सीटू संलग्न जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचा हळदीकुंकू कार्यक्रम व तालुका मेळावा संपन्न.
अहिल्यानगर(प्रतिनिधी):
सीटू संलग्न जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम व तालुका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्हा कमिटी सदस्य तथा जिल्ह्यात संघटनेचा भक्कम पाया रोवणाऱ्या कॉम्रेड शीतलताई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉम्रेड नंदाताई बांगर, जिल्हा सचिव कॉम्रेड संतोष शिर्के, जिल्हा कोषाध्यक्षा कॉम्रेड हेमलता शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मार्गदर्शन करत संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
याचवेळी सन २०२५ साठी सभासद वर्गणी भरण्यासाठी विशेष कॅम्प तसेच कोर्ट फंडासाठी आवश्यक कागदपत्र संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॉम्रेड संतोष शिर्के, कॉम्रेड कल्याणी रायकर, कॉम्रेड अनिल रायकर, कॉम्रेड आफरीन सय्यद, कॉम्रेड अर्चना उमाप, कॉम्रेड रवी इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा