गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर ला बंदी- आदेशाचा भंग केल्यास कडक कारवाई ; आपल्या भारतीय संस्कृतीतील पारंपारिक वाद्याचा वापर करावा-जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन.

 

अहिल्यानगर/प्रतिनिधी -जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणासह  नियमांचे पालन करावे. प्लाझ्मा-लेझरचा वापर करू नये तसेच मोठ्या आवाजातील डीजे न वाजवता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचा भंग करून ध्वनी प्रदूषण केल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला.

Adv

 अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाचे स्वागत करताना अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत तसेच कमी आवाजातील साऊंड सिस्टीमचा वापर करीत पोलिसांना सहकार्य केले. आता गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू झाली असून, गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजातील डीजे, प्लाझ्मा-लेझर आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, मंडळांचे प्रमुख तसेच डीजे चालक व मालक यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत त्यांचे मत परिवर्तन करण्याची खूप प्रयत्न केले . या बैठकांमध्ये मिरवणुकीदरम्यान डीजेचा वापर करू नये, प्लाझ्मा लेझर बंद ठेवावेत तसेच ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उपकरणांचा वापर टाळावा, संबंधित पोलीस स्टेशन यांनी नोटीसा संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असल्याने मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवावे, असे आवाहन अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी ढोल-ताशे, लेझीम आपल्या भारतीय पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करताना ध्वनी मर्यादांचेही पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 मोठ्या आवाजातील डीजेमुळे लहान मुले वृद्ध व्यक्ती तसेच नागरिक यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी या ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

विसर्जन मिरवणुकीत उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून आवश्यक ती दक्षता घेतली.

मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करणे प्रत्येक मंडळाची संबंधित यंत्रणेची  जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजविणे किंवा प्लाझ्मा-लेझरचा वापर करणे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अधीक्षक सुदर्शन यांनी दिला आहे.

*******************************

सर्व गणेश मंडळांना विनंती केलेली आहे की त्यांनी डिजेचा वापर करू नये.

 आतापर्यंत बरेच ठिकाणी कारवाई सुरू पण झालेली आहे. सर्वांना क्लिअर मेसेज दिलेला आहे की आवाजाची दिलेली मर्यादा पाळा नाहीतर कारवाईला सामोरे जा. असा इशारा अहिल्यानगर अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला आहे.

*********************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला  Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv



टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .