक करत अभिनंदन केले. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु.वीरा चे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कु. वीरा ही शिक्षक दांम्पत्य नितेश दशरथ कातोरे व निता नितेश कातोरे (कामरगाव) यांची कन्या आहे.

📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !