शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.o

 

गर (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.मागील अनेक दिवसांपासून कांदयावर निर्यात बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी होती. यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. राज्यातील विशेष करून अहमदनगर, नाशिक, पुणे या कांदा पट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत एका खाजगी वृत्तवाहिनीने कांदा निर्यात बंदी निर्णयाची माहिती प्रसारित केली आहे.

नुकतेच या कांदा निर्यातबंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. यावेळी शाह यांनी कांदा निर्यातबंदी मुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्या कडून घेतली होती. याभेटीत खा. सुजय विखे यांनी तातडीने कांदा निर्यातबंदी उठवा किंवा नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन कांदा खरेदी करण्याचे आर्जव केले होते.

तसेच विखे पिता-पुत्रांनी कांदा विषयावर मांडलेले मुद्दे शाह यांनी मान्य करत लवकरच केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेईल, सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे असे आश्वस्थ केले होते. ना. राधाकृष्ण विखे आणि खा. सुजय विखे यांच्या भेटीनंतर दोनच दिवसांत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला असून याचा फायदा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह इतर जिल्ह्यातील मेटाकुटीला आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

दरम्यान आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ३१ मार्च २०२४ अखेर पर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिलेली आहे. शिवाय बांग्लादेशातही ५० हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

"कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.#

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेचा कौतुकास्पद उपक्रम ! ; कामरगाव जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

महाविकास आघाडीला पारनेर मधे मोठा धक्का ! माजी.आमदार विजय औटींनी केली भूमिका जाहिर !