पोस्ट्स

कामरगाव येथील मातोश्री सिताबाई काजळे कन्या छात्रालयात मुलींना गणवेश वाटप.

इमेज
  अहिल्यानगर/प्रतिनिधी:-  श्री सद्‌गुरु सेवा मंडळ पुणे संचलित, मातोश्री सिताबाई काजळे कन्या छात्रालय कामरगाव येथील मुलींच्या वसतिगृहात कै.हभप बबन महाराज कळसकर यांचा 32 वा पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृह उभारणीकरीता महत्वाचे योगदान दिलेले मा.आरोग्य अधिकारी बापूसाहेब शेळके हे होते.  तर सामाजिक कार्यकर्ते हाबू शिंदे, मा.सरपंच तुकाराम कातोरे गुरुजी, मा.मुख्याध्यापक सुदाम ठोकळ, सेवानिवृत्त  शिक्षक साहेबराव ठोकळ, पत्रकार हेमंत साठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. वसतिगृहातील मुलींनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच कै ह.भ.प. बबन महाराज कळसकर यांच्या कार्याबददल माहिती दिली.  मान्यवरांनी या कार्यक्रमप्रसंगी आपल्या मनोगतातून वस‌तिगृहाकरिता मदत करण्याचे आश्वासन दिले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते वसतिगृहातील मुलींना व कर्मचाऱ्यांना संस्थेकडून गणवेश वाटप करण्यात आले. वसतिगृहाच्या अधिक्षिका श्रीमती फुलाबाई कानवडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे मार्गदर...

एआय आधारित बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर जिल्हा व्याघ्र कक्ष समितीची बैठक संपन्न

इमेज
  अहिल्यानगर/ प्रतिनिधी:दि. २८ – जिल्ह्यात वाढत्या मानव–बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआय आधारीत बनावट वन्यप्राणी व्हिडिओ तयार करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या. ते जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत बोलत होते. बैठकीस उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, समितीचे सदस्य सचिव व विभागीय वनअधिकारी (दक्षता) नाशिक डॉ. अजित साजणे, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, गणेश मिसाळ, सौ. अश्विनी दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, दादासाहेब वाघुलकर, मानद वन्यजीव रक्षक मंदार साबळे, पोलीस निरीक्षक सुधाकर कुहाडे व किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा) आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री. घार्गे म्हणाले, वनविभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पोलिसांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मानव–बिबट्या संघर्षाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांच्या विविध गावांतील व्हॉट्सअ‍ॅप गटांमध्ये वनअधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. वन्यप्राणी अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ ओळखणे, तसेच अस्...

सुप्यात वाहतूक कोंडीचा कहर ! अहिल्यानगर- पुणे महामार्गावर आपत्कालीन सेवांवर परिणाम.

इमेज
  अहिल्यानगर  (प्रतिनिधी): अहिल्यानगर–पुणे महामार्गावरील सुपा परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे. सुपा गाव ते टोल नाका परिसरापर्यंत वाहतुकीची सततची कोंडी आता नागरिक, प्रवासी, उद्योगधंदे तसेच रुग्णवाहिकांसाठी मोठ्या संकटाचे रूप घेत आहे. *प्रमुख कारणे : रस्त्यावर पार्किंग व अतिक्रमण.* सुपा बाजारपेठ परिसरात प्रसिद्ध बेकरी पदार्थांसाठी वाहनांची मोठी गर्दी होत असून अनेक बेशिस्त वाहन चालक रस्त्यातच गाड्या उभ्या करतात. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही मिनिटांतच ठप्प होते. मध्यंतरी अहिल्यानगर–पुणे महामार्गालगत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. *एमआयडीसी पोलिस स्टेशनकडे नागरिकांचा आक्षेप.* सुपा एमआयडीसी पोलिसांनी या वाहतूक कोंडीवर ठोस भूमिका घेत नसल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गावर सतत वाढणाऱ्या वाहनसंख्येचा विचार करता येथील वाहतूक नियोजन अपुरे असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. आपत्कालीन सेवा धोक्यात आज (दि. २७ मे) एका प्रवाशाने ११२ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितल्यानंतर...

श्री क्षेत्र दत्त देवस्थान कामरगाव येथे संगीतमय तुलसी रामायण सोहळा व नाथभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन. ; आयोजक श्री.बापू माऊली ठोकळ यांचे नागरीकांना आवाहन.

इमेज
अहिल्यानगर/ प्रतिनिधी:- तालुक्यातील कामरगाव येथे श्री. दत्त देवस्थान या ठिकाणी  सं गीतमय तुलसीरामायण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र कामरगाव येथे संगीतमय तुलसीरामायण कथा सोहळा मोठ्या भक्तीभावाने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री दत्त देवस्थानचे मठाधिपती श्री.बापू माऊली ठोकळ यांनी दिली. दिनांक २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा भव्य अध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमादरम्यान दररोज विविध आध्यात्मिक विषयासह संगीतमय तुलसी रामायण कथाकथन तसेच रामभक्तीने परिपूर्ण धार्मिक उपक्रमांचे तसेच रोज भाविकांसाठी प्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि १ डिसेंबर २०२५ रोजी नाथभक्त तथा सुप्रसिद्ध नाथगायक आकाश शिंदे यांचा नाथ भक्ती गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांसाठी आयोजक बापू माऊली ठोकळ व आयोजक मंडळाने सर्व नागरिकांना, भाविकांना व सांस्कृतिक रसिकांना उपस्थित राहून हा अध्यात्मिक सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. आयोजक श्री.बापू (माऊली) ठोकळ यांच्या वतीने सांगण्यात आले की, “रामकथा ही भक्ती, ज्ञान आणि संस्कारांचे प्रे...

मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामरगाव येथे महायुतीच्या वतीने वटवृक्ष लागवड.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील कामरगाव येथे मा.खासदार तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या वतीने वटवृक्ष लागवड करण्यात आली. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे यांनी दिली.        मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या वतीने कामरगाव येथील स्मशानभूमी परिसरात वटवृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित जेष्ठ नेते तथा प्रगतीशील शेतकरी गोरख साठे, सामाजिक कार्यकर्ते तथा मा.सरपंच तुकाराम कातोरे, सरपंच संदीप ढवळे,जेष्ठ नेते श्यामराव आंधळे, युवा नेते संदीप लष्करे, सोसायटी मा.चेअरमन अनिल आंधळे, मा.चेअरमन शिवाजी साठे, सुदाम ठोकळ सर,  व्हाईस चेअरमन राजेंद्र राजगुरू, भाऊ राजगुरू,  ग्रामपंचायत सदस्य राजू पठाण,लक्ष्मण ठोकळ, प्रदीप साठे, वसीम शेख,  इम्रान शेख, संदीप भिंगारदिवे, भिमराव सातपुते, योगेश ठोकळ, संदीप पाडेकर, ठोकळ मेजर, अमोल गुंजाळ, संतोष साठे,  सौरभ सातपुते, सोहम कुसळकर, यांच्या...

स्नेहबंध’च्या उपक्रमातून समाज जनजागृतीला नवे बळ. सामाजिक कार्याबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा सीईओ पल्लवी विजयवंशी यांच्या हस्ते सन्मान

इमेज
{स्नेहबंध'चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सन्मान करताना सीईओ पल्लवी विजयवंशी, सपोनि. जगदीश मुलगीर.} अहिल्यानगर (हेमंत साठे):- समाजातील विविध घटकांमध्ये जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशन राबवत असलेल्या उपक्रमातून समाज जनजागृतीला नवे बळ मिळते, असे प्रतिपादन छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी केले. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजयवंशी यांच्या हस्ते शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, श्री रोकडेश्वर मंदिराचे अध्यक्ष नंदकुमार झंवर, हरदिन मॉर्निंगचे अध्यक्ष संजय सपकाळ, माजी प्राचार्य एकनाथ जगताप, योगगुरू रामचंद्र लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.  सीईओ विजयवंशी म्हणाल्या, “सामाजिक कार्यात सातत्य, संवेदनशीलता आणि लोकाभिमुखता या गुणांनी स्नेहबंधचे कार्य वेगळेपण जपते. डॉ. उद्धव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत. डॉ. उद्धव श...

जिल्हा परिषद शाळा ढोकी येथे बिबटयाविषयी जनजागृती.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  ग्रामपंचायत ढोकी येथे वनसंरक्षक अधिकारी श्रीमती ज्योती दाभाडे या बिबट्यापासून आपले संरक्षण कसे करावे ? यासाठी जनजागृती करण्यासाठी ग्रामसभेत आल्या असता जि.प शाळेतील शिक्षक प्रमोद झावरे व प्रशांत ठुबे यांनी शाळेतही विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती द्यावी अशी विनंती केली असता त्यांनी शाळेत येऊन बिबटया जनजागृती संदर्भात माहिती दिली. तसेच पर्यावरण संरक्षणासंदर्भात मुलांना माहिती दिली.  ही माहिती देत असताना  मुलांनी देखील संवाद साधत या संदर्भात काही प्रश्न विचारावेत असे आवाहन केले. आणि त्यातूनच रंगला मुलाखतीचा कार्यक्रम यामध्ये सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी वनसंरक्षक यांना वेगवेगळे प्रश्न विचारून निसर्गा बद्दलचे कुतूहल जागृत केले. तुमचे शिक्षण कुठे झाले ?तुम्ही या क्षेत्रात कसे आलात? तुम्हाला हे क्षेत्र आवडतं का ?तुम्हाला कोणता पक्षी आवडतो ?तुमचा एक  जंगलातील अनुभव सांगा ? तसेच पिंजरे तुम्ही कोठे कोठे लावलेले आहेत? हे क्षेत्र तुम्हाला का आवडते? असे वेगवेगळे प्रश्न विचारून वनसंरक्षक दाभाडे मॅडम यांना विदयार्थ्यानी बोलते केले आणि त्यांनीही मुलां...

फॉलोअर