कामरगाव येथील मातोश्री सिताबाई काजळे कन्या छात्रालयात मुलींना गणवेश वाटप.
अहिल्यानगर/प्रतिनिधी:- श्री सद्गुरु सेवा मंडळ पुणे संचलित, मातोश्री सिताबाई काजळे कन्या छात्रालय कामरगाव येथील मुलींच्या वसतिगृहात कै.हभप बबन महाराज कळसकर यांचा 32 वा पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृह उभारणीकरीता महत्वाचे योगदान दिलेले मा.आरोग्य अधिकारी बापूसाहेब शेळके हे होते. तर सामाजिक कार्यकर्ते हाबू शिंदे, मा.सरपंच तुकाराम कातोरे गुरुजी, मा.मुख्याध्यापक सुदाम ठोकळ, सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव ठोकळ, पत्रकार हेमंत साठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. वसतिगृहातील मुलींनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच कै ह.भ.प. बबन महाराज कळसकर यांच्या कार्याबददल माहिती दिली. मान्यवरांनी या कार्यक्रमप्रसंगी आपल्या मनोगतातून वसतिगृहाकरिता मदत करण्याचे आश्वासन दिले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते वसतिगृहातील मुलींना व कर्मचाऱ्यांना संस्थेकडून गणवेश वाटप करण्यात आले. वसतिगृहाच्या अधिक्षिका श्रीमती फुलाबाई कानवडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे मार्गदर...