जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची भोरवाडी ग्रामस्थांची मागणी. सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे यांचे तहसीलदारांना निवेदन.
अहिल्यानगर /प्रतिनिधी: नगर तालुक्यातील मौजे भोरवाडी परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी तातडीने चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे तसेच प्रगतशील शेतकरी प्रदीप वाघ व बापूसाहेब वायळ यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देत केली आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर तहसिलदार ढवळे,नायब तहसिलदार अभिजित वांढेकर उपस्थित होते.
Adv
याबाबत तहसीलदार नगर यांच्या नावे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भोरवाडी परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी आवश्यक असलेल्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पशुपालकांकडे शेती व पशुपालन हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन असून, सध्या जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधनाच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जनावरांना चारा उपलब्ध न झाल्यास पशुपालकांना जनावरे विकण्याची किंवा स्थलांतरित करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा तसेच शासनाच्या निकषांनुसार भोरवाडी येथे जनावरांसाठी चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश पानसरे, प्रदीप वाघ व बापूसाहेब वायळ यांनी केली आहे.
चारा छावणी सुरू होईपर्यंत पशुपालकांना आवश्यकतेनुसार चारा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा