शेतकऱ्याच्या शेतातील संत्रा चोरणारा काही तासात गजाआड ! स.पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या टीमची धडक कारवाई.

अहिल्यानगर(प्रतिनिधी):- : मिळालेल्या माहितीनुसार दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दशमीगव्हाण तालुका- जिल्हा अहिल्यानगर गावच्या शिवारात शेतकरी पांडुरंग मस्के राहणार उक्कडगाव यांनी त्यांच्या संत्र्यांचे शेतातील संत्रा विक्री करता येण्यासाठी त्यांनी शेतात ११० मोकळे कॅरेट ठेवले होते व ते २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यास सुमारास शेतात संत्र काढण्यासाठी गेले असता तेथे १२ मोकळे कॅरेट शिल्लक होते उर्वरित २८ कॅरेट संत्र्याचे झाडावरील फळे दिसले नाहीत तेव्हा त्यांना शेतात टेम्पोचे टायर मार्क दिसल्याने त्यांना त्यांच्या शेतातील संत्रा कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाली त्या अनुषंगाने त्यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला १२०००० (एक लाख वीस हजार रुपये ) किमतीचा संत्रा व ४९००( चार हजार नऊशे रुपये) किमतीचे कॅरेट चोरून नेल्याची फिरत देण्याकरता हजर झाले सदर अनुषंगाने नगर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 105/ 2026 बी एन एस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी गोपनीय बातमी मार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा इरफान बाबा शेख राहणार निंबोडी हल्ली राहणार मुकुंद नगर तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी त्यांच्या साथीदारासह केला आहे

सदरचा इसम तालुका जिल्हा नगर येथे संत्रा विकण्यासाठी गेला आहे, तेव्हा पोलीस अधिकारी गणेश वारुळे यांनी सदर इसमा बाबत पोलीस स्टेशनच्या तपास पथकास माहिती दिली,त्यानंतर पथकाने ही कारवाई केली त्यातील तब्बल ३२०४५० रुपये (तीन लाख वीस हजार चारशे पन्नास) रुपयांचा मुद्देमाला सह आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले सदरची कारवाई ही अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्गे, उपविभागीय पोलिस श्री शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी ही कारवाई दत्तात्रय इंगळे, शैलेश सरोदे, महेश भवार ,नितीन शिंदे ,सुभाष थोरात, मंगेश खरमाळे ,रघुनाथ कुलांगे, विक्रांत भालसिंग, विकास शिंदे यांच्या पथकाने अतिशय गोपनीय माहिती ठेवून ही कारवाई केली त्यामुळे संपूर्ण नगर तालुक्यातून नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश वारुळे व त्यांच्या पथकाचे अभिनंदन होत आहे.


 पोलीसांच्या तत्परतेने शेतकऱ्यांला मिळाला न्याय. 

घटनेचे गांभीर्य ओळखून आणि शेतकऱ्यांच्या घामाचा दाम त्यांना मिळुन देण्यासाठी नगर तालुक्याचा नव्याने पदभार घेतलेले सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती काढत सदर गुन्हा हा इरफान शेख आणि साथीदाराने केल्याचे निष्पन्न केले. इरफन शेख याचे लोकेशन काढले असता सायंकाळी तो चोरलेले संत्रे विकण्यासाठी शेंडी परीसरात गेला असल्याची माहिती मिळाली वारुळे यांनी लगेच पथकाला कारवाई साठी पाठविले पथकाने शेंडी परीसरात जाउन आरोपी इरफान शेख यास चोरलेले संत्रे टेम्पोमध्ये घेवुन विक्रीसाठी जात असताना पकडले त्यांच्याकडून संत्रे व टेम्पो असा 3 लाख 20 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई स.पो.नि.गणेश वारुळे यांच्यासह पोलिस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, शैलेश सरोदे,महेश भवार,नितीन शिंदे, शुभाष थोरात, मंगेश खरमाळे,रघुनाथ कुलांगे,विक्रांत भालसिंग, विकास शिंदे यांच्या पथकाने केली असल्याचे समजते.

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.