पोस्ट्स

बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन होणार जाहीर !

इमेज
मुंबई/प्रतिनिधी : – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या गुरुवारी दि. २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर उद्या दुपारी २ नंतर उपलब्ध होतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती,पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या वेबसाईटवर पाहता येणार निकाल १. mahresult.nic.in २. https://hsc.mahresults.org.in ३. http://hscresult.mkcl.org www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

अकोले बाजार समितीच्या सभापतीपदी भानुदास तिकांडे तर उपाध्यक्षपदी रोहिदास भोर यांची वर्णी.

इमेज
 अहमदनगर ( प्रतिनिधी):- नगर जिल्ह्यातील अकोले बाजार समितीच्या सभापतीपदी भानुदास तिकांडे तर उपसभापती पदी रोहिदास भोर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी आज अध्यासी अधिकारी शिरीष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत सभापतीपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी रोहिदास भोर यांची वर्णी लागली आहे.

शिराढोण शिवारात चार वाहनांचा विचित्र अपघात.

इमेज
नगर प्रतिनिधी -नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक ५१६अ चे  संथ कामाच्या दिरंगाई मुळें  दररोज किरकोळ अपघात होत आहेत.पंरतु आज शिराढोण पेट्रोल पंप जवळील किनार हाँटेल नजदीक रस्ता काम चालू आहे.नगरच्या दिशेने दोन वाहन दोन वाहने रुईछत्तीसी दिशेने फलक दररोज आदल बदल  लक्षात न आल्याने दोन वाहने एका दिशेने दुसरे वाहनं विरुद्ध दिशेने आल्याने  यात बचाव करण्यासाठी दिशेत बदल केल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी नागरिक म्हणे होते.महामंडळ बस क्रमांक एम एच बीटी  १३८७,एक आयशर  क्रमांक एम एच १६ एम  २८२३,टेम्पो,पिक अप, एक दुचाकी क्रमांक एम एच १६ बी आर, ०४०८ या ठिकाणी दिशादर्शक फलक बदल व वाहतूक व्यवस्था अयोग्य नियोजन मुळें रस्ता निर्देशक फलक योग्य वापर न केल्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातात चार व्यक्ती गंभीर जखमी झाले. या जखमी नागरिकांना मदतीला शिराढोण गावातील व शेतकरी व प्रवासी मदतीला धावून आले परंतु आपत्कालीन व्यवस्थापन १०८ रूग्णवाहिका घटनास्थळी तब्बल पाऊण तास उशिरा आल्याने अपघात व्यक्तीना रुग्णालयात नेण्यासाठी मोठा वेळ प्रतिक्षा करावी लागली.१०८ रुग्णवाहिका कमीत कमी १८ मिनिट

अकोळनेरच्या सुपुत्राची UPSC परीक्षेत बाजी. ; महारूद्र जगन्नाथ भोर UPSC सिव्हील सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण !

इमेज
 नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील अकोळनेर गावचे सुपुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे ज्येष्ठ चिरंजीव महारूद्र भोर हे  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हील सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल मंगळवार दि.२३ मे रोजी जाहीर झाला असून यामध्ये नगर तालुक्यातील अकोळनेर गावचे रहिवासी व सध्या  भिस्तबाग, अहमदनगर येथे वास्तव्यास असलेले महारुद्र जगन्नाथ भोर हे उत्तीर्ण झाले आहेत.  महारुद्र भोर यांनी सिंहगड कॉलेज पुणे येथून बी.ई. मेकॅनिकल ची पदवी घेतली आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, सावेडी अहमदनगर येथे झालेले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण आर.वाय.के. कॉलेज, नाशिक येथून पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे ते जेष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच्या निवडीबद्दल द भोर फाउंडेशन अहमदनगर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा व राज्यभरातून कौतुक होत आहे.

नारायणडोहो येथे शासन आपल्या दारी अभियानाचे आयोजन.

इमेज
नगर-प्रतिनिधी:-  नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे  नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होऊन शासनाशी संबंधित कामे करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.  शासन आपल्या दारी या अभियनांतर्गत नारायणडोहो गावात सर्व नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये विशेषत: नवीन आधार कार्ड काढणे, आधारकार्डामध्ये दुरुस्ती करणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती तसेच शिधावाटप पुस्तकावरील नाव कमी करणे व नावे वाढविणे, खराब झालेली शिधापत्रिका बदलणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग, राष्ट्रीय निवृत्ती सेवा योजना,  नवीन मतदार नोंदणी,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला,जात प्रमाणपत्र,जन्म मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी प्रमाणपत्र,  दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड नोंदणी करणे, तसेच नारायणडोहो विविध  योजना व कोविड प्रतिबंधात्मक लस देखील नागरिकांसाठी (शासन आपल्या दारी) या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.  याठिकाणी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे.महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करणे बी बियाणे, यंत्र औजारे,म

कांदा चाळीसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान – रोहयो मंत्री संदिपान भुमरे

इमेज
मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. परंतु कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेले गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील कांदा काढला की लगेच विकावालागतो. कांद्याचे उत्पादन ठरावीक हंगामात येते. मागणी मात्र वर्षभर सारखीच असते. कांद्याचे पीक निघाल्यावर मागणी नसल्यामुळे बाजारात कांद्याचा भाव पडतो. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावातील चढ-उतार होण्यापासून सुरक्षा, स्थानिक बाजारपेठेत योग्य दरात पुरवठा व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले. कांदा ही एक जीवंत वस्तू आहे. तिचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न

नगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भाऊसाहेब बोठे तर उपसभापती पदी रभाजी सुळ यांची निवड !

इमेज
  नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोठे व उपसभापती पदी पिंपरी घुमट गावचे सरपंच रभाजी सुळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदा कोणाची व वर्णी लागणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. यावेळी वाळकी गटावर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांनी विश्वास दाखवला असून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाऊसाहेब बोठे तर उपसभापतीपदी पिंपरी घुमट गावचे सरपंच रभाजी सुळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. *शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन,नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र जबाबदारी पेलणार असल्याचे सभापती व उपसभापती यांनी सांगितले...

फॉलोअर