पोस्ट्स

गाडकवाडी, कुरणवस्ती, ठाकरवाडी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

इमेज
  राहुरी (प्रतिनिधी):-  जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र चे *संस्थापक निलेशजी सांबारे* यांच्या संकल्पनेतून दि. 3/09/2025 बुधवार रोजी देवळाली प्रवरा येथील *श्री. दिपकभाऊ त्रिभुवन* यांच्या वाढदिवसानिमित्त गाडकवाडी येथील  सामाजिक कार्यकर्ते पोपटजी गागरे यांच्या प्रयत्नांतून *गाडकवाडी* शाळेत गाडकवाडी, कुरणवस्ती व ठाकरवाडी या तिन्ही  शाळेतील विदयार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले.  याप्रसंगी संतकवी महिपती महाराज देवस्थान चे विश्वस्त ह. भ. प. बाबासाहेब वाळूंज,साई दिपक ञिभुवन,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गंगाधर हारदे, जि प प्रा शा गाडकवाडी च्या मुख्याध्यापिका सौ.लता गायकवाड ,कुरणवस्ती शाळेचे मुख्याधापक प्रमोद झावरे, सहशिक्षक उदय पाचपुते, लाजरस शिंदे, अरुण राहिंज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संतकवी महिपती महाराज देवस्थानचे विश्वस्त ह . भ. प . बाबासाहेब वाळुंज यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे महाराष्ट्रातील सामाजिक कामाचा परिचय करून दिला. तसेच राहुरी तालुक्यात सुमारे ५ लाख वह्या वाटप करणार असल्याचे सांगितले. कार्यकमाचे सुत्रसंचालन उदय पाचपुत...

प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण द्या -जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

इमेज
  अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमधून आरोग्य सेवा अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मिळाव्यात, यासाठी आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवकुमार वलांडे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार नेहेरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद काकडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र कानडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवीदास कोकाटे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर समान ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्थापन केलेल्या ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असलेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. समितीच्या माध्यमातून ना...

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणेंचा कौतुकास्पद उपक्रम. कामरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

इमेज
  नगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील मौजे कामरगाव येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी शालेय विदयार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम राबविला.         याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामरगाव येथील बालवाडी मधे 11 वर्ष व अंगणवाडीमधे 22 वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेतलेल्या सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पुष्पाताई सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी. याकरिता दि 14 ऑगष्ट रोजी विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले.        मिळालेल्या माहितीनुसार, त्या मागील 4 वर्षांपासून कै.रामचंद्र सोनवणे व मालनबाई सोनवणे या त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम कुठलाही गाजावाजा न करता तसेच कुठलाही प्रसिद्धी सोस न बाळगता  यशस्वीपणे राबवत आहेत.           कामरगाव जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी पुष्पात...

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तीन नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ.

इमेज
  अहिल्यानगर (प्रतिनिधी) – भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. त्यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार व धनादेश वितरण तसेच उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सेना दलात कार्यरत असताना वीरमरण आलेले शहीद जवान रामचंद्र लहू साठे (लोणी हवेली, ता. पारनेर), रामदास साहेबराव बढे (मेंढवण, ता. संगमनेर) व संदीप पांडुरंग गायकर (मु. पो. ब्राम्हणवाडा, ता. अकोले) यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला. जिल्ह्यात मे म...

कामरगावचे सुपुत्र साहिल साठे यांची भारतीय नौदलात सब-लेफ्टिनंट (क्लास वन गॅझेटेड अधिकारी) पदी निवड. कामरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. साठे परिवाराची तीन पीढया भारतीय सैन्य दलात सेवा.

इमेज
जाहिरात...👇🏻 बातमी....👇🏻 अहिल्यानगर (हेमंत साठे):- तालुक्यातील कामरगावचे सुपुत्र तथा पोलीस दलात कार्यरत असलेले उपनिरीक्षक अनिल बबन साठे यांचे सुपुत्र साहिल साठे यांनी भारतीय सैन्यदलात (Indian Navy) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (ssc) या परिक्षेत   यश प्राप्त केले आहे. साहिल यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट(कमिशन्ड अधिकारी) म्हणून निवड झाली आहे. साहिल अनिल साठे यांचे पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण मालवणयेथील रोझरी इंग्लिश स्कुल मधे झाले. दहावीच्या परिक्षेत साहिलने 95% गुण मिळवले. भोंसला मिलिटरी स्कुल, नाशिक येथे प्रवेश घेत बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. बारावी नंतर वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथे कॉम्प्युटर इंजिनिअरींग ची (BE) पदवी प्राप्त केली. साहिल हे मालवण येथे सागरी सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे व भरड नाका येथील फॅशन गॅलेक्सी के वस्त्रदालनाचे सर्वेसर्वा शीतल साठे यांचा मुलगा आहे.         साहिल यांचे आजोबा बबन साठे हे भारतीय सैन्यदलात होते. ते सेवा निवृत्त (माजी) सैनिक असून साहिल यांचे वडील हे भारतीय नौदलातून सेवानिवृत्तीनंतर पोलीस दलात कार्यर...

कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून ऋतुजा साठे व शाहरूख शेख यांचा सन्मान.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथील शिक्षण विभागातील माजी विस्तार अधिकारी मनसुख  शेख  यांचे चिरंजीव  शाहरुख शेख यांची महिन्द्रा डिफेन्स. मधे प्रबंधक पदावर नियुक्ती झाली. त्यानिमित्त तसेच के एस बी कंपनीत स्टोअर मॅनेजर पदी कार्यरत असणारे अविनाश साठे यांची कन्या ऋतुजा यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागात असिस्टंट इंजिनिअर पदावर नियुक्ती झाली. कामरगावच्या  या दोन्ही भूमीपुत्रांचा सत्कार कामरगांव विविध कार्यकारी सोसायटी लि. कामरगांव यांच्या वतीने दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आला . या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक रावजीभाऊ ठोकळ, ज्येष्ठ नागरीक लक्ष्मण शेळके , प्रगतीशील शेतकरी गोरख साठे , भाऊसाहेब दळवी , मथुजी झरेकर, प्रा.संभाजी कातोरे सर व बन्सी ठोकळ,  संपत ठोकळ, अंबादास रोहकले व विशाल साठे , बापू थिटे, संतोष साठे व  ग्रामस्थ इ . मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . सदर कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन अनिल आंधळे व व्हा. चेअरमन  श्री. रमेश साठे सर, संचालक तथा मा सरपंच रावसाहेब साठे , मा चेअरमन शिवाजी साठे, मा. चेअरमन सुनिल चौधरी ...

सामाजिक कार्याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

इमेज
अहिल्यानगर प्रतिनिधी:- सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, वंचित, गरजू अशा विविध घटकांतील नागरिकांना तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सामाजिक कार्याबद्दल अहिल्यानगरच्या लष्करातील सप्लाय डेपो रेजिमेंटतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मेजर रोहित कुमार, सुभेदार मेजर संजयसिंग मलिक, कॅप्टन अंकित यांनी डॉ. उद्धव शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल त्यांचा शाल व पुस्तक देऊन गौरव केला. पाठीवर पडणारी कौतुकाची थाप घडवू शकते इतिहास ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण कायम ऋणी असतो. हे समाजऋण फेडण्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी स्नेहबंधच्या माध्यमातून काम करत आहे. या कार्याबद्दल आज लष्करातील सप्लाय डेपो रेजिमेंटने सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार. प्रोत्साहन माणसाला बळ देतं. योग्य वेळी पाठीवर पडणारी कौतुकाची थाप. येणाऱ्या काळात इतिहास घडवू शकते, अशी प्रतिक्रिया डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी दिली.

फॉलोअर