पोस्ट्स

शेतकऱ्यांच्या मोटर केबल चोरणारे चोरटे जेरबंद ! स.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातून केले आरोपी जेरबंद !

इमेज
नगर ( प्रतिनिधी) :- तालुक्यातील निमगाव घाणा, शिंगवे गावातुन शेतक-यांचे शेतातील पाण्याच्या मोटारीचे केबल चोरणारे दोन चोरटे जेरंबद करत २४.८०० रुपयाचे पाण्यातील मोटारीचे केबल जप्त करण्याची कारवाई बीड जिल्ह्यात जाऊन एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.         याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १९/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे बाळासाहेब सखाराम तळुले वय ४५ वर्ष धंदा- शेती रा निमगाव घाणा ता. जि. अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दि. १८/०९/२०२३ रोजी रात्री १०.३० वा चे सुमारास ते दि. १९/०९/२०२३ रोजी सकाळी ०८.३० वा चे दरम्यान निमगाव घाणा येथील एरोगेशनच्या तलावात टाकलेल्या इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटरीच्या २४,८००/- रु किंमतीच्या श्री फेस केवल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की. सदरचा गुन्हा हा १ ) अंबादास महादेव घुले, २) रामेश्वर भास्कर घुले, दोन्ही रा. कारखेल ता. आष्टी जि.बीड यांनी केला असून ते कारखेल येथ

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा एम.आय.डी.सी. पोलीसांनी लावला २४ तासात शोध !

इमेज
नगर( प्रतिनिधी):- एमआयडीसी परीसरातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासाचे आत एम आय डी सी पोलीसांनी शोध घेवून मुलीला पालकांचे स्वाधीन केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २७/०९/२०२३ रोजी चेतना कॉलनी नवनागापुर ता. जि. अहमदनगर येथील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दिनांक २७/०९/२०२३ रोजी सकाळी ११/०० वा चे सुमारास चेतना कॉलनी नबनागापुर येथुन त्यांची अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि नंबर ८९४ / २०२३ भादवि ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरची अल्पवयीन मुलगी हि शेंडी बायपास रोड एमआयडीसी अहमदनगर येथे आहे. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे सदर अल्पवयीन मुलीचा शोध घेवून सदर मुलीस तिचे आईवडील यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोसई टिक्कल हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.

कामरगाव येथे गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.

इमेज
नगर ( हेमंत साठे):- गणेश उत्सव म्हटल की आनंद, उत्साह...संगीत,नृत्य,  तसेच सांस्कृतिक, धार्मिक विविध कार्यक्रमांचे गणेश मंडळाकडून आयोजन केले जाते. परंतु या व्यतिरिक्त सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नगर तालुक्यातील कामरगाव येथील जय बजरंग युवा प्रतिष्ठान मधील तरुणांनी गणेश उत्सवादरम्यान रक्तदान शिबीराचे आयोजन करत तरुणांपुढे एक आदर्श ठेवला.         दिनांक २७ सप्टेबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत जनकल्याण रक्तपेढी नगर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कामरगाव येथे  केले होते. गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीरामधे ग्रामस्थ व तरूणांनी मोठया प्रमाणात रक्तदान करत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.          आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कामरंगाव प्राथमिक आरोग्यकेंद्र चास वैद्यकीय अधिकारी डॉ. निवेदिता माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. बापूसाहेब नागरगोजे , आरोग्यसेवक संतोष सुरवसे,  परिचरिका अकोलकर व सर्व आशा सेविका यांच्या सहभागातून उपकेंद्र कामरगाव येथे जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिर घेण्य

हॉटेल मधील कामगारांना दहशत करुन गंभीर जखमी करणारे पाच आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांनी केले गजाआड !

इमेज
   नगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील भिंगार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका हॉटेल मधील कामगारांना दहशत करुन गंभीर दुखापत करणारे पाच आरोपी भिगांर कॅम्प पोलीसांनी कारवाई करत गजाआड केले आहेत.        याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 13/09/2023 रोजी दुपारी 01/45 वाजे च्या सुमारास हॉटेल प्रकाश येथे जेवण करण्यासाठी आलेला सचिन शिंदे व सोबत 7 अनोळखी इसम यांच्यात जेवण करीत असताना आपसात मोठमोठ्याने आरडाओरड करुन भांडणे चालू होती. त्यावेळी हॉटेल मधील कामगार हे सचिन शिंदे व अनोळखी सात इसमांना भांडण करु नका असे सांगत असताना यातील आरोपी सचिन शिंदे यांने हॉटेल मधील वेटर याच्या डोक्यात सोडा वॉटरची बाटली मारुन गंभीर दुखापत केली व इतर अनोळखी सात इसमानी हॉटेल मधील इतर कामगारांना मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली त्यावरुन हॉटेल प्रकाश चे मॅनेजर सुनिल संभाजी गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पो स्टे येथे गुर नं 596/2023 भा दवि कलम 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.         सदर गुन्ह्याचा तपास करताना सपोनी दिनकर मुंडे यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर चा गुन्हा

चोरीच्या मोटारसायकलींची माहिती मिळताच नगर मधील दुकानावर एम.आय.डी.सी.पोलीसांची धाड !

इमेज
  नगर(प्रतिनिधी):- नगर एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन हददीत शेंडी शिवार येथे चोरीच्या मोटारसायकली जवळ बाळगणा-यास जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या कडून २.१३,०००/-रुपयाच्या ५ मोटारसायकली व १६ मोटारसायकलीचे सुटटे केलेले पार्ट, इर्जिन व चेसी असा मुददेमाल जप्त करत एम.आय.डी.सी पोलीसांनी कारवाई केली आहे       याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 19/09/2023 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नगर औरंगाबाद रोडला कृष्णा अँटो कन्सटल्ट येथे काहि मोटारसायकली व व मोटारसायकलचे खोललेले इंजिन चेसी व इतर साहित्य पडलेले असुन ते चोरीचे असण्याची शक्यता आहे. अशी बातमी मिळाल्याने सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून त्यांना पंचासमक्ष सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी पाठविले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक कृष्ण अॅटो कन्सल्ट येथे जावून खात्री केली असता सदर ठिकाणी पाच मोटारसायकली व 17 मोटारसायकलचे सुटे केलेले पार्ट मिळुन आले. सदर बाबत दुकान मालक पांडुरंग गोविंद शिंदे यांचेकडे त्यांचे कागदपत्राची मागणी केली असता त्यांचेकडे कसलेही बिले तसेच मोटारस

रायतळे गावात आढळली मराठा सरदार राजेश्री संभाजी पवारांची ऐतिहासिक छत्री !

इमेज
  नगर( हेमंत साठे):- काही दिवसांपूर्वी  इतिहास अभ्यासक श्री सतीश सोनवणे यांनी पारनेर तालुक्यातील रायतळे गावाला भेट दिली तेव्हा त्यांना अनपेक्षितपणे एक सुंदर वास्तू नजरेस पडली. स्थानिक लोकांच्या मते हे महादेवाचे मंदीर आहे. जवळ जाऊन पाहिले तर हे मंदीर नसून मराठा सरदाराची छत्री असावी असे त्यांना वाटले. छत्री वर आठ ओळींचा देवनागरी  शिलालेख आढळला. त्याचे वाचन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बऱ्यापैकी खराब झालेला असल्याने छाप घेऊनही काही शब्दच ओळखता आले. शिलालेख सुरुवात अशी -  १.राजेश्री सं भाजी पवार,  स्वराज्य उभारणीत ज्यांनी मोलाचं योगदान दिलं अशा पवार घराण्यातील योद्ध्याची राजेश्री संभाजी पवारांची ही छत्री. तेथेच समोर एक शिळा आहे ज्यावर शिव लिंग आणि अश्वारूढ मराठा सैनिक कोरलेला आहे पराक्रमी पवार घराणे - पवार घराण्याचे मूळ पुरुष साबुसिंग (शंभु सिंग ) पवारांना मानले जाते. निजाम शाहीत मलिक अंबरच्य काळात हे उदयास आले.  सुरवातीला ते कामरगाव जवळच्या डोंगरात राहत असत. नंतर त्यांनी सुखेवाडी नावाचे गाव वसवले तेच आजचे सुपे. हंगे गावच्या दळवी पाटलाशी यांचा पाटीलकी वरून वाद होता.शहाजी राजांच्या काळात

भोरवाडीतील शेतकऱ्याकडून फोन पे वर घेतली लाच ,वसुली अधिकारी अडकला अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात !

इमेज
 नगर ( प्रतिनिधी):- तालुक्यातील भोरवाडी गावातील शेतकऱ्याला शेतजमीनीवरील कर्जफेड करण्यास मुदत दिली, जमिनीवरील जप्ती व लिलाव होऊ दिला नाही, या मोबदल्यात तक्रारदार शेतकऱ्याकडून कडून ७ हजाराची लाच स्वीकारताना नगर तालुका पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व विक्रीकर अधिकारी यासीन नासर अरब (वय ४२) यास रंगेहाथ पकडण्यात आले असून या प्रकरणात .विशेष म्हणजे ही लाच अधिकाऱ्याने रोख स्वरुपात न स्वीकारता फोन पे द्वारे स्वीकारली. आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर कार्यालयाने कारवाई केली. कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध १५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           याबाबत अॅन्टी करप्शनच्या अधिकृत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भोरवाडी (ता. नगर) येथील तक्रारदाराने २०१६ मध्ये केडगाव येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होतेत्या.वेळी तक्रारदाराने आई व मामाच्या नावे असलेल्या शेतीचे उतारे तारण म्हणून दिले होते. तक्रारदाराला कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र तक्रारदार वेळे कर्ज फेडू शकले नाहीत. या प्रकरणी भैरवनाथ पतसंस्थ

फॉलोअर