दहिगावात शेतकऱ्याचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी. तरूण सामाजिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाची आग विझवण्यात मोलाची भूमिका.
अहिल्यानगर प्रतिनिधी:- तालुक्यातील दहिगाव श्रीरामांचे या ठिकाणी दि ७ मे रोजी भर दुपारी मारुती नेटके हे आपल्या कुटुंबासह शेतात शेतकाम करत असताना घराला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धुर व आवाज येऊ लागल्याने गावातील तरुणांनी धूराच्या दिशेने धाव घेतली त्यांवेळी तरुणांनी मारुती नेटके यांच्या घराला आग लागल्याचे लक्षात आले. सदर आग लागल्याची खबर नेटके कुटुंबातील सदस्यांना देण्यात आली. परंतु तो पर्यंत आगी संपूर्ण घरात पसरली होती चोहोबाजूंनी आगीने वेढा टाकला होता. घरात गॅस सिलिंडर टाकी असल्याने आग विझवण्यासाठी मोठ्या धाडसाच काम होत. या वेळी गावातील राधाकिसन कासार, रविराज पोटरे, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के, संजय शिंदे, अभिमन्यु नेटके, शाम जाधव यांनी मिळून युक्तीने जाळं चालू असताना गॅस टाकी बाहेर काढण्याचे काम केले. आग मोठ्या प्रमाणावर भडकली असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असल्याने अहिल्यानगर महानगरपालिका अग्निशमन दलाचे वाहन काही मिनिटांत दहिगाव येथे पोहचल. परंतु दहिगावातील अतिक्रमणामुळ अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळ...