पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कामरगाव जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम. ;आधुनिक शिक्षणासोबत विदयार्थ्यांना पारंपारिक कलेची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न !

इमेज
  नगर( हेमंत साठे):- तालुक्यातील नगर- पुणे महामार्गालगत  असणाऱ्या कामरगाव येथील जिल्हा परीषद शाळेतील शिक्षिका नंदा पठारे-देवकर व शिक्षिका लक्ष्मी गायकवाड यांच्या संकल्पनेतून विदयार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शिक्षणासोबत आपल्या पारंपारीक कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून अभिनव उपक्रम राबविण्यात आला.           याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परीषद शाळा या आता आधुनिक शिक्षणाची कास पकडत आहेत. काही गावांमधून डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधे आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आधुनिकते सोबत आपली संस्कृती, पारंपारीक कला विदयार्थ्याना माहित व्हावी. त्यांच्या मधील कलागुणांचा विकास व्हावा. या उद्देशाने कामरगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका नंदा पठारे-देवकर व शिक्षिका लक्ष्मी गायकवाड यांनी विद्यार्थ्याना सोबत घेऊन गावातीलच कुंभार काका मोहन बाबा गोरे  यांच्या घरी सुरू असलेल्या मातीच्या वस्तु बनविण्याच्या छोट्याश्या कारखान्यावर भेट दिली.  यावेळी मोहन गोरे यांनी देखील मोठया आनंदाने चिमुकल्यांचे स्वागत केले. व येणाऱ्या पोळा सणासाठी सुरू असलेल्या मातीच्

कामरगाव शिवारात अवैध बायो-डिझेल विक्रीचे रॅकेट उघडकीस !

इमेज
नगर ( प्रतिनिधी):- तालुक्यातील नगर पुणे महामार्गालगत पून्हा अवैधरित्या बायोडिझेलची अवैध विक्री होत असल्याचा स्कॅम नाशिक परिक्षेत्राचे विशेष  पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने उघडकीस आणला आहे.  समजलेल्या माहितीनुसार  नाशिक परिक्षेत्राचे विशेष  पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने  नगर - पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात कारवाई करत बायोडिझेल विक्री साहित्य व वाहने असा सुमारे २९ लाख ३४ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४ लाख ७५ हजार ४१० रुपये किंमतीचे  ६ हजार ९५ लीटर बायोडिझेल  जप्त करण्यात आले आहे.          या कारवाईमधे  पाच जणांविरुद्ध नगर पोलीस तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ मुरलीधर बळी (वय ४७ रा. भाजी मार्केटच्या पाठीमागे सारस नगर ), कृष्णा ताराचंद राऊत (वय२५. रा. झोपडी कॅन्टीनशेजारी सावेडी ), खंडू काकासाहेब गोरडे (वय 23. रा. बालम टाकळी ता. शेवगाव देविदास जाधव व भरत कांडेकर (दोन्ही रा. नगर पूर्ण नावे माहित नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील जाधव व कांडेकर पसार झाले आहेत असे समजते.        

नेप्तीला होणाऱ्या दुसरे काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माधवराव लामखडे यांची नियुक्ती.

इमेज
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उद्योजक माधवराव लामखडे यांची नियुक्ती करण्यात आली.  काव्य संमेलनाचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी लामखडे यांच्या स्वागताध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर करुन त्यांचा सत्कार केला. नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन शिक्षक दिनानिमित्त दि.3 सप्टेंबर रोजी नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये रंगणार आहे. सातत्याने कला, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील कार्यक्रमास नेहमीच लामखडे यांचे सहकार्य लाभत आहे. या काव्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवींना प्रोत्साहन मिळणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुरस्कार दिला जाणार आहे. तर कवींचा देखील सन्मान होणार आहे. काव्य संमेलनाच्या स्

रुईछत्तीसी ग्रामपंचायतकडे सार्वजनिक मुतारी नसल्याने नागरीकांची गैरसोय !

इमेज
नगर (शिवा म्हस्के) : सार्वजनिक शौचालय हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक घटक आहे. केंद्र व राज्य सरकार १४वा वित्त आयोग व १५ वित्त आयोग निधी प्रत्यक्ष ग्रामपंचायत खात्यात वर्ग करत आहे. कारण त्या गावातील समस्या मुलभूत सुविधा  सोडविण्यासाठी हा निधी प्रामुख्याने दिला जातो.शासन सार्वजानिक स्वच्छता गृह संकुलासाठी २ लाखा रूपये निधी दिला जातो.नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रुईछत्तीसी गाव एक मोठ्या नावारूपाला आलेली बाजार पेठ झाली आहे. या ठिकाणी लाखो रुपये उलाढाल होत आहे. या बाजार पेठेत विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण झाले बेरोजगार तरुणांना व्यवसाय संधी उपलब्ध झाली.         परंतु त्या प्रमाणेच या ठिकाणी खरेदीदार ग्राहकांना येणाऱ्या नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी रुईछत्तीसी ग्रामपंचायत कुठे तरी कमी पडलेली दिसत आहे. या ठिकाणी दर रविवारी भाजीपाला आठवडे बाजार भरतो  या ठिकाणी हजारो संख्येत ग्राहक खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात पण या ठिकाणी महिला पुरुष वर्गासाठी  पिण्याचे पाणी, कुठे सांधे सार्वजनिक स्वच्छतागृह अथवा मुतारी उपलब्ध नाही.कचरा साम्राज्य , गटार व्यवस्थापन नाही. अश

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण !

इमेज
  नगर(प्रतिनिधी) :- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने ढोकेश्वर महाविद्यालयात वृक्षारोपण नियोजन सभा श्री ढोकेश्वर महाविद्यालयात संपन्न झाली.. कोणताही शासकीय निधी नसताना पर्यावरण मंडळ गेले तीस चाळीस वर्ष कार्य करते..असे प्रमोददादा मोरे म्हणाले..या सभेला आम्ही टाकळीकर ग्रुपचे डाॅक्टर भाऊसाहेब खिलारी ,पत्रकार चांद शेख,विद्यालयाचे प्राचार्य डॉ मतकर ,सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते..यावेळी प्रमुख पाहुणे सुनिल कटारिया, डाॅक्टर भाऊसाहेब खिलारी,चांद शेख, वनविभागाच्या वनाधिकारी व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी ध्येय धोरणे इ सविस्तर चर्चा केली.. प्राचार्य डॉ मतकर सरांनी सुत्र संचालन केले.श्री.प्राध्यापक यांनी आभार मानले..या वेळी मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, उपाध्यक्ष श्री प्रकाश केदारी सर, भानुदास शिंदे सर,विजय पवार सर,अक्षय खिलारी सर,आनंदा झरेकर सर,प्रमोद झावरे सर,सर्व प्राध्यापक व विभाग प्रमुख,वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस

काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची नियुक्ती.

इमेज
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची निवड करण्यात आली.  डॉ. चव्हाण यांची काव्य संमेलनाध्यक्षपदी नियुक्ती करुन काव्य संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा कवी सुभाष सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुरेश खामकर, जमीर पठाण आदी उपस्थित होते. नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये शिक्षक दिनानिमित्त दि.3 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या काव्य संमेलनाध्यक्षपदी नियुक्ती झालेले डॉ. चव्हाण हे पाथर्डी तालुक्यातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेचे माजी अध्यक्ष पद त्यांनी भूषवले असून, प्रिये काव्य संग्रह व कोंडमारा काव्य संग्रह प्रकाशित झाले आहे. दमन कोंडमारा याची हिंदी आवृत्ती देखील प्रकाशित झाली आहे. मशाल एकांकिका

वाळकी गावात पत्रकारांच्या हस्ते ध्वजारोहण !

इमेज
          नगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाळकी गावातील न्यु इंग्लिश स्कूल व कला विज्ञान महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला . वाळकी येथील महाविद्यालयात प्रथमच पत्रकारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .            महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन , प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रात नावलौकिक असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावण्याची परंपरा जतन केली आहे . स्वातंत्र्य दिनी  दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानदेव गोरे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी पत्रकारांना ध्वजारोहण करण्याचा मान प्रथमच देण्यात आला आहे.             या कार्यक्रमा प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य बाळासाहेब बोठे ,  स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रताप बोठे , सेवानिवृत्त जिल्हाधिकारी तुकाराम कासार , प्राचार्य बाळासाहेब साळुंके , जॉनडियर कंपनीचे मॅनेजर महेश साठे , जेष्ठ शिक्षक एकनाथ कासार , सुनिल कोठुळे , प्रा . अरुण कदम आदींसह विद्यार्थी ,शिक्षकवर्ग , माजी शिक्षक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .          वाळकीतील सेवा संस्था , ग्रामपंचायत , पाथमिक शाळा , पोलीस दुरक्षेत्

स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा दहिगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

इमेज
  नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के):- नगर तालुक्यातील दहिगाव येथे ७७ वा स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजिन  मेरी मिट्टी मेरा देश, भारत मातेचे शुर वीरांना देशाची रक्षा करतांना शहिद विर जवानांच्या स्मरणार्थ राहण्यासाठी शिला अनावरण माजी सैनिक महादेव म्हस्के यांच्या हस्ते अकरण्यात आले, त्यानंतर वसुधा वंदन अंतर्गत गावातील विविध ठिकाणांची एक मुठ माती गोळा करुन कलश दिल्ली येथे दि.२७,२८ ऑगस्टच्या होणार्या समारंभास पाठविण्यात आली आहे.तसेच दहिगावची शाळा  जिल्हास्तरीय शाळेच्या टाॅप दहा मध्ये गणली जाणारी शाळा ठरली आहे. या शाळेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या शाळेने मोहित केले यात तत्कालीन सीईओ शैलेश नवल, माने,भोर, अशा अनेक वेळोवेळी रुजू झाले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी दहिगाव शाळेला भेटी देऊन विद्यार्थीचे शैक्षणिक गुणवत्ता, शाळेच्या प्रांगणातील उभारलेली निसर्ग सौंदर्य गोष्टीचे भरभरून कौतुक केले. १५ ऑगस्ट  ग्रामपंचायत कार्यालयाचे  ध्वजारोहण उपसरपंच मनिषा म्हस्के, श्री राम विद्यालयाचे ध्वजारोहण माजी सैनिक महादेव म्हस्के, सहकारी बँकेचे ध्वजारोहण गावातील जेष्ठ ना

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध -- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.; स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न!

इमेज
अहमदनगर(प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकास करणे हाच आपला ध्यास आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण असा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास मूर्त स्वरुप देऊन जिल्ह्याचा औद्योगिक, पर्यटन विकास , नवीन रोजगाराच्या संधी निर्माणाबरोबरच विशेष उपक्रम राबवुन सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत या विकासासाठी जिल्हावासियांनी सर्वोतोपरी योगदान देण्याचे आवाहन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.       भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.      यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.       पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आजचा स्वातंत्र्य दिन ऐतिहासिक अश

सुपा गावाची पाण्याची तहान भागवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांचे पालकमंत्र्यांना साकडे !

इमेज
पारनेर ( हेमंत साठे):- सुपा गावानजीक असणारी सुपा औदयोगिक वसाहत , तसेच जापनीज पार्क मुळे येणाऱ्या नवनवीन उदयोग धंदयांसोबतच त्यासाठी लागणाऱ्या कामगार वर्गामुळे सुपा गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु त्यासाठी लागणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे सुपा गावच्या सरपंच मनिषाताई रोकडे यांचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी सुपा गावाची पाण्याची तहान भागवण्यासाठी थेट नगर  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना साकडे घातले.           मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना, पारनेर तहसिल कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी सुपा गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती केली की, सुपा गावाला MGP अंर्तगत विसापूर तलावातून पाणी योजनेसाठी अंदाजे साडे चौदा कोटी मंजूर झाले. परंतु योजनेचे काम पूर्ण न झाल्याने सुप्याला पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यानंतर नगर जिल्हयाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून व प्रशासनाच्या माध्यमातू

वृक्षांमुळे मानवी जीवन प्रभावित : पोलीस अधीक्षक राकेश ओला. ;पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात स्नेहबंधतर्फे वृक्षारोपण !

इमेज
नगर- ( हेमंत साठे) - “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” म्हणजे झाड आपले मित्र. हो खरच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, राखीव दलाचे पोलीस निरीक्षक अनुजकुमार मडामे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पो.हे.कॉ. अन्वर अली सय्यद, हेमंत ढाकेफळकर उपस्थित होते. स्नेहबंध फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी विविध शासकीय कार्यालये, शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला. वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचे आवाहन... वृक्ष संवर्धन ही काळाची

सुपा गावचे सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी पालकमंत्र्यासमोर मांडली नागरीकांच्या रेशन कार्ड समस्येची कैफियत !

इमेज
पारनेर ( हेमंत साठे) :- सुपा गावचे सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे यांनी काल दि 8 ऑगष्ट रोजी  शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत नगरचे पालकमंत्री पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पारनेर तहसिल कार्यालया मधे झालेल्या मिटींग मधे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर सुपा गावच्या ग्रामस्थांच्या रेशन कार्ड बददल समस्याची मोठ्या तळमळीने कैफियत मांडली.         याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तहसिल कार्यालय येथे शासन आपल्या दारी अंतर्गत पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी  नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जि .प अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर , पारनेर तालुक्याचे प्रांत, पारनेर तालुक्याच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्यासमोर सुपा गावातील 155 कुटुंबाचा रेशन कार्डचा 16-17 महिन्याचा रखडलेल्या प्रश्ना बद्दल तळमळीने कैफियत मांडली. यावेळी योगेश रोकडे यांनी टॅक्स भरणारे अपात्र रेशन कार्ड धारकांची नावे कमी करुन गरीब ज्यांना खरच गरज आहे. अशा खरोखर पात्र असणाऱ्या गरीब

चास गावात सैनिकहो तुमच्यासाठी" कार्यक्रम उत्साहात संपन्न. ; सैनिकांप्रती आदरभाव त्यांच्या कर्तव्याची भावना प्रत्येकाने जपण्याची गरज - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ.

इमेज
  अहमदनगर (हेमंत साठे):- देश रक्षणार्थ सैनिकांचा त्याग, बलिदानामुळेच आपला देश सुरक्षित आहे. देशाच्या सुरक्षिततेमुळे आपण सर्व सुरक्षित आहोत. सैनिकांप्रती आदरभाव त्यांच्या कर्तव्याची भावना प्रत्येकाने जपण्याची गरज आहे. जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्या, प्रश्नांचे संकलन करून येत्या पंधरा दिवसात त्यांचा निपटारा करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. अहमदनगर तालुक्यातील चास या गावी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताहानिमित्त "सैनिकहो तुमच्यासाठी" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते. व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त राणी ताठे, उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील, नाशिकचे उपजिल्हाधिकारी विठ्ठलराव सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, अहमदनगरचे तहसीलदार संजय शिंदे, पारनेरच्या तहसीलदार गायत्री सैंदाने आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, संरक्षण क्

नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा रात्री फोन खणाणतो अन् त्या आजीला तात्काळ मदत मिळते !

इमेज
नगर ( हेमंत साठे):- नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे व कार्यतत्परतेमुळे नगर शहरातील  93 वर्षीय गरजू एकल महिलेला शासनाच्या योजनेचा तात्काळ लाभ मिळाला आहे.           समाजात अनेक गरजू व्यक्ती, एकल महिला, विधवा, अपंग, निराधार आहेत. या सर्वांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुकर होईल त्याचवेळी महसूल सप्ताह खऱ्या अर्थाने साजरा होईल, असे मत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर शहरातील एकल महिलेला मदत मिळवून देताना व्यक्त केले.   दि. २ ऑगस्ट,२०२३, वेळ रात्री ११-०० वाजताची. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा मोबाईल खणाणतो आणि सावेडी परिसरातील आनंदनगर भागात ९३ वर्षाच्या छबुबाई चित्रा कदम या एकल महिला राहत असून त्यांना प्रशासनाकडून मदतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी वेळ न पाहता अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पगारे व  संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विशाल नाईकवाडी यांना फोन करून महिलेला तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेची अंमलबजावणी करत एकल महिलेशी दोनही अधिकाऱ्यांनी संपर्क साधून

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या इसमास मुद्देमालासह अटक ! नगर तालुका पोलीस स्टेशनची कारवाई !

इमेज
  नगर ( प्रतिनिधी):- मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या इसमास,  टॉवर बॅटरीच्या एकुण 1095000/- रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेत नगर तालुका पोलीसांनी कारवाई केली आहे !  नमुद बातमीतील हकीकत अशी की, दिनांक 24/7/2023 रोजी फिर्यादी नामे प्रदिप दत्तात्रय गारुडकर रा. केडगाव, अहमदनगर यांनी फिर्याद दिली की,  मी आज रोजी चिचोंडी पाटील शिवारातील सर्व जिओ कंपनीचे टॉवर चालू आहेत का हे पाहण्यासाठी गेलो असता त्याठिकाणी एक टॉवर बंद असलेचे मला आढळून आले. मी आमच्या टॉवर कंपनीची केबीन पाहण्यासाठी गेलो ,असता त्याठिकाणी केबीनचे कुलूप तुटलेले दिसले मी केबीनच्या आतमध्ये जावून पाहाणी केली असता मला केबीनमध्ये असलेल्या कॉस लाईट कंपनीच्या एकुण 3 बॅटऱ्या दिसून आल्या नाहीत म्हणून मी आजूबाजूला शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत त्यानंतर  मी कामरगाव हद्दीतील टॉवरची देखरेख करणारे अनिल कदम यांना फोन केला व सदर घटणेची हकीकत सांगितली त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की, आमच्या हद्दीतील टॉवर क्र 1 MH-AMDGENB-6027 या टॉवरच्या व्हीजन कंपनीच्या 5 बॉटऱ्या चोरील गेलेल्या आहेत. त्यावेळेस माझी खात्री झाली की, कोणी

शिर्डीतील पिंपळगाव रोड येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बंगल्यावर छापा ! Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची धडक कारवाई !

इमेज
(नगर प्रतिनिधी):-  दि.  02/08/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी  रोड येथील बंगल्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन 1 पिडीत मुलीची सुटका करण्यात आली आहे आणि  दौलत किसन लटके , अकुश संजय घोडके या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .   या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे  साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी DySP संदीप मिटके  यांचे  कौतुक केले.         सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर Ad sp यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI गुलाबराव पाटील, HC इरफान शेख,PN कुऱ्हे,PN शिंदे, PN जाधव ,LPN भांगरे , PC गांगुर्डे यांनी केली.

पारनेर तालुक्यातील या दूध भेसळ केंद्रावर अन्न आौषध प्रशासनाचा छापा; २२०० लीटर दूध जप्त.

इमेज
नगर ( प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील  दूध भेसळ करणाऱ्यांविराेधात प्रशासनाने कारवाई केली आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील अधिकृत दूध संकलनाचा परवाना नसलेल्या जय हनुमान दूध संकलन केंद्रावर अन्न -औषध प्रशासनाने छापा टाकून गुणवत्ता तसेच भेसळीच्या संशयावरून सदर दूध संकलन केंद्रातून २२०० लीटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट केले.          नगर जिल्हा प्रशासनाने दुधात हाेणाऱ्या भेसळीला लगाम लावण्यासाठी नुकतीच जिल्हास्तरावर समिती स्थापन केली असून. भेसळयुक्त दुधाबाबत तपासणी मोहीम, यात सहभागी असणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करणे, भेसळयुक्त दूध किंवा पदार्थ स्वीकारणाऱ्यांनाही या प्रकरणात सह आरोपी करावे, असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी दिले हाेते. त्यानुसार अन्न-औषध प्रशासनाच्या पथकाने नुकतेच पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील परवाना नसलेल्या जय हनुमान दूध संकलन केंद्रावर छापा टाकून संशयास्पद २२०० लीटर दूध जप्त करण्याची कारवाई करून नष्ट केले आहे.           अन्न औषध प्रशासनाने कारवाई केलेले ह

फॉलोअर