स्नेहबंध’च्या उपक्रमातून समाज जनजागृतीला नवे बळ. सामाजिक कार्याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा सीईओ पल्लवी विजयवंशी यांच्या हस्ते सन्मान
{स्नेहबंध'चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सन्मान करताना सीईओ पल्लवी विजयवंशी, सपोनि. जगदीश मुलगीर.}
अहिल्यानगर (हेमंत साठे):- समाजातील विविध घटकांमध्ये जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशन राबवत असलेल्या उपक्रमातून समाज जनजागृतीला नवे बळ मिळते, असे प्रतिपादन छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी केले. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजयवंशी यांच्या हस्ते शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, श्री रोकडेश्वर मंदिराचे अध्यक्ष नंदकुमार झंवर, हरदिन मॉर्निंगचे अध्यक्ष संजय सपकाळ, माजी प्राचार्य एकनाथ जगताप, योगगुरू रामचंद्र लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सीईओ विजयवंशी म्हणाल्या, “सामाजिक कार्यात सातत्य, संवेदनशीलता आणि लोकाभिमुखता या गुणांनी स्नेहबंधचे कार्य वेगळेपण जपते. डॉ. उद्धव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत. डॉ. उद्धव शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत पर्यावरण संवर्धन, स्थानिक खरेदी जनजागृती, अनाथ व बेघरांना मदत, रक्तदान, किल्ले संवर्धन, आणि युवकांमध्ये संस्कृती-जागर अशा अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेचा दीप प्रज्वलित ठेवला आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना “स्नेहबंध फौंडेशनचा प्रत्येक उपक्रम हा लोकसहभागातून उभा राहतो. समाजातील प्रत्येक घटकाला जोडून सकारात्मक बदल घडवणे हेच आमचे ध्येय आहे. अशी माहिती डॉ. उद्धव शिंदे यांनी दिली.
📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*
आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा...👇🏻
https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा