भोयरे पठार जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. कला आणि संस्कृतीचा अविस्मरणीय मिलाफ.
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा भोयरेपठार येथे "शाळेला गावाचा आधार , गावाला शाळेचा अभिमान" या ब्रीदवाक्यानुसार शिवजयंतीचे औचित्य साधत वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उदघाटन प्रसंगी कोल्हे साहेब मार्केट कमिटी, संचालक राजू शेठ आंबेकर, सरपंच बाबाजी टकले, उपसरपंच राजेश बोरकर, उद्योजक किशोर शेठ कदम, मेजर अशोक मुठे, गणेश शेठ मुठे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ कावरे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छावा गीतातील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून उपस्थितांच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत , लोकनृत्य व सामाजिक संदेश देणाऱ्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे युवा नेते प्रतिकदादा शेळके यांनी शाळेला आवश्यक असणारी साऊंड सिस्टीम विद्यार...