पारनेर दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे दत्तानाना पवार.
पारनेर (हेमंत साठे):-
पारनेर तालुक्यातील सुपा गावचे तगडा जनसंपर्क असलेले तसेच युवकांचे उत्तम संघटन करणारे नेतृत्व तथा खा. सुजयदादा विखे समर्थक मा.उपसरपंच दत्ता नाना पवार यांची तालुक्यातील दूध उत्पादकांची कामधेनू मानल्या जाणाऱ्या तालुका सहकारी दूध संघावर अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागाचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी याबाबतचे आदेश काढले असून . दत्ता नाना पवार यांची दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे वृत्त येताच सुपा गावासह पारनेर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुका सहकारी दूध संघावर नगरचे दुग्ध विभागाचे सहायक निबंधक एस. जी. गाडे यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून प्राधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, संस्थेचे कामकाज सुरू होणे आवश्यक होते आणि त्यातून दूध उत्पादकांसह संघाचे कामकाज लोकाभिमुख होण्याच्या अनुषंगाने संघाचे अवसायकास अंतरीम आदेश देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगीती दिली होती. याबाबत भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अर्ज दिला होता.
दूध संघाचे कामकाज पाहणे आणि दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत दूध संघाचे सभासदांमधून तीन सदस्य समिती नेमणूक करण्याचे आदेश आज काढण्यात आले. त्यानुसार सुपा येथील माजी उपसरपंच तथा माऊली दूध संघाचे सभासद दत्तात्रय उर्फ दत्तानाना वसंत पवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अन्य दोन सदस्यांमध्ये भाळवणी येथील रेणुकामाता दूध संस्थेचे सभासद संदीप बाबाजी ठुबे यांची तर पानोली येथील अजिंक्यतारा दूध संस्थेचे सभासद दादाभाऊ वारे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे या आदेशात म्हटले आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले हे त्रिसदस्यीय मंडळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या अनुषंगाने कामकाज पाहणार आहे.
खा.सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे सुप्याचे मा.उपसरपंच दत्तानाना पवार यांचा सुप्यासह पारनेर तालुक्यात मोठा जनसंपर्क असल्याने त्यांच्या दूध संघाच्या अध्यक्षपदी निवडीमुळे समर्थकांसह पारनेर तालुक्यातील नागरीकांकडून शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला जात आहे.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा