वरखेडच्या महालक्ष्मी मातेचे ४ लाख भाविकांनी घेतले दर्शन. यात्रोत्सव उत्साहात संपन्न.
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या मुख्य दिवशी काल मंगळवारी सुमारे चार लाख भाविकांनी दर्शन घेतले.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीचा यात्रा उत्सव उत्साहाच्या वातावरणात पार पडला.धर्मदाय आयुक्त जयश्री पाखरे यांची निरीक्षक म्हणून वरखेड देवस्थानला नेमणूक केली. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी देवीची विधीवत पूजा करून दर्शन घेतले.श्री क्षेत्र वरखेड येथील भाविकांनी रात्री देवी मंदिरात होम करुन देवीची पुजा व जागर केला. 6 एप्रिल रोजी गावकऱ्यांनी पैठण येथून आणलेल्या देवीच्या पालखीची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढुन पालखी मंदिरात नेली.
गावातील महिलांनी मिरवणुकीदरम्यान पालखीची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. देवीची पालखी मंदिरामध्ये आणून मंदिर समिती व गावकऱ्यांच्या वतीने पुजा करण्यांत आली. देवी महोत्सवानिमित्त परंपरेने संपूर्ण गावातून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला.
नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असल्याने भाविक मोठ्या संख्येने नवसपूर्ती करतात. यात्रेनिमित्त राज्यातून चार लाख भाविकांनी हजेरी लावून दर्शन घेतले. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या.
यात्रेचे खास वैशिष्ट्य असलेले विविध रंगी नटलेले देवीचे पोतराज खास अकर्षण ठरले. देवीला भाविक वाजतगाजत नैवेद्य घेऊन जाताना पोतरांजाची गाणी व डफावरील नाचाने भाविक मंत्रमुग्ध होताना दिसत होते. विद्युत मंडळ यांनी 48 तास लाईट ची व्यवस्था केली होती.
यात्रेनिमित्त नेवासा नगर श्रीरामपूर गंगापूर पाथर्डी शेवगाव आगारातून बसेस सोडण्यात आल्या होत्या. भाविकांचा ओघ जास्त असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे पोलिसांची वाहतू सुरळीत करताना दमछाक होत होती. महिलांच्या सुरेक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरांची मदत होत होती.यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सरपंच विनोद ढोकणे उपसरपंच विलास उंद्रे ग्रामसेवक डेंगळे भाऊसाहेब पोलीस पाटील संतोष घुंगासे,
विद्युत मंडळ यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील ,तहसीलदार संजय बिरेदार यांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष परिश्रम घेतले.
********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, Follow व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा