कामरगाव जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम. ;आधुनिक शिक्षणासोबत विदयार्थ्यांना पारंपारिक कलेची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न !
नगर( हेमंत साठे):- तालुक्यातील नगर- पुणे महामार्गालगत असणाऱ्या कामरगाव येथील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षिका नंदा पठारे-देवकर व शिक्षिका लक्ष्मी गायकवाड यांच्या संकल्पनेतून विदयार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शिक्षणासोबत आपल्या पारंपारीक कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परीषद शाळा या आता आधुनिक शिक्षणाची कास पकडत आहेत. काही गावांमधून डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधे आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आधुनिकते सोबत आपली संस्कृती, पारंपारीक कला विदयार्थ्याना माहित व्हावी. त्यांच्या मधील कलागुणांचा विकास व्हावा. या उद्देशाने कामरगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका नंदा पठारे-देवकर व शिक्षिका लक्ष्मी गायकवाड यांनी विद्यार्थ्याना सोबत घेऊन गावातीलच कुंभार काका मोहन बाबा गोरे यांच्या घरी सुरू असलेल्या मातीच्या वस्तु बनविण्याच्या छोट्याश्या कारखान्यावर भेट दिली. यावेळी मोहन गोरे यांनी देखील मोठया आनंदाने चिमुकल्यांचे स्वागत केले. व येणाऱ्या पोळा सणासाठी सुरू असलेल्या मातीच्