पोस्ट्स

श्री राम हायस्कूल दहिगाव मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.

इमेज
नगर प्रतिनिधी:- नगर तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजक संस्थेचे श्री राम हायस्कूल दहिगाव येथे इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी पर्यंत शाळा आहे. मार्च २०२३ एस.एस सी बोर्डचा नुकताच निकाल जाहीर झाला या विद्यालयात देखील मुलींनीच बाजी मारली यांतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थीनी शिंदे प्रियंका रामदास ८७.२०,द्वितीय क्र.कार्ले समीक्षा नितीन ८२.८०,तृतीय क्र.शिंदे साक्षी सतीश ८२.४०,चतुर्थ क्र.सय्यद अलिशा समीर८०.%, पाचव्या क्र.म्हस्के साक्षी शाहू ७८.४०% असे प्रथम पाच विद्यार्थीनीची टक्केवारी आहे. या विद्यालयाचे एकुण ३३ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते त्यातील ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा ९८.% निकालाची टक्केवारी आहे. विशेष प्राविण्य श्रेणीतील ९ विद्यार्थी आले आहेत प्रथम श्रेणी १३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १० अशी वर्गवारी आहे. या गुणवत्ता विद्यार्थीचा सत्कार सन्मान करण्यात आला.या वेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त करतांना जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षक रिक्त जागा संदर्भात विषय प्रामुख्याने पुढे आला तसेच श्री राम हायस्कूलची  नवीन जागेत प्रशस्तं इमारत

कामरगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कडून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतीं सोबत दहावीच्या गुणवंतांचा सत्कार !

इमेज
नगर (प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव ठोकळ मित्रपरिवार यांच्याकडून दि.४ जून रोजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन सभापती व उपसभापतीं सोबत कामरगाव मधील दहावीच्या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.           याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ यांचा सत्कार सोहळा कामरगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व लक्ष्मणराव ठोकळ मित्रपरिवार यांच्या कडून हनुमान मंदिर सभा मंडप कातोरेवाडी याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी  नुतन सभापती व उप सभापती यांची नगर पुणे महामार्गापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत स्वागत मिरवणूक काढण्यात आली.  त्यानंतर सभापती भाऊसाहेब बोठे व उपसभापती रभाजी सुळ यांचा शाल, श्रीफळ , मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.  यावेळी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र आंबेकर, संचालक भोर गुरुजी, अकोळनेरचे युवा सरपंच प्रतिक शेळके, उपसरपंच श्री गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार क

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह विविध योजनांच्या लाभाची प्रकरणे 9 जुनपर्यंत पुर्ण करा - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

इमेज
        अहमदनगर( प्रतिनिधी):- शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीने व्हावी यासाठी  “शासन आपल्या दारी हा उपक्रम” राबविण्यात येत आहे. या उपक्रमांर्तगत जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभांचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह विविध योजनांच्या लाभाची प्रकरणे 9 जुनपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. सालीमठ बोलत होते.            यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, व्यवस्थापक बालाजी बिराजदार, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. बठीजा यांच्यासह सर्व बँकांचे विभागीय व्यवस्थापक, जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.            जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, प्रधानमंत्री स्व निधी योजनेंर्गत लाभार्थ्यांच्या प्रकरणांच्या फाईल किरकोळ कारणे दाखवुन नामंजूर करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असुन योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी

बुऱ्हानगर प्रादेशिक पेयजल योजनेसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले आक्रमक.

इमेज
  नगर (प्रतिनिधी):- नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील वाकोडी फाटा, दरेवाडी,वाळुज-पारगाव,शिराढोण, दहिगाव, साकत खुर्द, वाटेफळ ,रुईछत्तीसी, हातवळण गुंणवडी, अशी नगर तालुक्यातील दक्षिण भागातील गावांना पिण्याचे पाणी बुऱ्हानगर पेयजल योजना अंतर्गत होत आहे.पंरतु गेल्या दिड वर्षा पासून नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग काम चालू आहे.या राष्ट्रीय महामार्ग खोदकामात बुऱ्हानगर प्रादेशिक पेयजल योजनेची पाईपलाइन तुटली जातं आहे. या फुट तुटी मुळे नगरच्या दक्षिण भागातील  दहा पंधरा गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. वरील गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे.एका महिन्यात एकदा नळाला पाणी येते का यांची शास्वती नाही.सदर योजना असल्याने शासन या गावानं टँकर मंजूर देत नाही. मा.जिल्हा परिषद संदेश कार्ले यांनी आक्रमक होत दिला इशारा. (व्हिडीओ पहा)..👆          या विरोधात आज मा. जिल्हा परिषद  सदस्य संदेश कालेॅ यांनी  दरेवाडी  फाटा वर सहकार्यसह भर उन्हात आंदोलनचा बडगा उगारला मुळे  केंद्रिय विद्यालय जवळ सदर पाईपलाइन फुटली त्या ठिकाणी सदर खोदकाम बंद पाडले जबाबदार अधिकारी सदर घटनास्थळी पाहणी करण्यासाठी भु

नगर मधे अफू व गांजा अंमलीपदार्थांचा मोठा साठा जप्त. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांची धडाकेबाज कारवाई !

इमेज
नगर:- एम.आय.डी.सी. परीसरात अफु व गांजा या अमली पदार्थाची अवैध्यरित्या विक्री करणारे आरोपीस ताब्यात घेऊन 16 किलो वजनाचा सुमारे 3,27,000 /- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्य नेतृत्वात  एमआयडीसी पोलीसांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. राकेश ओला  पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी अवैद्य अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यावरुन दिनांक 02/06/2023 रोजी सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे केसाराम हेमाराम जाट हा विळद बायपास रोड हॉटेल चौधरी पॅलेस राजस्थानी धाबा येथे अवैध्य रित्या चोरुन अफुच्या बोंडापासुन पावडर तयार करुन त्याची चोरुन विक्री करत आहे आत्ता गेल्यास मिळुन येईल. अशी बातमी मिळाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर ठिकाणी पंचा समक्ष छापा टाकला असता त्या ठिकाणी 2,87,000 रुपयाचे 14 किलो वजनाचे अफुची बोंडे व त्या पासुन तयार केलेली पावडर मिळुन आली. हॉटेल चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार सोहळा दहिगाव येथे संपन्न.

इमेज
नगर-प्रतिनिधी (शिवा म्हस्के)             महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत प्रत्येक खेडे गांवात दोन महिलांचा सन्मान करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला. त्यानुसार  पुरस्कार नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार योजना आणली आहे.अहिल्यादेवीं ची २९८ व्याज जयंती निमित्ताने दहिगाव ग्रामपंचायत स्तरावर नेमलेल्या कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्कार शासनाच्या नियम अटी शर्ती नुसार‌ दहिगाव ग्रामपंचायत कमिटी मधील अध्यक्ष सरपंच सुरेखा म्हस्के, सचिव ग्रामसेविका स्वाती घोडके, सदस्य उपस्थित आलेल्या अर्जांची छाननी अंती अंगणवाडी सेविका कमल मोहन जरे, तसेच वंचित विकास सेवा संस्थेच्या सेंटर इन्चार्ज स्वाती शांताराम नेटके यांची समितीने पुरस्कार निवड केली.व तो पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र, सन्मान चिन्ह,शाल, श्रीफळ,रोख रक्कम ५०० रूपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.या पुढे महिला बालविकास क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव होत असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे

कत्तलीसाठी जनावरे नेणारा टेम्पो पकडला. ; नगर तालुका पोलीसांची कारवाई !

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- गोवंशी जातीच्या जनावराची कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतुक करणाऱ्या टेम्पोवर नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांना गोपनिय बातमी मिळाली की, सोलापूर ते नगर रोडवर सोलापूरच्या दिशेने एक अशोक लेलंड टॅम्पोमध्ये गोवंशी जातीच्या जनावराची कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने जनावराची वाहतुक करणार आहे. त्यानुसार श्री शिशिरकुमार देशमुख साो. यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री युवराज चव्हाण, पोना/धर्मराज दहिफळे, पोकों / कमलेश पाथरुट, पोकॉ/संदीप जाधव व चासफौ दिनकर घोरपडे यांना तोंडी आदेश दिला की, सदर अवैध गोवंशी जातीच्या जनावराची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतुक करण्याऱ्या टॅम्पोवर वाळुंज बायपास चौक येथे जावून कारवाई करा असा आदेश दिला. त्यानुसार सदर अधिकारी व अंमलदार हे वाळुंज बायपास येथे जावून सापळा लावून थांबले असता एक सोलापूरच्या दिशेने नगरकडे नमुद बातमीतील आशोक लेलंड टॅम्पो येताना दिसला पोलीस आणि पंचाची खात्री पटताचा चालकाला रोडच्या बाजूला लेलंड ट

फॉलोअर