पोस्ट्स

नगर पुणे महामामार्गावर चास शिवारात खाजगी बसला अपघात ! अपघातग्रस्त बसमधून 33 प्रवाश्यांची सुखरूप सुटका...

इमेज
  नगर ( प्रतिनिधी) - तालुक्यातील नगर पुणे महामार्गावर चास  गावाच्या पुढे असणाऱ्या वळणावर खाजगी आराम बसला मंगळवारी (दि.३०) सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. खाजगी आराम बस भरधाव वेगात असल्याने बस चालकाला वळणाचा  अंदाज न आल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस रस्त्यावरच उलटली. या बस मध्ये अंदाजे ३३ प्रवासी होते. ते सुदैवाने या अपघातातून बालंबाल बचावले असून अपघातग्रस्त बसमधून सुखरूप सुटका करण्यात आली. बसचा क्लीनर गंभीर रित्या जखमी झाला असल्याचे समजते.         छत्रपती संभाजीनगर कडून नगर मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या बिंदुसरा एक्सप्रेस नावाच्या (क्र.एम.एच.२०, डी.डी. ०२२३) या खाजगी बसला अपघात झाला आहे. बस महामार्गावर उलटल्या नंतर प्रवाशांनी मोठा आरडाओरडा केला असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते. बसमधील अनेक प्रवासी हाताला व डोक्याला मार लागून किरकोळ जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कामरगाव येथील मृत्युंजय दूत सिद्धांत आंधळे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांनी तात्काळ बाहेर काढत किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना च

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे नेणारा आरोपी जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडक कारवाई !

इमेज
नगर (प्रतिनिधी):- नगर तालुका पोलीसांनी कत्तलीसाठी घेवून जाणारे गोवंशीय जातीचे जनावरे व वाहन पकडून ५,२२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुका पोलीस स्टेशनचा नव्याने कारभार हाती घेतलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, हे त्यांची टीम पोसई युवराज चव्हाण, पोहेकॉ रायचंद पालवे, सफौ/दिनकर घोरपडे, पोकों/जयदत्त बांगर, पोकों/विजय साठे हे पो.स्टे अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पो.स्टे हद्दीत रवाना झाले होते . २७/०१/२०२४ रोजी ०५/३० वा. सपोनि प्रल्हाद गिते साहेब, पोसई  दरम्यान सपोनि प्रल्हाद गिते साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अरणगाव शिवारात एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीमधे गोवंश जनावरांची वाहतूक करीत आहेत अशी खात्री लायक बातमी मिळाल्याने आंम्ही पोसई चव्हाण यांना सदर कारवाई करणेकामी दोन पंचांना बोलावून घेणेबाबत तोंडी आदेश दिल्यावरुन त्यांनी दोन पंचांना बोलावून घेतले सदर ठिकाणी आंम्ही पोलीस स्टाफसह सापळा लावून अरणगाव कडून अहमदनगर कडे एक संशयीत पिकअप जाताना दिसल्याने सदर वाहनास थांबवून आंम्ही वाहनाजवळ जावून वाहन

नगर एम.आय.डी.सी परीसरात तरुणाचा खुन करणा-या सराईत आरोपींना २४ तासात केले अटक !; स.पो.नि.राजेंद्र सानप व टीमची धडाकेबाज कामगीरी !

इमेज
नगर (प्रतिनिधी):- नगर एमआयडीसी परीसरात तरुणाचा खुन करणा-या सराईत आरोपींना नगर MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व टीमने आरोपींना २४ तासात अटक केली आहे.          याबाबत सविस्तर माहिती अशी की ,दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी फिर्यादी अनिकेत अशोक सोनवणे वय २४ वर्ष रा. फोजिंग कॉलनी शेंडी बायपास रोड वडगाव गुप्ता शिवार अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०७ वाजेचे दरम्यान माझा भाऊ शुभम सोनवणे यास बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे व त्याचा भाऊ रोहीत प्रकाश पाटोळे यांनी शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन हातातील धारधार शस्त्राने शुभम याचे छातीत पोटात वार करुन त्यास जिवंत ठार मारले आहे. वैगरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोस्टे गु रजि नंबर ३९/२०२४ भादवि कलम ३०२,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना स.पो.नि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे १) बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे २) रोहीत प्रकाश पाटोळे हे सदरचा गुन्हा करुन राहुरी कडे पळुन गेले आहेत. त्यावरुन एम.आय.डी.सी

विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेमधे कु.वीरा नितेश कातोरेचा प्रथम क्रमांक !

इमेज
श्रीगोंदा(प्रतिनिधी) :- शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय  विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा 2023-24 मधे  वैयक्तिक गीत गायन किलबिल गटामधे तालुकास्तरावर कु. वीरा नितेश कातोरे हीला प्रथम क्रमांक मिळाला असून जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.           याबाबत अधिक माहिती अशी की,  श्रीगोंदा येथे पार पडलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धेमधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोस वस्ती तालुका श्रीगोंदा येथील विद्यार्थिनी कु. विरा नितेश कातोरे (इयत्ता दुसरी) हिचा किलबिल गटातून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला. यासाठी संगीत शिक्षक मार्गदर्शक अविनाश बावडकर (मिरजगाव) यांनी मार्गदर्शन केले. तसेच वर्ग  शिक्षिका.वैशाली गुंजाळ  आणि मुख्याध्यापक प्रफुल्लसिंग परदेशी यांनी विशेष श्रम घेतले.              यावेळी कु.वीरा नितेश कातोरे हीने मिळवलेल्या यशाबद्दल घोगरगाव व मांडवगण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. दत्तात्रय कडूस यांनी तीचे कौतुक करत अभिनंदन केले. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु.वीरा चे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कु. वीरा ही शिक्षक दांम्पत्य नितेश द

द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य प्रेरणादायक- बाबासाहेब बोडखे

इमेज
नगर तालुका प्रतिनिधी:-  द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माध्यमिक शिक्षक भवन अहमदनगर येथे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष समीर मणियार हे होते तर नगर शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांची प्रमुख उपस्थित होती.  यावेळी बोलताना बोडखे म्हणाले, 'द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायक असून ही पत्रकार संघटना नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांमधून तसेच सामाजिक कामातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करते. पत्रकारांवर झालेल्या अन्याय अत्याचारा विरोधात लढणारी संघटना म्हणून द युवा ग्रामीण पत्रकार संघाकडे पाहिले जाते.पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकारांनी सर्वसामान्य जनतेसाठी कसे लढावे हे या संघटनेच्या माध्यमातून पाहावयास मिळते.'असे मत व्यक्त केले यावेळी नगर शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी पत्रकार संघाचे कौतुक करत पत्रकारांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी द यु

गुरु नगरी ट्रेकर्स चे दिमाखदार सोहळ्यात अनावरण.

इमेज
नगर (प्रतिनिधी):- आज चांदबिबीचा महाल येथे अहमदनगर शहरातील शिक्षकांनी तयार केलेल्या गुरु नगरी ट्रेकर्सचे अनावरण नगर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर दांपत्य श्री हेमंत देशपांडे व सौ. प्रीती देशपांडे, अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती श्री बाळासाहेब हराळ,दैठणे गुंजाळचे सरपंच बंटी गुंजाळ, विक्रांत जिमचे संचालक विक्रांत टेकाडे सर व उद्योजक बब्बुशेठ सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते व शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी बोलताना नगर शहरातील प्रसिद्ध सर्जन व एवरेस्ट बेस कँपपर्यंत जाऊन आलेले डॉक्टर हेमंत देशपांडे म्हणाले की प्रत्येकाचे जीवन फार धावपळीचे झालेले आहे प्रत्येक माणसाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे *helth is wealth* आपले आरोग्य जर चांगले असेल तरच आपण जीवनामध्ये सुखी आणि समाधानी जगू शकतो. गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही रोज सकाळी आरोग्यासाठी चांदबिबी महालापर्यंत येतो असेही ते म्हणाले.  आपण सर्व गोष्टीचे नियोजन करतो सर्व बाबींची काळजी घेतो परंतु आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अक्षम्य निष्काळजीपणा करतो या भावनेतून आरोग्याबाबत एक नवीन सं

कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम संपन्न.

इमेज
नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :- महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत मुळा शिक्षण संस्थेच्या सोनई ता. नेवासा येथील कृषि महाविद्यालयात माध्यमातून कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२४ यानिमित्ताने अंमळनेर येथे कृषि कन्या चैताली निचित, प्रतिक्षा शिंदे, ऋतुजा पोटरे, अश्विनी पवार, सोनाली मुळे यांचे ग्रामीण कृषि जागरूकता आणि  अंमळनेर येथील ग्रामस्थांनी कृषि कन्यांचे स्वागत केले. ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाच्या दोन महिन्यांच्या कालावधीत कृषि कन्या शेतीविषयक विविध प्रात्यक्षिक घेणार आहे आणि शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार आहेत. या वेळी अंमळनेर गावचे सरपंच ज्ञानेश्वर आयनर, उपसरपंच किशोर मोरे, मुळा कारखान्याचे संचालक कर्णसाहेब पवार, पोलीस पाटील अनिल मकोणे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब जिवरक व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कृषि महाविद्यालय, सोनईचे प्राचार्य डॉ. एच. जी. मोरे , उपप्राचार्य प्रा. एस. व्ही. बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. ए.ए.दरंदले, कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.आर.गिरी यांचे कृषि कन्यांना मार्गदर्शन लाभत आहे.

फॉलोअर