नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंचे फुलांच्या वर्षावात स्वागत स्लग -साकत येथे ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक. ;
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-
साकत खुर्द (ता. नगर) येथील सुभाष पवार, सुभाष शिंदे, मोहनतात्या चितळकर या वारकऱ्यांनी पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार व स्वागत करण्यात आले. पायी हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास करत चार महिन्याच्या कालावधीत कालावधीत त्यांनी दररोज किमान दहा ते पंधरा किलोमीटरचे अंतर पार करत आपली परिक्रमा यशस्वी पूर्ण केली. परिक्रमेच्या दरम्यान त्यांनी मार्गावरील विविध मंदिरे, आश्रम व देवस्थाने यांचे दर्शन घेतले.
हा प्रवास जंगल भागातून झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऊन, वारा, थंडी तसेच शारीरिक कष्ट असूनही त्यांनी कोणतीही तक्रार न करता अत्यंत श्रद्धा, संयम व आत्मविश्वासाने हा खडतर प्रवास पूर्ण केला. चार महिन्याची खडतर
परिक्रमा पूर्ण करून परतीचा प्रवास करून साकतखुर्द येथे त्यांचे गुरुवारी ( दि. २६) आगमन झाले. आगमन होताच ग्रामस्थांनी तसेच नातेवाईकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच फुलांचा वर्षाव करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांचा मा. पं. स. सदस्य संभाजी कासार, कैलास कासार यांच्या हस्ते
फेटा, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीप्रसंगी मा. सरपंच भाऊसाहेब चितळकर, भाऊसाहेब मुंगसे, धोंडिभाऊ बोचरे, राजाराम बोचरे, विठ्ठल वाघमारे, गोवर्धन पवार, माणिक पवार,अर्जुन चितळकर,शरद शिंदे, रामदास दरेकर, भानुदास पवार, तात्या वाघमोडे, सोमनाथ शिंदे ,उत्तम शेलार, किसनआप्पा निमसे , शरद निमसे, पांडुरंग केदारे, सर्जेराव पवार, सोमनाथ शिंदे, शेखर बोचरे, माणिक शिंदे,चंद्रभान निमसे, विलास शिंदे, रामदास शिंदे, कैलास शिंदे, संजय शिंदे, भीमा शिंदे, अर्जुन शिंदे, आप्पा चितळकर,
सोमनाथ पवार, मारुती पवार, शिवाजी बोचरे, नाना वाघमोडे, प्रतीक कोतकर, सोहम मुंगसे, ओम मुंगसे, तेजस पवार, अविनाश पवार, मोहन बोचरे, रोहिदास निमसे, दत्ताआबा म्हस्के, मोहन निमसे, भाऊसाहेब निमसे, बापू निमसे, कृष्णा मुंगसे यांच्यासह मोठ्या संख्येने भजनी मंडळ, महिला-पुरुष, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, Follow व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा