पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’चा शुभारंभ. ; वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त. ; डिजिटल युगातही वाचन संस्कृती अबाधित, ग्रंथोत्सव ज्ञानपरंपरेचा सन्मान - शालिनीताई विखे पाटील.

इमेज
​अहिल्यानगर ( प्रतिनिधी) दि. २८ - ग्रंथांना आपण ‘गुरू’ची उपमा देतो. जसा गुरू शिष्याला ज्ञानाने समृद्ध करतो, तसेच ग्रंथ वाचकाला वैचारिक व बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करतात. डिजिटल क्रांतीच्या युगात काळ बदलत असला तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, ती नव्या माध्यमांतून अधिक व्यापक होईल, असा विश्वास शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून समाजातील सर्व घटकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ​प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती विखे पाटील बोलत होत्या. ​यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे, सरपंच कल्पना मैड, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूलकर, प्रा. गणेश भगत, चंद्रकांत पालवे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य राम पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती....

नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंचे फुलांच्या वर्षावात स्वागत -साकत येथे ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक. ;

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-   साकत खुर्द (ता. नगर) येथील  सुभाष पवार,   सुभाष शिंदे, मोहनतात्या चितळकर या  वारकऱ्यांनी पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार व स्वागत करण्यात आले.  पायी  हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास करत चार महिन्याच्या कालावधीत   कालावधीत त्यांनी दररोज किमान दहा ते पंधरा किलोमीटरचे अंतर पार करत आपली परिक्रमा यशस्वी पूर्ण केली. परिक्रमेच्या दरम्यान त्यांनी मार्गावरील विविध मंदिरे, आश्रम व देवस्थाने यांचे दर्शन घेतले. हा प्रवास जंगल भागातून झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऊन, वारा, थंडी तसेच शारीरिक कष्ट असूनही त्यांनी कोणतीही तक्रार न करता अत्यंत श्रद्धा, संयम व आत्मविश्वासाने हा खडतर प्रवास पूर्ण केला. चार महिन्याची खडतर परिक्रमा पूर्ण करून परतीचा प्रवास  करून साकतखुर्द येथे त्यांचे गुरुवारी ( दि. २६)  आगमन झाले. आगमन होताच ग्रामस्थांनी तसेच नातेवाईकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच फुलांचा वर्षाव करत त्यांचे जल्लोषात स्वागत  केले. यावेळी त्यांच...

लेखक सासवडे यांना राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

इमेज
अहिल्यानगर: अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत, साहित्योत्सव अंतर्गत राज्यस्तरीय खुली साहित्य लेखन स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. साहित्य पाठविण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत दिलेली होती. ही स्पर्धा 20, 21, 22 फेब्रुवारी 2026 अशा तीन दिवसात पार पडली. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून लेखक, कवी, नाट्यछटाकार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला होता.        साहित्योत्सवाच्या कथा लेखन स्पर्धेत आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर गावचे लेखक अजिनाथ सासवडे यांच्या "मेटे मामा" या कथेसाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे असून त्याचे वितरण लवकरच करण्यात येईल. लेखक अजिनाथ सासवडे यांना यापूर्वी देखील अनेक राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांचे सुखाचा शोध नावाचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. ******************************************** 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅन...

कामरगाव शिवारात कारचालकाचे अपहरण, लूट करणारे जेरबंद ! नगर तालुका पोलीसांची धडाकेबाज कारवाई ! .

इमेज
अहिल्यानगर( प्रतिनिधी):- तालुक्यातील गुन्हेगारीला चाप लावण्याकरिता नव्याने रूजू झालेले नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे व त्यांच्या टीमने कारवाईचा धडाका लावल्याचे दिसून येत असून, नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दि.२१/०२/२०२६ रोजी कोथरुळ, ता. माजलगाव जि. बीड येथुन इसम नामे-बालासाहेब काशीनाथ कदम व त्यांचा साथीदार पंकज श्रीराम कदम असे स्वीफ्ट कार नं- MH १२ UM २२४८  या कारने पुणे येथे त्यांचे भावास भेटण्यासाठी जात असताना दि-२२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.३० मि. सुमारास  ते कामरगाव शिवारातील हाँटेल गुरुदत्त हाँटेलचे जवळ गाडी रोडचे बाजूला घेवुन थांबले असता. तेथे चार अनोळखी इसमांनी हातात कोयते घेवून येत फिर्यादी व साक्षीदार यांच्या गळ्याला लावले. व फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांना त्यांचे स्विफ्ट गाडीमध्ये बसवून फिर्यादी व साक्षीदार  यांना नगरकडे नेत असताना स्विफ्ट कार व लक्झरीचा अपघात झाला. सदर आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांचे १८,०००/- रुपये रोख, ५०००० रुपये ऑनलाईन व ४७,००० हजार रुपये किमतीचे मोबाईल, चार्जर, जर्किंग असा एकुण १,१५,००००...

