पोस्ट्स

स्व.आ .वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उपक्रमशिल शिक्षक प्रमोद झावरे यांच्याकडून शाळेस पुस्तके भेट.

इमेज
पारनेर प्रतिनिधी:- पारनेर तालुक्याचे स्व. मा.आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त  वासुंदे गावचे ग्रामस्थ व राहुरी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक प्रमोद झावरे  यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकळी ढोकेश्वर, श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी ढोकेश्वर व रयत शिक्षण संस्थेचे कै . प्र .ग . खिलारी पाटील विद्यालय या  शाळांच्या ग्रंथालयांना विविध पुस्तके प्रसिद्ध उदयोजक, लेखक वक्ते श्री . एन बी धुमाळ यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापकांकडे  सुपुर्द केली . विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ वाढवावी व ज्ञान प्रसार व्हावा या हेतूने शिक्षक प्रमोद झावरे हे नेहमी विविध शाळांना पुस्तके भेट देत असतात . ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी ,प्राचार्य वाव्हळ ,शिक्षक अंबादास झावरे , पंडीतनाना झावरे , तारकराम झावरे , मंगेश खिलारी , राजेंद्र ठुबे, अतुल सैद, कर्ण रोकडे आदींच्या उपस्थितीत पुस्तके भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली.o

इमेज
  न गर (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.मागील अनेक दिवसांपासून कांदयावर निर्यात बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदयाला अत्यल्प भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी होती. यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. राज्यातील विशेष करून अहमदनगर, नाशिक, पुणे या कांदा पट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत एका खाजगी वृत्तवाहिनीने कांदा निर्यात बंदी निर्णयाची माहिती प्रसारित केली आहे. नुकतेच या कांदा निर्यातबंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. यावेळी शाह यांनी कांदा निर्यातबंदी मुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणी

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नगर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको !

इमेज
नगर प्रतिनिधी :- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला नगर तालुक्यातील दहिगाव साकत वडगाव तांदळी, वाटेफळ, साकत खुर्द, येथील तरुणांनी आज सकाळी (दि.१७) रोजी नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक '५१६अ" अडऊन रास्ता रोको आंदोलन केले. या मध्ये शिराढोण गावचे उपसरपंच दादासाहेब दरेकर, यांनी मराठा समाजाला आरक्षण किती महत्त्वाचे आहे या विषयी मनोगत व्यक्त केली. तसेच जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी देखील जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच दहिगाव सरपंच मधुकर म्हस्के यांनी जो पर्यंत मराठा आरक्षण मिळतं नाही तोपर्यंत जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ कायम ठाम उभा आहोत असे स्पष्ट केले. तसेच साकत खुर्द सरपंच डॉ नंदकुमार पवार यांनी एक मराठा लाख मराठा हे उभा महाराष्ट्र  हे आंदोलन चालू आहे. त्यात आम्ही सहभागी आहोत हे हि स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या या अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून साकत खुर्द येथील मराठा व इतर जाती धर्माच्

सुपा गावात "स्वप्नांपुढे गगन ठेंगणे" उपक्रम उत्साहात संपन्न ! सरपंच मनिषा रोकडेंची अभिनव संकल्पना.

इमेज
  पारनेर(प्रतिनिधी) :- पारनेर तालुक्यातील सुपा गावातील आदर्श सरपंच मनिषा योगेश रोकडे यांच्या अभिनव संकल्पनेतून अनेक उपक्रम गावात राबविण्यात येतात. यातील वाखाणण्याजोगा व इतर गावांना आदर्शवत ठरणारा एक उपक्रम म्हणजे गावच्या आदर्श सरपंच सौ. मनिषा योगेश रोकडे यांच्या प्रेरणेतून व सहकार्यातून साकारलेले  जि. प. प्रा. शाळा सुपा मराठी व उर्दू शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दि. १५ / ०२ / २०२४ रोजी पाहताना खरंच वाटत होतं स्वप्नांपुढे गगन ठेंगणे ! या कार्यक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष होते. मुलांचे कलाविष्कार हे खूपच वाखाणण्याजोगे होते . कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सौ.मनिषा रोकडे यांनी स्वतः जि. प. च्या शाळेत शिकल्याचे अभिमानाने उल्लेख केला .  कार्यक्रमात विविधतेसोबतच शिक्षकांचा अभ्यासू पणाही प्रकर्षाने जाणवला . गणेशवंदनाने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात कव्वाली, शिवछत्रपती वंदना , भरतनाट्यम , बॉलीवूड सॉंग , रामागमन , चांद्रयान मोहीम , लावणी अशा प्रकारे सर्व अंगांना स्पर्श करणारे कलाविष्कार समाविष्ट होते . प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले ते " भारताच्या चांद्रयान मोहीमेवर "  सादर केलेल्य

महिला सरपंचाला मारहाण करणारे आरोपी एम.आय.डी.सी. पोलीसांनी २४ तासात केले गजाआड !

इमेज
  नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील शेंडी येथील महिला सरपंचांना मारहाण करणाऱ्या आरोपींना नगर एम.आय.डी.सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 24 तासाच्या आत अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की,  दिनांक 15/ 02/ 2014 रोजी 4 वा सुमारास एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अंतर्गत जेऊर दूरक्षेत्र हद्दीत शेंडी गावचे सरपंच या गावातील कचरा टाकण्याकरिता नेटके वस्ती येथे खड्डा करत असताना तेथे आरोपी रावसाहेब यादव नेटके, गणेश गोरख ससाने, बॉबी नेटके, दीपक नेटके, अतुल नेटके, राणा नेटके सर्व राहणार शेंडी हे तेथे आले व यांनी फिर्यादीस इथे खड्डा करायचा नाही असे सांगितल्याने फिर्यादी यांनी खड्डा बुजविला असता आरोपी रावसाहेब नेटके याने फिर्यादीस तू लय कामवाली झालीस असे म्हणून घाण घाण शिवीगाळ केली केली व फिर्यादीच्या गालावर चापट मारली तसेच फिर्यादीला लज्जास्पद होईल असे अंगाला स्पर्श केला व उर्वरित आरोपींनी फिर्यादीच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आहे असे फिर्यादीवरून एमआयडीसी पो.स्टे. गु.र. नं. 148/2024  भा द वी कलम 354,324,323,427,504,143,147,149 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी राऊ उर्फ रावसाहेब यादव नेटके 

धक्कादायक...पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्टयाने गोळीबाराचा प्रयत्न !

इमेज
पारनेर (प्रतिनिधी):- समजलेल्या माहितीनुसार पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून  भरत गट यांनी कट्टा हिसकल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पारनेर येथील हॉटेल दिग्विजय मध्ये घटना प्रकार घडल्याचे समजते. आरोपी पोलिसांच्या ताब्यात:-  आरोपी २० ते २२ वर्षाचा असून रांजणगाव मशीद येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी सोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

सुपा गावच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित !

इमेज
  नगर (हेमंत साठे):- पारनेर तालुक्यातील सुपा गावच्या विकासासाठी उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सरपंच मनिषा रोकडे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की, स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य  यांच्यातर्फे राज्यस्तरीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी माऊली सभागृह, सावेडी अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाला. स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्याकडून देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार सुपा गावच्या सर्वांगीण विकासात मोलाची भुमिका बजावत अग्रेसर राहणाऱ्या सरपंच मनिषा योगेश रोकडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, मा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, समाजसेवक यादवराव पावसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.      यावेळी सोमनाथ रोकडे, जाधव  स्मिता , वर्षा घुले,राणी रोकडे,सविता ठोकळ,सुमन रोकडे, क्षितीजा रोकडे, यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.          सुपा गावच्या स

फॉलोअर