पिक विमा शेतकऱ्यांना या तारखेला फिक्स मिळणार !
1) भारतीय कृषि विमा कंपनी, 2)एचडीएफसी अर्गो.
3)आयसीआयसीआय लोंबार्ड.4)युनायटेड इंडिया कंपनी.
5)बजाज अलियान्झ.या पाच विमा कंपन्यांमार्फत महाराष्ट्रा मधे प्रधान मंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यामधे प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकरी आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा काढून घेत असतात.पिकांचे नुकसान झाले कि पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई म्हणून आर्थिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.परंतु यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस द्यावी लागते. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीची शहानिशा करतात. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची नुकसानीची माहिती दिल्यानंतर देखील पिक विमा कंपनी त्याची दखल घेत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.
तसेच अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठीचे अर्ज विविध कारणे दाखवून पिक विमा कंपन्यांनी फेटाळल्याच्या तक्रारी येत आहेत.या कारणांमुळे १५ दिवसांत या विमा कंपन्यांनी या प्रकरणी फेटाळलेल्या अर्जांची पुन:तपासणी करुन कार्यवाही करण्यास संबंधित कंपन्यांना निर्देश कृषी मंत्री यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत.
यामधे पिक विमा हा एकूण ६३,४०,००० लाभार्थ्यांना २ हजार ८२२ कोटी ३२ लाख रुपयांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. २ हजार ३०५ कोटी रुपये ५४ लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप देखील करण्यात आली असून उर्वरित नुकसानभरपाई वाटप सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही त्यांना लवकरच म्हणजेच ३१ मे पर्यंत पिक विमा मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती देण्यात आली आहे. ३१ मे पिक विमा मिळण्याची तारीख जाहीर करण्यात आली असल्याने लवकरच शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा मिळणार असल्याची आशा निर्माण झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा