पैठण ते नारायणडोह कावड यात्रा. नारायणडोह यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा.

(Advrt) ######################################### नारायणडोह प्रतिनिधी (रफिक शेख):- गुढीपाडव्यानिमित्त शहरी भागात हल्ली शोभायात्रा निघतात मात्र ग्रामीण भागात आजही कावड यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते श्री चांगदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नारायण डोह गावात तर शेकडो वर्षांपासून गुढीपाडव्याच पैठण धरणातलं पाणी कावडीने आणून देवाला वाहीले जाते. तब्बल 110 किलोमीटरच्या पायी कावड यात्रेचे पथ्यही कठोर असतात. तळपत्या उन्हात अनवाणी पायांनी या कावडी अवघ्या तीन दिवसात पैठण वरून नारायणडोहला पोहोचतात. या कावड यात्रे दिवशी पोहोचताच ग्रामस्थ त्यांचे यथोचित स्वागत करतात. नंतर गंगाजलाने श्री चांगदेव महाराजांना स्नान घातले जाते.देवाच्या अभिषेकानंतर मंदिरात समोरच गुरुजींकडून सामनिक पंचांग वाचन होऊन पाऊस मानाचा अंदाज वर्तवला जातो.तसेच पाडव्याच्या मुहूर्तावरच साल गाड्यांची बिदाई हि निश्चित होते अशी ही शेकडो वर्षांची परंपरा ग्राम संस्कृती नारायणडोहो गावाने आजही अविरतपणे सुरू ठेवली आहे. भारतीय नववर्षारंभ दिवस म्हणजे चैत्र शु || प्रतिपदा .साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त. प्रस्तुत दिवस म्हणजे न...