सुपा एमआयडीसीतील वायुप्रदूषण रोखा; अन्यथा खळखट्याक आंदोलन !
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील नगर पुणेे महामार्गा लगत असणाऱ्या सुपा एम आय डी सी मध्ये गणराज इम्पॅक्ट प्रा. लि. ही कंपनी वाघुंडे खुर्द हद्दीत नगर-पुणे हायवे रोड लगत आहे. या कंपनीतून न घणारा धूर खूप घातक आहे.
त्या धुरा मधून खूप घातक बर आणि खाक ही महामार्गावर व परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या गाडीतील प्रवासी तसेच शेतकऱ्यांच्या पिकावर आणि शेजारील हॉटेल वरील अन्न पदार्थावर बसते आणि हे अन्न खाल्ल्यावर शरीरावर घातक परिणाम होत असल्याने कंपनी व्यवस्थापनाने हे घातक असे वायू प्रदूषण रोखावे अन्यथा मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांनी दिला आहे.
दरम्यान संबंधित कंपनी ही नगर-पुणे हायवे लगत असून शेती असलेल्या शेतीमालावर व फळबागांवर त्या धुराची खाक व बर बसते व त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर ही कंपनी घातक धूर हवेत सोडते. यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सदर कंपनी ही रस्ता लगत न ठेवता ही कंपनी आऊट साईडला स्थलांतरित करावी जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना त्याचा त्रास होणार नाही. यावर आपण काय उपाययोजना केली असेल याबाबत एक महिन्यात कळवावे अन्यथा प्रादेशिक अधिकारी कार्यालय येथे तक्रार दाखल करून न्यायालयीन मार्गाचा अवलंब करणार असल्याचा इशाराही मनसेचे रविश रासकर यांनी दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा