कामरगाव सोसायटीची सर्वसाधारण वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न.

अहिल्यानगर /प्रतिनिधी : कामरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, कामरगाव ता. जि. अहिल्यानगर या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेच्या कार्यालया समोर हनुमान मंदिर सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सभेच्या प्रारंभी अध्यक्ष पदी चेअरमन सुदाम ठोकळ यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सचिव अनिल भोर यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले व कायम करण्यात आले. सन २०२५-२०२६ या वर्षाचा जमाखर्च, ताळेबंद, नफा-तोटा व व्यापारी पत्रकांवर इ बाबींवर विचारविनिमय करण्यात आला.

तसेच सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे, उत्पन्न-खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे, ऑडिट मेमोचे वाचन करणे इ बाबींवर चर्चा करण्यात आली. ऐनवेळी उपस्थित झालेल्या विषयांवर मा.सरपंच तुकाराम कातोरे यांनी सभासदांना दरवर्षी भरावे लागणारे शेअर्स व व्याजाविषयीच्या मुद्दयावर तसेच संस्थेच्या नुतन इमारतीविषय सभेत विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी संस्थेचे  चेअरमन सुदाम ठोकळ,व्हा.चेअरमन भिमाबाई आंधळे, संचालक शिवाजी साठे, अशोक ठोकळ, रमेश साठे, विष्णू कातोरे,सुनिल चौधरी,मंगल ठोकळ,अनिल आंधळे,वसंत ठोकळ,गोरख ठोकळ,राजेंद्र राजगुरु, रावसाहेब साठे,विजय साठे, राजेंद्र आंधळे, राजेंद्र साठे हे संस्थेचे संचालक मंडळ असून यापैकी बहुतांश संचालकांसह सचिव अनिल भोर, लिपीक अनिल गुंजाळ,सेल्समन तुषार चौधरी यांच्यासह सभासद, आजी माजी सोसायटी, ग्रामपंचायत पदाधिकारी तथा ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. सभेतील विविध विषयांवर सभासदांनी सहभाग घेत संस्थेच्या कामकाजाबाबत चर्चा केली.

*********************************📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882*

नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज पोर्टलला  Follow करा... तसेच आपल्या यु-ट्युब चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर, SUBSCRIBE करा...👇🏻

https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv



टिप्पण्या

फॉलोअर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार.

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .