दहिगाव येथे महाराजस्व शिबीर उत्साहात संपन्न . ; एप्रिल मध्ये नगर तालुक्यात जनता दरबार भरवणार -आ.विक्रमसिंह पाचपुते.


अहिल्यानगर /प्रतिनिधी:- नगर तालुक्यातील  दहिगाव येथील श्री राम मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते, 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रथम पुजन झाले तदनंतर जिल्हा परिषद शाळेतील मुलींकडून महाराष्ट्र गीतगायन करण्यात आले. केडगाव मंडल अधिकारी रुपाली टेमक यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या ठिकाणी महसूल विभागा अंतर्गत येणारा पुरवठा विभागातील कामे गोरगरीब जनतेचा जिव्हाळ्याचा विषय रेशनकार्ड मध्ये नाव कमी करणे , समाविष्ट करणे, रेशनिंग केवायसी करणे या विभागाचे पुरवठा अधिकारी शिवराज पवार यांच्यासह कर्मचारी जागेवर संबंधित प्रश्न मार्गी लावत होते. बांधकाम मंडळ सदर ठिकाणी नाव नोंदणी, नुतनीकरण बांधकाम जनजागृती कार्यक्रम काम बांधकाम  नोंदणी  सह जाग्यावर सदर प्रश्न निपटारा करत होते. जिल्हा रेशीम उद्योग कार्यलय अंतर्गत शेतकरी रेश्म उद्योग नावनोंदणी व्यवसाय मार्गदर्शन करणे, कृषी विभाग शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी शेतकरी पिएम किसन प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी कार्यवाही चालू होती. जिल्हा भुमि अभिलेख कार्यालयात अंतर्गत शेतकरी मोजणी समस्या, भुमी अभिलेख पोर्टल विषयक जनजागृती काम माहिती जिल्हा भुमी अभिलेख अधिक्षक  भुमि अभिलेख तालुका अधिकार सदर विभागाच्या कामकाजाचा माहिती दिली जात होती, सदर विभागाचा संप असल्याने या विभागाचे एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांचे समस्या समाधान या विभागा संबंधी झाले नाही. या ठिकाणी कार्यालयात भेटायला हे सांगण्यात येत होते. अशी माहिती मिळाली.

आरोग्य विभागा अंतर्गत शेतकरी ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणी शुगर, बीपी, थायरॉईड ईतर समस्या गोळ्या औषधे दिली जात होती या विभागाचे  समुदाय आरोग्य अधिकारी सुर्यकांत यादव शिराढोण व रुईछत्तीसी प्राथमिक आरोग्य कर्मचारी सह उपस्थित होते. 

अनुलोम सामाजिक संस्था महिला सक्षम करण्यासाठी  व्यवसाय साठी मार्गदर्शन करण्यासाठी  सिंधु वाणी, प्रियंका बेरड हे कार्य करत होते.

 पंचायत नगर विभागाचे ग्रामपंचायत अधिकारी अशोक जगदाळे, अंबिलवाडी ग्रामविकास अधिकारी अंजली तोडमल, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी रामदास दळवी, वडगाव तांदळी ग्रामपंचायत अधिकारी दिपा राजळे, दहिगाव ग्रामपंचायत अधिकारी अरुण खळेकर,  महसूल विभागाच्या समस्या अर्ज स्विकारणे किरकोळ अर्ज काम रुईछत्तीसी मंडळ अधिकारी छाया सस्ते, दहिगाव तलाठी गणेश घुमरे, हे करत होते. महसूल विभागाच्या समस्या १९२ अर्ज प्राप्त झाले, वनपटाधारकांना उत्तारे संगणिकृत करून ७/१२ वाटप  संख्या  वाळुंज १९, कमीजास्त पत्रक करून सातबारा वाटप संख्या १३०,विवाह नोंदणी दाखले ०४, उत्पन्न दाखले संख्या २६, नाॅन क्रिमीलेअर दाखले ०७,जात प्रमाणपत्र ०९, रहिवासी दाखले ०५, म.ज.म.अ १९६६चे ८५ प्रमाणे वाटप ०१, कुळ कायदा ४३ शेरा कमी०१, जन्म मृत्यू दाखला आदेश ०१,भुमिहिन दाखले ०१, जन्म दाखला ०१, हातवळण गाव, मोफत वाळु १२, घरकुलासाठी वाळु उपलब्ध करून देण्यासाठी पास१५२ वाटप, नवीन शिधापत्रिका वाटप ०२, नवीन अन्नधान्य मंजूर लाभार्थी १५२, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास १ लाख मदतीचे वाटप संख्या ०२,अपाक शेरे कमी करणे,वारसा नोंद ६६, पोटखराबा क्षेत्र लागवडीलायक करणे ४८,कलम १५५ नुसार सातबारा दुरुस्ती करून वाटप संख्या ३६, सामाजिक अर्थसहाय्या योजनेचे मंजूर लाभार्थी संख्या १७,आधार नोंदणी दुरुस्ती आधार अपडेट, मोबाईल लिंक, नागरिकांनी लाभ संख्या ९७, वेलनेस  कोच अंबादास बेरड,संपतं वाघमोडे, मोफत आरोग्य तपासणी लाभार्थी संख्या ३५५,  

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नगर श्रीगोंदा आमदार विक्रमसिंह पाचपुते, कार्यक्रम अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,  नगर तहसीलदार संजय शिंदे,गटविकास अधिकारी राजेंद्र देसले, भुमि अभिलेख जिल्हा अधीक्षक संजय कुंभार, अविनाश मिसाळ उपस्थित होते. तसेच मंडळ अधिकारी छाया सस्ते, तलाठी गणेश घुमरे, तालुका कृषी अधिकारी अशोक वाळके, पुरवठा अधिकारी शिवराज पवार, आरोग्य अधिकारी सुर्यकांत यादव, बांधकाम अधिकारी प्रकाश भोसले, जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी संदीप आगवले, मंडळ कृषी अधिकारी नारायण करांडे, इ. अधिकारी कार्यरत होते. तर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, युवा नेते दादासाहेब दरेकर, माजी सभापती अभिलाषा घिंगे,मा‌.उपसभापती रवींद्र भापकर, साकत खुर्द सरपंच डॉ  नंदकुमार पवार, दहिगाव सरपंच सुरेखा म्हस्के,हातवळण सरपंच बाळासाहेब मेटे, निलेश दरेकर,सुनिल म्हस्के,अँड पोपट म्हस्के, ट्रस्ट कोषाध्यक्ष बाबासाहेब बनकर,अनशाबापु म्हस्के, रविराज पोटरे, महेश म्हस्के, डॉ राजेंद्र म्हस्के, शरद म्हस्के, दत्तात्रय बनकर रवींद्र हंबर्डे व श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवा म्हस्के इ. मान्यवर उपस्थित होते.या  महाराजस्व समाधान शिबीराचा दिड हजार वर नागरिकांनी लाभ घेतला. 

********************************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, Follow व SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv ..

टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .