शासकीय योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक. प्रांत अधिकारी सुधीर पाटील.
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- दि.05 शासनाच्या सर्वच योजना समाजहिताच्या असतात. त्या लोकाभिमुख करण्यासाठी व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व पदाधिकार्यांनी संयुक्तपणे केले पाहिजे त्यासाठी जास्तीचा लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत उपविभागीय अधिकारी तथा प्रांत सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. *छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य* अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्व तयारी करण्यासाठी अहिल्यानगर तालुक्यातील चास मंडळातंर्गत अकरा गावातील सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, सेतूचालक, सामाजिक कार्यकर्ते, ग्राम महसूल अधिकारी, रेशन दुकानदार यांची संयुक्त कार्यशाळा प्रांत अधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चास येथे दिनांक 03/03/2026 रोजी आयोजित केली होती. प्रारंभी मंडळाधिकारी वैशाली हिरवे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे यांनी प्रास्ताविक भाषणात अभियानाचा हेतू स्पष्ट केला. 09 एप्रिल 2026 रोजी होणार्या महाराजस्व अभियानात 7/12 उताऱ्यावरील मयत खातेदारांच्या वारस नोंदी करून तो उतारा जिवंत करणे, उताऱ्यावरून ...