पोस्ट्स

गावठी पिस्तूल बाळगणारा आरोपी गजाआड ! भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई !

इमेज
नगर (प्रतिनिधी):- दिनांक २६/०४/२०२४ रोजी गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांकडून जेरबंद करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२५/०४/२०२४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा त्याचे कंबरेला गावठी कटटा (अग्नीशस्त्र) लावुन बु-हाणनगर रोडवरील दमडी मशिद जवळ संशयास्पद फिरत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ सदर ठिकाणी जावुन स्वताची सुरक्षितता बाळगुन प्राप्त माहिती आधारे सदर ठिकाणी दोन प्रतिष्ठीत पंचांना घेवुन जावुन खात्री करुन व काही आक्षेपार्ह मिळुन आल्यास त्याचेवर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जावुन दमडी मशिदजवळ जावुन पाहणी केली असता तेथे एक इसम संशयास्पद फिरतांना दिसुन आल्याने पंचांची व पोलीसांची खात्री होताच त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत कंबरेला खोसलेला एक २५२००- रु किं चा लोखंडी पिस्टल मॅगजिन गावठी बनावटीचा कटटा (अग्नीशस्त्र) व दोन

बारा वर्षानंतर निवृत्त शिक्षिकेस सोन्याचे गंठन मिळाल्याने...आनंद गगणात मावेना. कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व टीमचे कौतुक !

इमेज
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २६ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ०६.३० वा. सुमारास नगर-पुणे महामार्ग नजीक आरती हॉटेल समोरुन सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे रा. शाहुनगर, केडगांव अहमदनगर या शिक्षिका २६ जानेवारी निमित्त झेंडावंदन कार्यक्रमा करीता त्यांचे दुचाकी वरुन १०८ महंत पंडीत माध्यमिक विदयालय, नुतन कन्या शाळा, अहमदनगर येथे जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या सोनसाखळी चोरांनी त्यांचे गळ्यातील ०१ तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठन ओढून चोरुन नेले होते. त्यावरुन त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्याने कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजिष्टर नंबर ३०/२०१२ भादंविक. ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवुन सदर गुन्हयाचे तपासामध्ये पोलीसांनी आरोपी अटक करुन तपासामध्ये यातील फिर्यादी सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे यांचे गळयातील १ तोळा वजनाचे सोन्याचे गंठन सन २०१२ मध्ये हस्तगत करण्यात आले होते.         सुमारे १२ वर्ष उलटुनही यातील फिर्यादी सौ. सुनिता सोन्याबापू सोनवणे, सेवानिवृत्त शिक्षिका, रा.शाहुनगर, केडगांव अहमदनगर यांचे १ तोळा वजनाचे सोन्याचे गंठन त्यांना परत मिळाले नव्हते. तसेच अश्या प्रकारचे बऱ्याच फि

चिचोंडी पाटील येथील राजू कोळी यांच्या घराच्या जळीताची सखोल चौकशी व्हावी. - सरपंच शरद पवार

इमेज
नगर( प्रतिनिधी):- तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील नगर जामखेड रस्त्यालगत बस स्थानक शेजारी राजू कोळी यांच्या घराला आज पहाटे पाचच्या दरम्यान आग लागल्याने संपूर्ण घर  जळून खाक झाल आहे. राजू कोळी व पत्नी पुढच्या खोलीत झोपले होते त्यामुळे त्यांना या घटनेत इजा झाली नाही परंतु घरातील वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते. सदर घटनेत आग घराच्या मागच्या बाजूने लागल्याने त्यांच्या घरातील गुरुपयोगी वस्तू टीव्ही फॅन कूलर मिक्सर कपडे व इतर वस्तूंची जळून खाक झालेली आहे, राजू कोळी राहत असणाऱ्या घराची जागा वादग्रस्त असल्याने सदर जळीत संशयास्पद आहे, त्यामुळे या घराच्या जळीताची सखोल चौकशी करण्यात यावी असे कोळी परिवार व सरपंच यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. सदर घटनास्थळी सरपंच शरद पवार, पोलीस पाटील संतोष खराडे, पत्रकार बाळासाहेब गदादे व कोळी परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते, थोड्याच वेळात नगर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल होऊन सदर घटनेची सखोल चौकशी करणार असल्याचे पोलीस पाटील यांनी सांगितले, 📲 * बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882 *

सुपा सरपंच मनिषा योगेश रोकडे यांनी भागवली वन्यजीवांची तृष्णा !सलग पाच वर्षापासून रोकडे यांचा प्रेरणादायी उपक्रम.

इमेज
  पारनेर (प्रतिनिधी):- उन्हाळा सुरू झाला की वन्यप्राण्यांची पाण्याची सोय नसल्या कारणाने पाण्यासाठी वणवण सुरू होते. ऐन उन्हाळयात मुक्या जीवांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकावे लागत असून, गेल्या पाच वर्षापासून सुपा गावच्या सरपंच मनिषा रोकडे या मुक्या जीवांची तृष्णा भागवत आहेत. दरवर्षी वर्षी कडक उन्हाळ्यात वन्यजीवांना पाणी लागते. पाणवठयात पाणी सोडले पाहिजे असते,  तालुक्यात वन्यप्राण्यांसाठी वन विभागाने अनेक गावात पाणवठे तयार केले आहेत. परंतु वन अधिकारी, वन कर्मचारी या गावात पाणवठ्यात पाणी सोडत नाही. अशी वन्यप्रेमींची तक्रार असते. प्रत्येक वर्षी उन्हाळा आला की अधिकारी त्या पाणवठ्याची तात्पुरती डागडूजी करतात व नागरीकांमधून थोडीफार ओरड झाल्यावर पाणी सोडतात, हे नेहमीचे चित्र झाले आहे. पावसाळा व हिवाळ्यात नैसर्गिक स्रोतामुळे या वन्यजीवांना पाणी लागत नाही, परंतू उन्हाळ्याचे चार ते पाच महिने वणवण करावी लागत असते. फेब्रुवारी महिना संपला की,उन्हाची तीव्रता जाणवू लागते. नैसर्गिक जलस्रोत आटले किंवा विहिरी, बोअरवेलचे पाणी संपले की  प्राणी वाडी-वस्त्यांकडे पाण्याच्या शोधात निघतात. वनविभागाच्या वतीने

कामरगावात सापडले अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे. इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांचे संशोधन .

इमेज
नगर ( हेमंत साठे):- अश्मयुगीन मानव म्हटलं की नजरेसमोर येतं ते इयत्ता तिसरीच पुस्तक ' माणसाची गोष्ट'  हा मानव कसा होता ? काय खात होता? हे या पुस्तकातूनच आपण शिकलो. याचे अस्तित्व दाखवणारी ठिकाणं आपल्या नगर जिल्ह्यात असतील हे आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. अशाच एक अश्मयुगीन ठिकाणाचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक श्री सतीश भिमराव सोनवणे यांनी लावला. हे ठिकाण कामरगाव जवळच्या ' मावलया डोंगरावर' आहे.  कामरगाव नगर तालुक्यातील एक गाव. या गावाच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग आहे.  यातील  विठ्ठलवाडी कडून अस्तगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नगर पुणे महामार्ग पासून साधारणतः३ किमी अंतरावर एका टेकडीला मावलयाचा डोंगर म्हणतात. या ठिकाणाला त्यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भेट दिली. तेथे डोंगरावर काही उभ्या शिळा ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूला मध्ययुगीन काळातील कोणतीही मूर्ती नसलेले बांधकाम आहे.  याचा बारकाईने अभ्यास केला असता ही वेगळीच रचना असल्याचे लक्षात आले. त्यानुसार अभ्यास सुरू केला.  आणखी निरिक्षण करण्यासाठी दुसऱ्यांदा दिनांक १० मार्च २०२४ रोजी  भेट दिली. या व

कामरगाव शिवारात भीषण अपघातात युवक गंभीर जखमी !

इमेज
  नगर – पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात उभ्या असलेल्या मालट्रक वर आदळून नगर शहरातील युवक गंभीर जखमी झाल्याचे समजते. रस्त्यात उभ्या असलेल्या मालट्रक वर दुचाकी जोरात आदळून भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  नगर पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात बंद पडलेल्या डी मॅक कंपनी समोर रविवारी रात्री ८ च्या सुमारास नगरकडे येणारा एक मालट्रक अचानक रस्त्यातच बंद पडला. रात्रीच्या अंधारात या मालट्रकचा अंदाज न आल्याने पुण्याहून नगर कडे मोटारसायकलवर येत असलेला प्रकाश रघुनाथ बडे (वय २३, रा.बोल्हेगाव) याची मोटारसायकल ट्रक ला पाठीमागून जोरात धडकली. त्यामुळे त्याचे डोके ट्रक वर आदळून तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व मृत्युंजय दूत म्हणून काम करणारे सिद्धांत आंधळे व त्यांचे सहकारी अमन शेख, नितीन लांडगे, संजय ठोकळ, प्रवीण चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी

स्व.आ .वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उपक्रमशिल शिक्षक प्रमोद झावरे यांच्याकडून शाळेस पुस्तके भेट.

इमेज
पारनेर प्रतिनिधी:- पारनेर तालुक्याचे स्व. मा.आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त  वासुंदे गावचे ग्रामस्थ व राहुरी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक प्रमोद झावरे  यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकळी ढोकेश्वर, श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी ढोकेश्वर व रयत शिक्षण संस्थेचे कै . प्र .ग . खिलारी पाटील विद्यालय या  शाळांच्या ग्रंथालयांना विविध पुस्तके प्रसिद्ध उदयोजक, लेखक वक्ते श्री . एन बी धुमाळ यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापकांकडे  सुपुर्द केली . विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ वाढवावी व ज्ञान प्रसार व्हावा या हेतूने शिक्षक प्रमोद झावरे हे नेहमी विविध शाळांना पुस्तके भेट देत असतात . ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी ,प्राचार्य वाव्हळ ,शिक्षक अंबादास झावरे , पंडीतनाना झावरे , तारकराम झावरे , मंगेश खिलारी , राजेंद्र ठुबे, अतुल सैद, कर्ण रोकडे आदींच्या उपस्थितीत पुस्तके भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:- 7057791882*

फॉलोअर