पोस्ट्स

स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना सरपंच सेवा संघाचा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार" !

इमेज
(सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र्र राज्य यांच्या वतीने २०२३ चा दिला जाणारा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार "स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना प्रदान करतांना सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे आदी.) नगर ( प्रतिनिधी):- दि 26 /12 /2023 - सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा २०२३ चा "राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार" स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना प्रदान करण्यात आला.  अहमदनगर येथील माउली संकुल सभागृह येथे हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पदक, फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. उद्धव शिंदे यांनी रक्तदान, गरीब गरजूंना मोफत ब्लँकेट, टोपी, छत्री वाटप, गरिब मुलांना शालेय साहित्याचे वाटप, याचबरोबर गोरगरीब जनतेला कपडे,  असे समाजोपयोगी उपक्रम राबवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्या

नगर तालुक्यातील या गावातील तलाठी लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात !

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील शेंडी येथील महिला तलाठी निकिता शिरसाठ यांना 50 हजार रुपयाची लाच घेताना रंग हात पकडले अँटीकरप्शन विभागा ने सोमवारी ही कारवाई केली आहे.        अँटी करप्शन विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण लोखंडे यांची माहिती *यशस्वी सापळा:-  ▶️ *युनिट -* अहमदनगर ▶️ *तक्रारदार-* पुरुष  वय- 35 वर्षे,  रा. शेंडी, ता.नगर, जि.अहमदनगर ▶️ **आरोपी* = १) निकिता जितेंद्र शिरसाठ, वय-46 वर्ष, पद- तलाठी सजा शेंडी,(वर्ग-3), ता.नगर,  जि.अहमदनगर 2) संकेत रणजीत ससाणे वय-26 वर्ष, तलाठी शिरसाठ यांचे खाजगी मदतनीस, रा. निर्मल नगर, तपोवन रोड, अहमदनगर ▶️ *लाचेची मागणी-* 50,000/-₹  ▶️ *लाच स्विकारली*  50,000/ ₹ ▶️ *हस्तगत रक्कम-* 50,000/-₹ ▶️ *लाचेची मागणी -* ता.11/12/2023 ▶️ *लाच स्विकारली* -ता.11/12/2023 ▶️   *लाचेचे कारण*  यातील तक्रारदार यांचे मौजे शेंडी गावातील शेत जमिनीची खरेदीची नोंद करण्यासाठी व इतर तीन गटातील वडिलोपार्जित मिळकतीची हक्क सोड नोंद करण्यासाठी श्रीमती शिरसाठ, तलाठी सजा शेंडी यांनी तक्रारदार यांचे कडे 50,000/- रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबतची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे आज

नगर तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान ! शेतकऱ्यांना मागील वर्षीची अतिवृष्टीची मदत मिळाली नसताना पुन्हा अस्मानी संकट !

इमेज
  नगर (हेमंत साठे) - नगर जिल्ह्याच्या  दक्षिण भागात रविवार (दि.२६) पासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत थैमान घातलेले आहे.  अवकाळी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागातील नगर व पारनेर तालुक्यातील गावांना गुरुवारी (दि.३०) रात्री पुन्हा एकदा मुसळधार वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, अवकाळी पावसाने नगर तालुक्यात जोरदार हजेरी लावत्यामुळे  अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नगर तालुक्यात झालेल्या पावसाची आकडेवारी :-  गेल्या रविवार (दि.२६) पासून दररोज अवकाळी पाऊस कोसळत आहे. गुरुवारी (दि.३०) रात्री १० वाजेनंतर नगर शहर परिसरासह तालुक्यात आणि जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाला. नगरच्या नालेगाव मंडलात २६.८ मिमी, सावेडी ५७ मिमी, कापूरवाडी ३९.८ मिमी, केडगाव ४५.५ मिमी, भिंगार १५ मिमी, नागापूर १६.५ मिमी, जेऊर ५५.५ मिमी, चिचोंडी पाटील २३.५ मिमी, वाळकी १६.३ मिमी, चास ५१.३ मिमी, रुईछत्तीसी १४.३ मिमी असा नगर शहर आणि तालुक्यात सरासरी ३२.८ मिमी पाऊस झाला आहे.  नगर तालुक्यातील कामरगाव मध्ये शेतमालाचे मोठे नुकसान ! नगर ता

अहमदनगर जिल्हा परिषद अधिकारी अॅन्टी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडला !

इमेज
  नगर( प्रतिनिधी):- मिळालेल्या माहितीनुसार नगर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचा अधिकारी नगर अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडला आहे. पुढील कारवाई सुरू आहे... क्रमशः 

मंगळसूत्र चोरास मुद्देमालासह अटक ! श्रीरामपुर शहर पोलीसांची धडक कारवाई !

इमेज
अहमदनगर:- दिनांक 18/10/2023 रोजी सांयकाळी 07/00 वा.चे सुमारास फिर्यादी डॉ. सरोज विनायक मोरगे, रा.मोरगे हॉस्पीटल, श्रीरामपूर या, सुभाष कॉलनी, वार्ड नं. 06, श्रीरामपूर येथे डॉ.पटारे मॅडम यांच्या वाढदिवसाकरीता आल्या होत्या. वाढदिवस झाल्यांनतर रात्री 08/15 वा.चे सुमारास घरी जाण्याकरीता निघाल्या तेव्हा त्यांना डॉ.पटारे यांच्या हॉस्पिटल समोर रोडवरती वॉर्ड नं. 06, श्रीरामपूर येथे त्याच्या इतर मैत्रिणी डॉ. स्फुर्ती जयसवाल, डॉ. नेहा बैरागी, डॉ. सरीता देशपांडे, भेटल्याने त्यांच्या सोबत रोडवर बोलत उभे राहिल्या तेव्हा अचानक काळे रंगाच्या मोटार सायकलवर दोन अनोळखी मुले आले व गाडीचा वेग कमी केला व माझ्या गळयातील 98,007/- रु.कि.चे 7.420 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व त्यामध्ये असलेले काळे मण्याची पोत तसेच रियल डायंमडचे पॅन्डल जु.वा.किं.अ. मोटार सायकलवर मागे बसलेल्या मुलाने बळजबरीने हिसकावुन घेवुन भरधाव वेगात निघुन गेले वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पो. स्टे. गुरनं. 1128/2023 भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना पोनि. हर्षवर्धन गवळी यांना सदर

लाच घेताना सरपंचासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत मधेच अॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले !.

इमेज
नगर(प्रतिनिधी):- नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातल्या कोकणगावच्या महिला सरपंचाला ४० हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. ४ लाख ६१ हजार ५६८ रुपयांच्या खर्चातून करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामात दहा टक्के ४६ हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ४० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारण्यात आली. या कारवाईत सरपंच आणि आणखी एका इसमाला अटक करण्यात आली. उज्वला सतिष रजपूत (वय 32 वर्ष, सरपंच, कोकणगाव, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर रा- कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि सतिष बबन रजपूत (वय 42 वर्ष, धंदा – शेती रा. कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावं आहेत. तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असुन, त्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील रस्ता दुरुस्ती,संरक्षण भिंत बांधकाम अशा कामाचा 4,61568/-₹ चा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता,तक्रारदार यांनी मुदतीत सर्व काम पूर्ण केले, तक्रारदार यांनी त्यांचे कामाचे बिल अकाउंटला जमा करण्याबाबत सरपंच व त्यांचे पती यांना विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46,000/-₹

सकल मराठा समाजाच्या मोफत वधू वर मेळाव्याचा लाभ घ्यावा- मा. नगराध्यक्ष पोटे ; सकल मराठा समाज व मराठा सोयरिक संस्थेचा उपक्रम

इमेज
 नगर(प्रतिनिधी):- सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या वतीने श्रीगोंदा शहरात मोफत मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 श्रीगोंदा शहरामध्ये पंतनगर, कम्युनिटी हॉल,शनी चौक श्रीगोंदा, जि.अ.नगर सकाळी 10 ते 2 या वेळेत होणार आहे. या मोफत मेळाव्याचा जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील वधू-वर पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा. नगराध्यक्ष मनोहर पोटे व मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी केले आहे.   आजकाल लग्न जमविण्यासाठी नातेवाईक, भाऊबंद , मामा यांना कुणालाही वेळ मिळत नाही . तसेच स्थळ मिळवणे फार कठीण समस्या होऊन बसली आहे . म्हणून अशा वधुवर मेळाव्याची गरज भासू लागली आहे . हा मेळावा मोफत आहे . मेळाव्याला स्वतः वधू वरांनी येणे गरजेचे आहे . मेळाव्यासाठी येताना एक बायोडाटा व फोटो आणावा . यामध्ये वेगवेगळ्या जिल्हयातील व तालुक्यातील आपल्याला आवडीप्रमाणे स्थळ समक्ष पाहता येणार आहेत.   आतापर्यंत मराठा सोयरिक संस्थेमार्फत 3000 लग्न जमलेले आहेत.त्यापैकी साडेपाचशे लग्न हे विधवा विदुर घटस्फोटीत यांचे जमलेले आहे. धर्मादाय कार्य

फॉलोअर