पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नगर पुणे महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

इमेज
नगर:- तालुक्यातील नगर पुणे महामार्गावर कामरगाव सह पिंपळगाव, भोरवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी विविध प्रश्नांसाठी दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० च्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.             याबाबत सविस्तर माहिती अशी कि नगर तालुक्यातील कामरगाव , पिंपळगाव कौडा, भोरवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे विविध प्रश्नांचा पाठपुरावा करून देखील कारवाई होत नसल्याच्या निषेर्धात व शेतकऱ्यांना येणाऱ्या  विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन कारवाई करण्यासाठी नगर पुणे महामार्गावर आंदोलन केले. सदर आंदोलनाची पूर्वसूचना देखील प्रशासनाला देण्यात आली होती. असे समजते.            कामरगाव, पिंपळगाव कौडा, भोरवाडी येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पंचनामे प्रशासनाने केले परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदयापर्यंत भेटली नाही. त्याकरिता महसूल विभाग टोल टोलवीची भूमिका न करता शेतकऱ्यांना सहकार्य करावे व मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून मांडण्यात आली. तसेच वीज प्रश्नी वारंवार खंडीत होण...

दहिगाव श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

इमेज
श्रीराम उत्सव निमित्ताने नगर तालुकाचे नव्याने नेमणूक झालेले पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख व स्टाफचा  श्रीराम मंदिर देवस्थान दहिगाव वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. न गर प्रतिनिधी:-             नगर तालुक्यातील दहिगाव येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला श्री राम मंदिर देवस्थान या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या यात्रा उत्सव सप्ताह काळात  ह.भ.प गणेश महाराज घोडके ,ह.भ.प अशोक महाराज ईलग शास्त्री,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कराळे,ह.भ.रामदास महाराज रक्ताटे,ह.भ.प‌‌ बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक,ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, ह.भ.प राम महाराज डोंगरे, गोविंद महाराज शिंदे कैलासजी महाराज येवले या प्रमाणे सप्ताह भाव भक्तीने किर्तीन रुपी सेवा दिली.तसेच शुक्रवारी दि.३१ रोजी सकाळी ९ते ११ काल्याचे किर्तीन  ह.भ.प. रघुनाथ महाराज (धामणगाव) यांचें होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२२ मार्च ३१ मार्च  या कालावधीत सप्ताह संपन्न होत असतो. वीणा सेवा,किर्तीन सेवेनंतर महाप्रसा...

शहाजापूरच्या कौड्या डोंगरावर होळकर घराण्याच्या कुलदेवतेचा शोध. इतिहास अभ्यासक सतिष सोनवणेंचे ऐतिहासिक संशोधन.

इमेज
पारनेर:-  तालुक्यातील शहाजापूर ता.पारनेर येथील कौड्या डोंगरावरील राणूबाई देवी होळकर घराण्याची कुल देवता असल्याचे पुरावे इतिहास अभ्यासक सतिष सोनवणे यांनी शोधून काढले आहेत. या ऐतिहासिक व दुर्मिळ संशोधनामुळे भविष्यात इतिहातील अनेक गोष्टींना उजाळा मिळणार आहे . मराठा सरदार महापराक्रमी मल्हारराव होळकरांनी स्थापन केलेल्या होळकर घराण्याच्या अज्ञात कुल देवतेचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक श्री सतीश सोनवणे यांनी लावला आहे. काही दिवसापूर्वी पारनेर तालुक्यातील शहाजापुर गावा जवळील कौडेश्र्वराच्या डोंगरावर गड भ्रमंती चे द्विशतक साजरे करणारे पत्रकार श्री. सुरेंद्र शिंदे सर आणि श्री सतीश सोनवणे यांनी  कौडेश्र्वराला भेट दिली. कौडेश्वराच्या डोंगरावर वालूंबा नदीचे उगम स्थान आहे. त्याजवळ रानुआई चे मंदीर आहे. ही राणू आई म्हणजेच होळकर वंशावळी मध्ये उल्लेख असलेली राजो बाई होय.  इतिहासाचार्य राजवाडे यांनी महेश्वर संस्थांनच्या कागदपत्रा मध्ये होळकर घराण्याच्या दोन वंशावळीचा शोध लावलेला आहे.  त्यातील पहिली जुनी अस्सल वंशावळ अशी -श्री कुलस्वामी देव खंडेराव व महाळसाबाई व बानाबाई, गड जेजुरी, जानोबा...

सुसाट वाहने चालवणाऱ्यांना नगर तालुका पोलीसांचा ब्रेक !

इमेज
नगर -  तालुका पोलीसांनी वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने तसेच नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या ८ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेले आदेशाप्रमाणे नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांनी नगर तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये हाय स्पीडने व भरधाव वेगात वाहने चालवून अपघातात व व्यक्तीगत सुरक्षा तसेच रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या ६ वाहन चालकांवर नगर तालुका पोलिसांच्या विविध पथकांनी सोमवारी व मंगळवारी,आज रोजी २९/३/२०२३ बुधवारी धडक कारवाई करत गुन्हे दाखल करून वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी उपयोजना सुरू केल्या आहेतयाबाबत नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांनी नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाणाऱ्या महामार्गांवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध पथके स्थापन करुन बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगर-कल्याण रोडवर हॉटेल सुडके पाटील समोर भरधाव वेगात टाटा मॅजिक वाहन च...

सुपा MIDC मधील कंपनीत अपघात होऊन कामगार ठार.

इमेज
  पारनेर प्रतिनिधी:-           पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी मधील एका कंपनीत अपघात  होऊन कंपनीतील कामगार ठार  झाल्याची घटना मंगळवारी (दि.28) सकाळी घडली आहे. कंपनीमधे झालेल्या अपघातामधे भरत कचरु काळे ( वय 30, रा.अस्तगाव, ता.पारनेर) असे  मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. समजलेल्या माहिती नुसार मंगळवारी सकाळी 10.25 वाजेच्या दरम्यान सुपा एमआयडीसी मधील बाँक्सव्हीया या कंपनी मधे भरत काळे हा तरुण मशिनवर काम करत असताना अचानक तो मशिनमधे अडकला. यावेळी कंपनीतील इतर कामगारांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. परंतु मशिन बंद करेपर्यंत भरत काळे हा गंभीर जखमी झाला होता. इतर कामगारांनी जखमी भरत यास सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यावर उपचार होण्यपुर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी तपासणी नंतर घोषीत केले.          सदर घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनच्या पीआय गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस घटना स्थळी तसेच  रुग्णालयात जाऊन सदर घटनेची माहिती घेतली. सुपा पोलिसांनी फिर्यादीच्या माहिती वरुन आकस...

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असा करा !

इमेज
                सध्याच्या काळात अनेक क्षेत्रात म्हणजे शाळेपासून ते बँकेपर्यंत अनेक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. त्यामुळे आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे देखील गरजेचे आहे. तुम्ही ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने मोबाइल नंबर लिंक करू शकता.तेही अगदी सहज लिंक करू शकता आधार-मोबाइल नंबर. जवळच्या आधार केंद्रावर जाऊन त्वरित रजिस्टर करू शकता नंबर.आधार-मोबाइल नंबरला ऑनलाइन देखील लिंक करणे शक्य आहे.सरकारने आधार कार्डला अन्य कागदपत्रं आणि बँक अकाउंटशी जोडणे अनिवार्य केले आहे. आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे देखील गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसल्यास तुम्ही अर्ज करताना मोबाइल नंबर रजिस्टर करू शकता. मोबाइल नंबर लिंक असल्यास आधार कार्डवर डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करणे खूपच सोपे आहे.मोबाइल नंबर लिंक असल्याने अनेक कामे ऑनलाइन करणे शक्य होतात. अनेक शासकिय योजनांचा लाभ घेणे देखील सुलभ होते. जर तुमचा नंबर रजिस्टर नसेल, अथवा बदलला असल्यास तुम्ही सहज नंबर लिंक करू शकता. ऑनलाइन नंबर लिंक करण्यासाठी सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल बंद केले आहे. मात्र, तुम्...

बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर चालकावर एमआयडीसी पोलीसांची कारवाई; पोलीसांशी हातापायी करणाऱ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दाखवला पोलीसी खाक्या..!

इमेज
अहमदनगर प्रतिनिधी:-           सविस्तर वृत्त असे की कोतवाली पोलिसांच्या हद्दीमध्ये पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. चितळे रोड रस्त्यावर डंपर चालक गणेश नागरे यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केले होते व डंपर मालकाने व चालकाने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करून हातापायी केली होती आज रोजी तोच डंपर चालक एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी गौण खनिजाची चोरून वाहतूक  करत     लष्कराच्या के. के. रेंज हद्दी मधून गौण खनिज चोरी करून त्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्याला ढंपर व गौण खनिजासह ८ लाख १० हजार किमतींचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. सविस्तर हकीगत  अशी की शुक्रवारी (दि.२४) पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास नगर एमआयडीसी पोलिस  ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे पोलीस पथकासह नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन करत 'असताना या दरम्यान निंबळक चौक ते सनफर्मा जाणारे डांबरी रस्त्यावर सावली हॉटेलपुढे गणेश शेषराव नागरे (रा. गाडगीळ पटांगण, नालेगांव) त्याच्या ताब्यातील लाल रंगाचा ढंपर (क्...

शिर्डी संस्थांनमध्ये शेतकऱ्यांमार्फत फुलविक्रीचा लवकरच निर्णय -ना.विखे नांदुर्खी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण!

इमेज
शिर्डी, प्रतिनिधी              शिर्डी येथील फुलविक्री बाबत जिल्हाधिकारी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून पुढील दहा दिवसांत संस्थांनमध्ये फुलविक्री सुरू करण्यात येईल. यात फक्त आजूबाजूच्या परिसरातील सातबाराधारक शेतकऱ्यांना फुल विक्रीला परवानगी देण्यात येईल.‌ अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते . यावेळी‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते.संस्थान दर्शनरांगेत अधिकृतरित्या फुलविक्री सुरू करण्यात येईल. असे स्पष्ट करत पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, शिर्डी येथे श्री‌.साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करावी.शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅंडीग सेवा सुरू होणार आहे‌‌. ५०० कोटींच्या नवीन टर्मिनला...

नगरच्या खासदारांचा मुंबईत "दे धक्का"..! खा.सुजय विखेंचा साधेपणा व माणुसकीचे दर्शन.

इमेज
  नगर:- खासदार म्हणजे  सुटाबुटात राहणारा, कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात वावरणारा  व्यक्ती असच काहीस, साधारण चित्र सर्व सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर येते. परंतु काल, परवा एका खासदारांचा सामान्य माणसाच्या बंद पडलेल्या गाडीला रस्त्यावर धक्का मारताना चा फोटो व्हायरल झाला. आणि त्यानंतर त्या फोटोच निरीक्षण केले असता. अस लक्षात आल कि, बंद पडलेल्या गाडीला ज्या तीन व्यक्ती धक्का मारत आहेत. त्यातील एक नगर दक्षिण चे लोकसभा सदस्य डॉ. सुजय विखे पाटील आहेत. या प्रसंगातून नगरच्या खासदारांचा  साधेपणा पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रान अनुभवला.        या बाबत समजलेली माहिती अशी कि, खा. सुजय विखे हे  मुंबई मधे अंधेरी  येथे रस्त्याने  प्रवासात असताना एका ज्येष्ठ नागरीक दाम्पत्याची  गाडी बंद पडलेली दिसली.  रात्रीची वेळ असल्याने मदतीला कोणी नव्हते. हे पाहून खा. सुजय विखेंनी स्वतः आपल्या सोबत असणाऱ्या मोजक्या सहकाऱ्यांसोबत कारला धक्का मारला.  व त्या दाम्पत्याला मदत केली. Ketan Bhoi on Monday आज ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात अस...

शिर्डी येथे महापशुधन एक्स्पो २४ ते २६ मार्च दरम्यान. राज्यासह देशातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक प्रदर्शन ठरणार:- सौ. शालिनीताई विखे पाटील.

इमेज
  शिर्डी (अहमनगर) प्रतिनिधी:-        महा पशुधन एक्‍सपो हे देशपातळीवरील प्रदर्शन युवा शेतक-यांबरोबरच महिलांना सुध्‍दा मार्गदर्शक आणि नवी प्रेरणा देणारे ठरणार आहे. पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून आयोजित करण्‍यात आलेल्‍या या प्रदर्शनाच्‍या यशस्‍वीतेसाठी शिर्डी मतदार संघातील सर्व नागरीकांनी आणि कार्यकर्त्‍यांनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.        शिर्डी येथील शेती महामंडळाच्‍या भव्‍य अशा प्रांगणात दिनांक २४ ते २६  मार्च या दरम्‍याने पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने देशपातळीवरील महा पशुधन एक्‍सपोचे आयोजन करण्‍यात आले आहे. या प्रदर्शनाकरीता शेती महामंडळाच्‍या जमीनीवर भव्‍य असे मंडप उभारणीचे काम सुरु करण्‍यात आले आहे. या मंडप उभारणीच्‍या कामाचा भुमिपुजन समारंभ आज महिलांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला.        जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, महान...

पिक विमा शेतकऱ्यांना या तारखेला फिक्स मिळणार !

इमेज
                 पिक विमा कधी मिळणार ? या प्रतिक्षेत महाराष्ट्रातील शेतकरी अनेक दिवसांपासून आहे. परंतु आता कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स केली आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊ. पिक विम्याची घोषणा झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा   मिळालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना २०२२ मध्ये झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळालेली नाही त्यांना ३१ मे पर्यंत मिळणार पिक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी विधानपरिषदेत दिली असल्याचे समजते. २०२२ च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप योजने अंतर्गत विविध पिक विमा कंपन्यांकडून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पिक विमा जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले आहेत.महाराष्ट्रात प्रधान मंत्री पिक विमा योजना अंतर्गत खालील पिक विमा कंपन्या अधिकृत करण्यात आलेल्या आहेत. 1) भारतीय कृषि विमा कंपनी, 2)एचडीएफसी अर्गो. 3)आयसीआयसीआय लोंबार्ड.4)युनायटेड इंडिया कंपनी. 5)बजाज अलिया...

ST प्रवासात महिलांना मिळणार 50% सूट , पण नियम अटी काय? आधी जाणून घ्या.

इमेज
        महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात ५०% सूट देण्यात येणार  अशी घोषणा केली होती.  अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अधिवेशनात मोठी घोषणा केल्यानंतर. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. पण ही सवलत काय आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊया.         मुंबई : अधिवेशनात महिलांसाठी मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची वाट सगळ्या महिला पाहत होत्या, काही ठिकाणी तर घोषणेच्या दुसऱ्याच दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी भांडू लागल्या. असे व्हिडिओ सोशल मिडीयावर आले होते....आणि अखेर 17 मार्चपासून सवलत देण्याचा सरकारकडून जी आर काढण्यात आला. आता महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत मिळाली, मात्र प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना सेम असणार? सवलत असलेली बस ओळखायची कशी? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बस? या सगळया प्रश्नांची सविस्तर जाणून घेणेदेखील आवश्यक आहे.           राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात आली आहे या योजनेला महिला सन्मान योजन...

सुप्याच्या महिला सरपंच शाळा सुरू करण्यासाठी सरसावल्या ! पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने घेतला कौतुकास्पद निर्णय.

इमेज
सुपा :   पारनेर तालुक्यातील सुपा येथील शाळा शिक्षक संपावर गेल्यामुळे बंद आहेत. त्यामुळे विदयार्थ्याचे शैक्षणिक  नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सुप्याच्या महिला सरपंच  मनिषाताई योगेश रोकडे यांनी पुढाकार घेत शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत मिटींग  घेऊन गावातील डी.एड. बी.एड. तसेच अनुभवी शिक्षकांना सोबत घेत शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.           राज्यभर शासकीय कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक देखील बेमुदत संपावर गेले आहेत. परंतु त्यामुळे राज्यभर शाळा बंद आहेत. पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे. सुपा येथील शाळा देखील याला अपवाद नाही. परंतु संपामुळे  गावातील विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. म्हणून सुप्याच्या महिला सरपंच मनिषाताई योगेश रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी मा. उपसरपंच दत्ता शेठ पवार, उपसरपंच विजय पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, पवारवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचि...

अवकाळी पाऊस व कर्मचारी संपाने शेतकरी हवालदिल ! शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार ?

इमेज
 नगर:- जिल्हयातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेती पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. पिक नुकसानीचे दुःख गिळायच्या आधी, नुकसान भरपाई तर सोडाच पण पिकांचे पंचनामे कोण करणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर  आहे.          याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असल्याने त्यामुळे मोठया प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु राज्यातील शासकिय कर्मचारी संपावर असल्याने तलाठी, मंडलाधिकारी  कुणीही उपलब्ध नसल्याने शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार ? हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.        नगर जिल्हयातील ग्रामिण भागातील शेती पिकांना अवकाळी पावसाचा फटका मोठया प्रमाणात बसला आहे. रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे  पावसाने झोपली आहेत. गहू , हरभरा, कांदा, फुले या पिकांसोबत संत्री, मोसंबी. लिंबू.फळबागा इ.पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडलेले आहेत. तलाठी, मंडलाधिकारी संपावर असल्याकारणाने नु...

शिक्षक संपावर तरी हिवरे बाजारची शाळा सुरु; पद्मश्री पोपटराव पवार व ग्रामस्थांचा नवा आदर्श.

इमेज
नगर:- तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार पुन्हा एकदा एका नव्या व आदर्श निर्णयामुळे चर्चेत आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदर्शगाव हिवरेबाजार या गावाने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनामधून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्राला नव्हे देशाला दाखवून देत अनेक आदर्श व स्तुत्य उपक्रम राबवून यशस्वी केले आहेत. त्यामुळे आदर्शगाव हिवरे बाजारची किर्ती महाराष्ट्रासोबत देश विदेशातही पसरली आहे. आदर्शगाव हिवरे बाजार हे पुन्हा एकदा आपल्या गावातील आदर्श उपक्रमामुळे चर्चेत आले आहे. सध्या महाराष्ट्रभर सुरु असलेल्या कर्मचारी संपामुळे शिक्षक संपावर गेले आहेत. हिवरे बाजार येथील शाळा देखील त्याला अपवाद नाही. परंतु शिक्षक संपावर गेले. त्यामुळे गावातील विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पद्मश्री पोपटराव पवार व हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी शाळा बंद न ठेवता सुरू ठेऊन विदयार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत. हिवरे बाजारच्या जडणघडणी मधे गावातील शिक्षकांचा, त्यातही मराठी शाळेतील शिक्षकांचा मोठा सहभाग आहे. गावातील शिक्षक इतर अनेक बाबींमधे अपवाद ठरलेले आहेत. परंतु आता सुरु असलेल्या...

फॉलोअर