भोयरे पठार जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. कला आणि संस्कृतीचा अविस्मरणीय मिलाफ.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा भोयरेपठार येथे "शाळेला गावाचा आधार , गावाला शाळेचा अभिमान" या ब्रीदवाक्यानुसार शिवजयंतीचे औचित्य साधत वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उदघाटन प्रसंगी कोल्हे साहेब  मार्केट कमिटी, संचालक राजू शेठ आंबेकर, सरपंच बाबाजी टकले, उपसरपंच राजेश बोरकर, उद्योजक किशोर शेठ कदम, मेजर अशोक मुठे, गणेश शेठ मुठे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ कावरे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छावा गीतातील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून उपस्थितांच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत , लोकनृत्य व सामाजिक संदेश देणाऱ्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे युवा नेते प्रतिकदादा शेळके यांनी शाळेला आवश्यक असणारी साऊंड सिस्टीम विद्यार...

शेतकऱ्याच्या शेतातील संत्रा चोरणारा काही तासात गजाआड ! स.पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या टीमची धडक कारवाई.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):- : मिळालेल्या माहितीनुसार दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दशमीगव्हाण तालुका- जिल्हा अहिल्यानगर गावच्या शिवारात शेतकरी पांडुरंग मस्के राहणार उक्कडगाव यांनी त्यांच्या संत्र्यांचे शेतातील संत्रा विक्री करता येण्यासाठी त्यांनी शेतात ११० मोकळे कॅरेट ठेवले होते व ते २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजण्यास सुमारास शेतात संत्र काढण्यासाठी गेले असता तेथे १२ मोकळे कॅरेट शिल्लक होते उर्वरित २८ कॅरेट संत्र्याचे झाडावरील फळे दिसले नाहीत तेव्हा त्यांना शेतात टेम्पोचे टायर मार्क दिसल्याने त्यांना त्यांच्या शेतातील संत्रा कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाली त्या अनुषंगाने त्यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला १२०००० (एक लाख वीस हजार रुपये ) किमतीचा संत्रा व ४९००( चार हजार नऊशे रुपये) किमतीचे कॅरेट चोरून नेल्याची फिरत देण्याकरता हजर झाले सदर अनुषंगाने नगर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 105/ 2026 बी एन एस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस...

*नगर तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ.* *चिचोंडी पाटील व नारायणडोहोत बेदम मारहाण व रक्तरंजित दरोड्याचा थरार.*.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी)– मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात रविवारी (दि.२२) पहाटे दरोडेखोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. चिचोंडी पाटील आणि नारायणडोह या गावांमध्ये दीड ते दोन तासांच्या अंतराने अज्ञात दरोडे खोरांनी कोयते, चाकू, लोखंडी कटावणी च्या सहाय्याने दोन घरांवर दरोडा टाकत घरातील व्यक्तींना बेदम मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने, रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एकाच रात्रीत पडलेल्या या दोन दरोड्यांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरोड्याची पहिली घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या शिवारात नगर- जामखेड रोडवर सालेवडगाव फाटा येथे असलेल्या पवार वस्तीवर घडली. या ठिकाणी असलेल्या सुदाम पवार (वय ७०) आणि त्यांची पत्नी पदम पवार (वय ६०) हे वृद्ध दाम्पत्य रात्री घरात झोपलेले असताना साधारण १२.३० च्या सुमाराल अज्ञात दरोडेखोर तेथे आले. त्यांनी कटावणीच्या साहाय्याने दरवाजा उघडला. घरात उचकापाचक करत असताना सुदाम पवार यांना जाग आली. तेव्हा त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या पत्नी पदद्म पवार यांना ही मारहाण करत दरोडेखोरांनी घरा...

माझी वसुंधरा ४.० व ५.० अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग दोन वर्षे पुरस्कार ; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते ११ कोटींचे पुरस्कार महानगरपालिकेला प्रदान. ; शहरासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे चांगली कामगिरी : आयुक्त यशवंत डांगे .

इमेज
  अहिल्यानगर( प्रतिनिधी):-  - राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये पुरस्कार मिळाला आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला ५ कोटींचे तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच, मागील वर्षी माझी वसुंधरा ४.० अभियानातही राज्यात ६ कोटींचा दुसरा पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही ११ कोटींच्या पुरस्कारांचे वितरण राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव व आयुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई येथील कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. माझी वसुंधरा अभियानात गेली दोन वर्षे महानगरपालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवला. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. म...

खंडणी मागणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड; उद्योजकांकडून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचा सत्कार.

इमेज
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-                मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजकांना खंडणी मागीतल्याची तक्रार उदयोजकांनी थेट पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली होती. पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करत खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उनवणे, राजेश पाटील या संशयित आरोपींची एम आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व त्यांच्या टीमने धिंड काढली.                     याप्रकरणी आमी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा आज (ता. १९) सत्कार करण्यात आला. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरात शांतता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे. यावेळी एमआयडीसीचे प्रभारी अधिकारी माणिक चौधरी उपस्थित होते. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅन...

कामरगाव मधील ज्येष्ठ नागरीक चंद्रकांत साठे यांचे वृद्धापकाळाने निधन. दशक्रिया विधी १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी होणार.

इमेज
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-  कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथील जेष्ठ नागरीक चंद्रकांत कान्हू साठे (वय ७९) यांचे ९ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने दुखः द निधन झाले. गावातील विविध कार्यकारी  सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात त्यांनी सेल्समन म्हणून ४० वर्ष उत्कृष्ट  काम केले. गावातील सामाजिक उपक्रमात त्यांचे विशेष योगदान होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  माजी सैनिक अशोकराव साठे, व्यवसायिक भाऊसाहेब साठे,  उपक्रमशील शिक्षक संतोष साठे यांचे ते वडील होते. गावातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक उपक्रमात त्यांच्या परिवाराचा मोलाचा सहभाग असतो. कामरगाव येथील अमरधाममध्ये दि १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी सकाळी ८ वा त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे. ******************************************** 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा... 👇🏻 https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

डॉ राजु म्हस्के महाराष्ट्र शासन राज्य गो सेवा आयोग पुरस्काराने सन्मानित.

इमेज
        अहिल्यानगर (प्रतिनिधी) :-  दि.14  फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी महाराष्ट्र शासना गो सेवा आयोग पुणे तर्फे सन २०२५-२६ मध्ये आयोजित महाराष्ट्र शुध्द देशी गोवंश सन्मान योजने अंतर्गत ता. जि अहिल्यानगर मधील दहिगाव गावचे प्रगतशील शेतकरी डॉ.राजु मुकुंदराव म्हस्के व प्रमिला प्रकाश म्हस्के  यांनी सादर केलेल्या नामांकनास राज्यस्तरीय पुरस्कार गोवंश-प्रक्षेत्र विभागातून निवडीद्वारे नामदार पंकजा ताई मुंडे (पशु संवर्धन मंत्री) यांच्या हस्ते तसेच राज्यमंत्री  श्री शेखर मुंदडा (अध्यक्ष महाराष्ट्र गो सेवा आयोग)यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला व गो सेवा आयोगाचा श्रेष्ठ राजदुत म्हणून घोषित करण्यात आले. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* नवीन बातम्यांचे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास्त शेअर व SUBSCRIBE करा... 👇🏻 https://youtube.com/@hrsnewsmarathi-oe9rw?si=rvBiz0GPglP7BEAv

कामरगावात प्राध्यापकाच्या घरी घरफोडी. लाखोंचे सोन्याचे दागिने लंपास.

इमेज
  अहिल्यानगर (प्रतिनिधी) :  कामरगाव ता. अहिल्यानगर परिसरात एका बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांचे दागिने चोरून लंपास केल्याची घटना घडली आहे.  सदर चोरीच्या घटनेत खरेदी करतेवेळेची अंदाजे किंमत रु ८६०००/-  परंतु सदयस्थितीतील मार्केट भावाप्रमाणे अंदाजे किंमत ६०००००/ (सहा लाख रुपये) किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे असे मिळालेल्या माहितीनुसार समजते. याबाबत फिर्यादी प्राध्यापक डॉ.अशोक विठ्ठल ठोकळ (वय ४९, रा. मुलानवस्ती, कामरगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की. कामरगाव येथील प्राध्यापक डॉ. अशोक ठोकळ एका नामांकित महाविदयालयात कार्यरत आहेत. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रात सण झाल्यानंतर त्यांच्या पत्नी यांनी दागिने घरातील कपाटाखाली ठेवले होते. परंतु १० फेब्रुवारी रोजी घरात झाडलोट करताना दागिने नसल्याचे आढळले. त्यांनी डॉ.अशोक ठोकळ यांना फोनद्वारे सदर घटना कळवली. त्यानंतर त्यान...

अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा 'स्नेहबंध' तर्फे सत्कार

इमेज
  (अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा शाल व वृक्ष देऊन सत्कार करताना 'स्नेहबंध'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.) अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी महापौर सौ. गाडे यांना शाल व वृक्ष देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर अधिक स्वच्छ, हरित व प्रगत शहर घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाच्या माध्यमातून हा सत्कार अधिक अर्थपूर्ण ठरला. महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकाभिमुख उपक्रम, विकासकामे व सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही डॉ. उद्धव शिंदे यांनी यावेळी सांगितले. ********************************************* 📲 *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:-7057791882* आपल्या न्यूज चॅनलला खालील लिंकद्वारे जास्तीत जास...

फॉलोअर