खंडणी मागणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड; उद्योजकांकडून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचा सत्कार.
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजकांना खंडणी मागीतल्याची तक्रार उदयोजकांनी थेट पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली होती. पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करत खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उनवणे, राजेश पाटील या संशयित आरोपींची एम आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व त्यांच्या टीमने धिंड काढली.
याप्रकरणी आमी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा आज (ता. १९) सत्कार करण्यात आला. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे. यावेळी एमआयडीसीचे प्रभारी अधिकारी माणिक चौधरी उपस्थित होते.
*********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा