कामरगाव ग्रामपंचायत कडून दहावी गुणवंतांचा सत्कार. पदाधिकारी व ग्रामस्थांकडून विदयार्थ्याचे अभिनंदन व शुभेच्छा.
जाहिरात:- . 👇🏻 ************************************ अहिल्यानगर(हेमंत साठे):- तालुक्यातील कामरगाव येथील भारत सर्व सेवा संघ संचलित कामरगाव इंग्लिश स्कुल कामरगाव या विदयालयाचा दहावीचा निकाल 94.73% लागला. या निकालाच्या अनुषंगाने दहावी गुणवंतांच्या सत्कार समारोहाचे आयोजन कामरगाव ग्रामपंचायकडून दि 19 मे रोजी हनुमान मंदिर सभागृह कातोरेवाडी या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी गुणवंतापैकी प्रथम कु. धनश्री बाळासाहेब ठोकळ -92.60%, हर्षदा अविनाश आंधळे- 86.80%, तृतीय समृद्धी अंकुश ठोकळ-86.40% चतुर्थ चि किशोर विजय ठोकळ-84.80%, पाचवा सुयश घनश्याम कातोरे- 79.20% असे गुणानुक्रमे 5 विदयार्थ्याचा कामरगाव ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांकडून फेटा बांधून तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा.सरपंच तथा ग्रामपंचायतचे विदयमान प्रशासक संदिप ढवळे, मा.सरपंच वसंतराव ठोकळ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम ठोकळ, मा.सरपंच तुकाराम कातोरे, लक्ष्मण शामराव ठोकळ, शिवाभाऊ सोनवणे,पत्रकार हेमंत साठे, गणेश बनकर, कैलास झरेकर या मान्यवरांच्या हस्त...