अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा 'स्नेहबंध' तर्फे सत्कार

 

(अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा शाल व वृक्ष देऊन सत्कार करताना 'स्नेहबंध'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.)

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी महापौर सौ. गाडे यांना शाल व वृक्ष देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर अधिक स्वच्छ, हरित व प्रगत शहर घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाच्या माध्यमातून हा सत्कार अधिक अर्थपूर्ण ठरला.

महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकाभिमुख उपक्रम, विकासकामे व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

*********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .