नगर शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! एम.आय.डी.सी. पोलीसांची धडक कारवाई !
नगर ( प्रतिनिधी):- शहरातील चेतना कॉलनी एम.आय.डी.सी नवनागापुर येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणा-या महिलेच्या घरावर छापा टाकुन दोन पिडीत मुलींची सुटका करत एम.आय.डी.सी पोलीसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०४/१०/२०२३ रोजी श्री संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांना चेतना कॉलनी एमआयडीसी नवनागापुर ता. जि. अहमदनगर येथे राहत्या घरात एक महिला हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे.. त्याबाबत गोपनिय माहिती मिळाली त्यावेळी मा. श्री. संपतराव भोसले यांनी सपोनि राजेंद्र सानप यांना आदेश देवून एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत मुलींची सुटक करण्यात आली आहे. वेश्या व्यवसाय चालवणारी महिला आरोपी हिस ताब्यात घेवुन तिला सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर महिलेविरुदध एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ९१९ / २०२३ भादवि कलम ३७० सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे,अपर पोलीस अधीक्षक. अहमदनगर, श्री. संपतराव भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोहेकॉ / नितीन उगलमुगले, पोना / विष्णु भागवत, पोना / राजु सुद्रीक, पोकों/ किशोर जाधव, पोकों/उमेश शेरकर पोकों/ नवनाथ दहिफळे, पोकों सचिन हरदास, मपोना/ मनिषा काळे, मपोकों/सोनाली जाधव यांचे पथकाने केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा