भूगोलाची व्याप्ती मातीपासून ते उपग्रहापर्यंत!" - न्यू आर्ट्स पारनेर महाविद्यालयात 'जिओ फेस्ट' उत्साहात संपन्न.
पारनेर(प्रतिनिधी):- आजच्या युगात भूगोल हा केवळ नकाशापुरता मर्यादित राहिला नसून त्याची व्याप्ती आता माती ते उपग्रह अशी प्रचंड विस्तारली आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज आपल्या पायाखालच्या मातीच्या कणापासून ते अंतराळातील उपग्रहापर्यंतचा अभ्यास भूगोलात सामावलेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ भूगोल अभ्यासक प्रा. पांडुरंग चौधरी यांनी केले. पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे आयोजित भूगोल दिन आणि जिओ फेस्ट कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी जीवनाशी निगडीत भौगोलिक घटना आणि घडामोडींवर आधारित विविध पोस्टर्स आणि मॉडेल्सचे प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेली कल्पक मॉडेल्स आणि विषयाची मांडणी पाहून उपस्थितांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. चौधरी म्हणाले, पृथ्वीचा विचार करता भारत देश एका ट...