माझी वसुंधरा ४.० व ५.० अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग दोन वर्षे पुरस्कार ; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते ११ कोटींचे पुरस्कार महानगरपालिकेला प्रदान. ; शहरासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे चांगली कामगिरी : आयुक्त यशवंत डांगे .
अहिल्यानगर( प्रतिनिधी):- - राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये पुरस्कार मिळाला आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला ५ कोटींचे तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच, मागील वर्षी माझी वसुंधरा ४.० अभियानातही राज्यात ६ कोटींचा दुसरा पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही ११ कोटींच्या पुरस्कारांचे वितरण राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव व आयुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुंबई येथील कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. माझी वसुंधरा अभियानात गेली दोन वर्षे महानगरपालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवला. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभाग व सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे महानगरपालिका ही चांगली कामगिरी करू शकली, असे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केल.
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा