छत्रपती अभियांत्रिकी 'च्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
अहिल्यानगर(रफिक शेख): नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला विविध कार्य करू शकणारा मल्टी युटिलिटी रोबोट हा राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट स्पर्धेचे आकर्षण बनला. AISSMS IOIT College Pune येथे नुकत्याच झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत राज्यासह इतर राज्यातून विविध प्रोजेक्ट सादर करण्यात आले. सुमारे 250 प्रोजेक्ट्समधून छत्रपती अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी यात द्वितीय क्रमांक मिळवला. नवनाथ भिंगारदिवे, पार्थ साठे, आदित्य राऊत, तनुजा व्यवहारे अशी या विजेत्यांची नावे असून याच विद्यार्थ्यांनी या आधी छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यायात झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रोजेक्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. जाहिरात...👇🏻 या मल्टी युटिलिटी रोबोटची वैशिष्टे म्हणजे मोबाईलवरून रोबोटला ऑपरेट करू शकतो. व्हॉईस अँड टेक्स्ट कंट्रोल, स्पीड कंट्रोल, क्रुझ कंट्रोल, रेकॉर्ड अॅन्ड प्ले पाथ, मोबाईलवरून लाइव्ह कॅमेरा स्ट्रीमिंग, हॉर्न, पुढे जात अ...