जिल्हा परिषद शाळा ढोकी येथे बिबटयाविषयी जनजागृती.
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- ग्रामपंचायत ढोकी येथे वनसंरक्षक अधिकारी श्रीमती ज्योती दाभाडे या बिबट्यापासून आपले संरक्षण कसे करावे ? यासाठी जनजागृती करण्यासाठी ग्रामसभेत आल्या असता जि.प शाळेतील शिक्षक प्रमोद झावरे व प्रशांत ठुबे यांनी शाळेतही विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती द्यावी अशी विनंती केली असता त्यांनी शाळेत येऊन बिबटया जनजागृती संदर्भात माहिती दिली. तसेच पर्यावरण संरक्षणासंदर्भात मुलांना माहिती दिली.
ही माहिती देत असताना मुलांनी देखील संवाद साधत या संदर्भात काही प्रश्न विचारावेत असे आवाहन केले. आणि त्यातूनच रंगला मुलाखतीचा कार्यक्रम यामध्ये सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी वनसंरक्षक यांना वेगवेगळे प्रश्न विचारून निसर्गा बद्दलचे कुतूहल जागृत केले. तुमचे शिक्षण कुठे झाले ?तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? तुम्हाला हे क्षेत्र आवडतं का ?तुम्हाला कोणता पक्षी आवडतो ?तुमचा एक जंगलातील अनुभव सांगा ? तसेच पिंजरे तुम्ही कोठे कोठे लावलेले आहेत? हे क्षेत्र तुम्हाला का आवडते? असे वेगवेगळे प्रश्न विचारून वनसंरक्षक दाभाडे मॅडम यांना विदयार्थ्यानी बोलते केले आणि त्यांनीही मुलांना खूप छान प्रतिसाद दिला .असा हा मुलाखतीचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला आणि एक अविस्मरणीय क्षण मुलांनी अनुभवला. अशी माहिती शिक्षक प्रमोद झावरे यांनी दिली. यावेळी वनसंरक्षक ज्योती दाभाडे यांनी निसर्गाचे विविध अनुभव सांगून बिबट्या तसेच पर्यावरण विषय जनजागृती केली. तसेच निसर्गाविषय विविध कविता सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.मनिषा साठे, सहशिक्षक पोपट फापाळे, सहशिक्षिका श्रीम. मनिषा सोळसे, उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक प्रमोद झावरे यांनी तर आभार शिक्षक प्रशांत ठुबे यांनी मानले.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा