पोस्ट्स

मंगळसूत्र चोरास मुद्देमालासह अटक ! श्रीरामपुर शहर पोलीसांची धडक कारवाई !

इमेज
अहमदनगर:- दिनांक 18/10/2023 रोजी सांयकाळी 07/00 वा.चे सुमारास फिर्यादी डॉ. सरोज विनायक मोरगे, रा.मोरगे हॉस्पीटल, श्रीरामपूर या, सुभाष कॉलनी, वार्ड नं. 06, श्रीरामपूर येथे डॉ.पटारे मॅडम यांच्या वाढदिवसाकरीता आल्या होत्या. वाढदिवस झाल्यांनतर रात्री 08/15 वा.चे सुमारास घरी जाण्याकरीता निघाल्या तेव्हा त्यांना डॉ.पटारे यांच्या हॉस्पिटल समोर रोडवरती वॉर्ड नं. 06, श्रीरामपूर येथे त्याच्या इतर मैत्रिणी डॉ. स्फुर्ती जयसवाल, डॉ. नेहा बैरागी, डॉ. सरीता देशपांडे, भेटल्याने त्यांच्या सोबत रोडवर बोलत उभे राहिल्या तेव्हा अचानक काळे रंगाच्या मोटार सायकलवर दोन अनोळखी मुले आले व गाडीचा वेग कमी केला व माझ्या गळयातील 98,007/- रु.कि.चे 7.420 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व त्यामध्ये असलेले काळे मण्याची पोत तसेच रियल डायंमडचे पॅन्डल जु.वा.किं.अ. मोटार सायकलवर मागे बसलेल्या मुलाने बळजबरीने हिसकावुन घेवुन भरधाव वेगात निघुन गेले वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पो. स्टे. गुरनं. 1128/2023 भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना पोनि. हर्षवर्धन गवळी यांना सदर

लाच घेताना सरपंचासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत मधेच अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले !.

इमेज
नगर(प्रतिनिधी):- नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातल्या कोकणगावच्या महिला सरपंचाला ४० हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. ४ लाख ६१ हजार ५६८ रुपयांच्या खर्चातून करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामात दहा टक्के ४६ हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ४० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारण्यात आली. या कारवाईत सरपंच आणि आणखी एका इसमाला अटक करण्यात आली. उज्वला सतिष रजपूत (वय 32 वर्ष, सरपंच, कोकणगाव, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर रा- कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि सतिष बबन रजपूत (वय 42 वर्ष, धंदा – शेती रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावं आहेत. तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असुन, त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती,संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचा 4,61568/-₹ चा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता,तक्रारदार यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केले, तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंटला जमा करण्याबाबत सरपंच व त्यांचे पती यांना विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46,000/-₹

सकल मराठा समाजाच्या मोफत वधू वर मेळाव्याचा लाभ घ्यावा- मा. नगराध्यक्ष पोटे ; सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेचा उपक्रम

इमेज
 नगर(प्रतिनिधी):- सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या वतीने श्रीगोंदा शहरात मोफत मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 श्रीगोंदा शहरामध्ये पंतनगर, कम्युनिटी हॉल,शनी चौक श्रीगोंदा, जि.अ.नगर सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे. या मोफत मेळाव्याचा जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील वधू-वर पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे व मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी केले आहे.   आजकाल लग्न जमविण्यासाठी नातेवाईक, भाऊबंद , मामा यांना कुणालाही वेळ मिळत नाही . तसेच स्थळ मिळवणे फार कठीण समस्या होऊन बसली आहे . म्हणून अशा वधुवर मेळाव्याची गरज भासू लागली आहे . हा मेळावा मोफत आहे . मेळाव्याला स्वतः वधू वरांनी येणे गरजेचे आहे . मेळाव्यासाठी येताना एक बायोडाटा व फोटो आणावा . यामध्ये वेगवेगळ्या जिल्हयातील व तालुक्यातील आपल्याला आवडीप्रमाणे स्थळ समक्ष पाहता येणार आहेत.   आतापर्यंत मराठा सोयरिक संस्थेमार्फत 3000 लग्न जमलेले आहेत.त्यापैकी साडेपाचशे लग्न हे विधवा विदुर घटस्फोटीत यांचे जमलेले आहे. धर्मादाय कार्य

सुपा MIDC तील कंपनीच्या केमिकल युक्त पाण्यामुळे सुपेकरांचे आरोग्य धोक्यात.

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर पुणे महामार्गालगत असणाऱ्या जुन्या सुपा एम आय डीसीतील  ऑरगॅनिक्स कंपनीतून सोडलण्यात आलेल्या केमिकल युक्त पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके जळाली आहेत. तसेच नजीकच असणाऱ्या व सुपा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केमिकल युक्त पाणी मिसळल्यामुळे तलावातील अनेक मासे मृत्युमुखी पडल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे, माजी उपसरंपच दत्ता ना ना पवार, माजी उपसरपंच सागर मैड व इतर पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तलावात केमिकलयुक्त पाणी मिसळून मासे मृत्युमुखी पडल्याचे आढळले. या तलावा सोबतच इतर खाजगी विहिर व बोअरवेलमधे केमिल युक्त पाणी गेल्याची शक्यता झाल्याने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत व नागरीकांच्या आरोग्याबाबत दक्षता म्हणून  आरगॅनिक्स कंपनीच्या केमिल युक्त पाण्यामुळे सुपेकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता  असल्याने  सु पा ग्रामपंचायत कडून तात्काळ गावाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तसेच ऑरगॅनिक्स कंपनीच्या व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला.  सरपंच मनिषा योगेश रोकडे यांच्य

नगर शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! एम.आय.डी.सी. पोलीसांची धडक कारवाई !

इमेज
  नगर ( प्रतिनिधी):- शहरातील चेतना कॉलनी एम.आय.डी.सी नवनागापुर येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणा-या महिलेच्या घरावर छापा टाकुन दोन पिडीत मुलींची सुटका करत एम.आय.डी.सी पोलीसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.         याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०४/१०/२०२३ रोजी श्री संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांना चेतना कॉलनी एमआयडीसी नवनागापुर ता. जि. अहमदनगर येथे राहत्या घरात एक महिला हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे.. त्याबाबत गोपनिय माहिती मिळाली त्यावेळी मा. श्री. संपतराव भोसले यांनी सपोनि राजेंद्र सानप यांना आदेश देवून एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत मुलींची सुटक करण्यात आली आहे. वेश्या व्यवसाय चालवणारी महिला आरोपी हिस ताब्यात घेवुन तिला सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर महिलेविरुदध एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ९१९ / २०२३ भादवि कलम ३७० सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे... सदरची कारवाई मा

खाजगीकरण विरोध व जुनी पेन्शन योजना मागणीसाठी दिल्लीत सरकारी कर्मच्याऱ्यांचा एल्गार ! नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कर्मच्याऱ्यांचा शंखनाद आंदोलनात सहभाग !

इमेज
  ( प्रतिनिधी:-हेमंत साठे):- दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत रामलीला मैदान ठिकाणी  *nmops* व *mrjps* महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्यावतीने खाजगीकरण व जुनी पेन्शन योजना बंद केल्यामुळे केंद्र सरकार विरोधात शंखं नाद आंदोलन करण्यात आले. संपूर्ण देशभरातून खाजगीकरणाला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे हा संताप दिल्ली या ठिकाणी रामलीला मैदानावर कर्मचाऱ्यांनी एकजुटीने दाखवला. रामलीला मैदानावर संपूर्ण देशातून आठ लाख कर्मचारी उपस्थित होते.  दिल्ली येथून शिक्षक नेते राजेंद्र ठोकळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मधून जवळजवळ 20ते25 हजार कर्मचारी दिल्ली या ठिकाणी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यामधून या आंदोलनासाठी दोनशे कर्मचारी उपस्थित होतेयावेळी पेन्शन संघटनेचे राज्य नेते राजेंद्र ठोकळ यांनी राज्याच्यावतीने आंदोलनाला संबोधित केले. शिक्षक नेते राजेंद्र ठोकळ यांनी सांगितले की या आंदोलन चा हेतू भारत हे राष्ट्र संविधानावर चालणारे राष्ट्र आहे परंतु या  सरकारने संविधान मोडीत काढली आहे कर्मचाऱ्यावर अन्याय करणारे अनेक शासन निर्णय या सरकारच्या काळात लागू झाले.  खाजगीकरण करून शासन आपले कर्तव्य विस

शेतकऱ्यांच्या मोटर केबल चोरणारे चोरटे जेरबंद ! स.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातून केले आरोपी जेरबंद !

इमेज
नगर ( प्रतिनिधी) :- तालुक्यातील निमगाव घाणा, शिंगवे गावातुन शेतक-यांचे शेतातील पाण्याच्या मोटारीचे केबल चोरणारे दोन चोरटे जेरंबद करत २४.८०० रुपयाचे पाण्यातील मोटारीचे केबल जप्त करण्याची कारवाई बीड जिल्ह्यात जाऊन एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.         याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १९/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे बाळासाहेब सखाराम तळुले वय ४५ वर्ष धंदा- शेती रा निमगाव घाणा ता. जि. अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दि. १८/०९/२०२३ रोजी रात्री १०.३० वा चे सुमारास ते दि. १९/०९/२०२३ रोजी सकाळी ०८.३० वा चे दरम्यान निमगाव घाणा येथील एरोगेशनच्या तलावात टाकलेल्या इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटरीच्या २४,८००/- रु किंमतीच्या श्री फेस केवल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की. सदरचा गुन्हा हा १ ) अंबादास महादेव घुले, २) रामेश्वर भास्कर घुले, दोन्ही रा. कारखेल ता. आष्टी जि.बीड यांनी केला असून ते कारखेल येथ

फॉलोअर