कामरगाव मधील ज्येष्ठ नागरीक चंद्रकांत साठे यांचे वृद्धापकाळाने निधन. दशक्रिया विधी १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी होणार.

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथील जेष्ठ नागरीक चंद्रकांत कान्हू साठे (वय ७९) यांचे ९ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने दुखः द निधन झाले. गावातील विविध कार्यकारी  सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात त्यांनी सेल्समन म्हणून ४० वर्ष उत्कृष्ट  काम केले. गावातील सामाजिक उपक्रमात त्यांचे विशेष योगदान होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  माजी सैनिक अशोकराव साठे, व्यवसायिक भाऊसाहेब साठे,  उपक्रमशील शिक्षक संतोष साठे यांचे ते वडील होते. गावातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक उपक्रमात त्यांच्या परिवाराचा मोलाचा सहभाग असतो. कामरगाव येथील अमरधाममध्ये दि १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी सकाळी ८ वा त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .